Join us  

पांढऱ्या केसांमुळे वैतागलात? बघा केस नैसर्गिकपणे काळे करण्याचा घरगुती उपाय- केस वाढतीलही छान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 2:56 PM

Natural Hair Colour For Gray Hair: पांढरे केस लपविण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडला असेल तर मेहेंदी, डाय असं सगळं सोडा आणि हा सोपा घरगुती उपाय करून पाहा.

ठळक मुद्देआठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. केसांचा रंग बदलेल. शिवाय केस खूप शायनी, सिल्की होतील.

हल्ली कमी वयातच अनेकांचे केस पांढरे होत आहेत. त्यामुळे एवढ्या कमी वयापासूनच केसांवर हेअरकलर किंवा डाय असे केमिकल्स असणारे कोणतेही पदार्थ वापरावे वाटत नाहीत. मेहेंदी लावणे हा एक नैसर्गिक उपाय आहे (Natural hair colour for gray hair). पण तो उपाय अनेकांना किचकट वाटतो. शिवाय मेहेंदी लावल्याने स्काल्प आणि केस दोन्हीही खूप कोरडे पडतात, अशी अनेकांची तक्रार असते (Simple home remedies for gray or white hair). त्यामुळे काही जणांना मेहेंदी लावणेही नको वाटते. तुम्हालाही असंच वाटत असेल तर मेहेंदी, डाय, हेअरकलर असं सगळं सोडा आणि हा एक घरगुती उपाय करून पाहा. (Simple home remedies for gray or white hair)

 

हा उपाय करण्यासाठी आपण सगळे घरगुती पदार्थ वापरणार आहोत. त्यामुळे केसांवर कोणतंही केमिकल ट्राय करण्याची भीती नाही. शिवाय हा उपाय केल्याने केसही कोरडे, रुक्ष होणार नाहीत.

झाडांना 'या' ५ प्रकारचं जादुई पाणी द्या, फुलं येतील भरपूर- झाडं वाढतील भराभर, करून पाहा

उलट हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत, ते सगळे आपल्या केसांसाठी पोषकच आहेत. हा उपाय केल्यामुळे केस नैसर्गिक पद्धतीने तर काळे होतीलच. पण त्यामुळे केसांमधला कोंडा कमी होण्यास मदत होईल. शिवाय केसांवर छान चमक येऊन त्यांची वाढही भराभर होईल. यासाठी नेमका कोणता उपाय करायचा, याची माहिती monika_kudrat या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

केस नैसर्गिकपणे काळे करण्याचा घरगुती उपाय

१. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोखंडी कढई लागणार आहे.

२. लोखंडी कढईमध्ये १ वाटी दही घ्या. त्यात १ चमचा आवळा पावडर, १ चमचा कात पावडर, १ चमचा मेथी दाण्याची पावडर आणि १ चमचा कलौंजी पावडर टाका. 

चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग लपविण्यासाठी बघा कसा करायचा मेकअप- चेहरा दिसेल एकदम स्वच्छ- सुंदर

३. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि रात्रभर कढईमध्ये तसंच झाकून ठेवा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही दह्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.

४. हा लेप तुमच्या केसांना लावा आणि त्यानंतर २ ते ४ तास केसांवर ठेवून नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

५. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. केसांचा रंग बदलेल शिवाय केस खूप शायनी, सिल्की होतील.

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी