कितीही काही केलं तरी केसगळती काही थांबत नाही. महागडे तेल, शाम्पू वापरुन देखील काही उपयोग होत नाही.(moringa powder for hair) आपलेही केस लांबसडक- घनदाट असावे असं प्रत्येकाला वाटतं पण वाढते प्रदूषण, चुकीचा आहार यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो.(moringa juice for hair growth) सतत टाळू कोरडी किंवा अतिप्रमाणात चिकट झाल्याने केसगळती वाढते.(moringa benefits for hair) केसांची योग्य निगा न राखल्यास केसांना फाटे फुटतात. केसगळती रोखण्यासाठी आपण महागडे ब्यूटी ट्रिटमेंट्स देखील करतो.(hair fall home remedies) पण त्याचा केसांवर चुकीचा परिणाम होतो. बदलता आहार, प्रदूषण, कमी झोप, स्ट्रेस आणि केमिकलयुक्त उत्पादने यामुळे केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवून जातं. पण या समस्यांवर एकच नैसर्गिक उपाय तो म्हणजे शेवगा. (natural hair growth tips)
शेवग्याला आयुर्वेदात बहुगुणी म्हटलं जातं.(natural remedies to stop hair fall instantly) यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई आहे. झिंक आणि प्रोटीनचे देखील मुबलक प्रमाण आहे. हे घटक केसांच्या मुळांना बळकटी देतात.(moringa for hair loss prevention and hair regrowth) केसांची नव्याने वाढ करण्यास सुरुवात करतात. पण नेमकं केसांसाठी शेवग्याचा पावडर की, ज्यूस काय फायदेशीर आहे, जाणून घेऊया.(moringa beauty secret for stronger and shinier hair)
शेवग्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे टाळूला ओलावा देते, कोंडा आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. याचे गुणधर्म कोलेजन तयार करण्यास मदत करतात. जे केसांना मजबूत करते. जर आपल्याकडे खूप वेळ नसेल तर ज्यूसऐवजी आपण शेवग्याचा पावडर वापरु शकतो. ही पावडर सुकवलेल्या शेवग्याच्या पानांपासून बनवली जाते.सकाळी एक चमचा शेवग्याची पावडर स्मूदी, नारळ पाणी, कोमट पाणी किंवा मधासोबत घेतल्यास फायदा होतो. आपण पर्याय म्हणून मसूर, सॅलड किंवा पीठात मिसळू शकता. गरम पाण्यासोबत ही पावडर घेऊ नका. यातील पोषक तत्व नष्ट होते.
जर आपण सकाळी लवकर उठून शेवग्याच्या पानांचा ज्यूस प्यायल्यास सगळ्यात फायदेशीर ठरेल. कोवळ्या शेवग्याची पाने बारीक करुन त्यात पाणी आणि लिंबू घालून प्या. सकाळी रिकाम्या पोटी ३० ते ५० मिली हा रस घेणे फायदेशीर ठरु शकते. याचा कडवटपणा दूर करण्यासाठी आपण मध आणि आवळ्याचा रस देखील त्यात घालू शकतो. हा रस आठवड्यातून दोन वेळा प्यायला हवा. आहारात प्रथिने आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. शेवग्याची पावडर किंवा ज्यूस दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.