Lokmat Sakhi >Beauty > पावसामुळे केसांचा पोत खराब-रखरखीत झाला? होममेड हेअर पॅक लावा, केस होतील सॉफ्ट-शायनी

पावसामुळे केसांचा पोत खराब-रखरखीत झाला? होममेड हेअर पॅक लावा, केस होतील सॉफ्ट-शायनी

monsoon hair care tips: homemade hair pack for dry hair: natural hair care tips for rainy season: केस रखरखीत झाले असतील तर हा होममेड हेअर पॅक नक्की ट्राय करुन पाहा ज्यामुळे केस सॉफ्ट आणि शायनी होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2025 14:59 IST2025-06-01T14:58:07+5:302025-06-01T14:59:40+5:30

monsoon hair care tips: homemade hair pack for dry hair: natural hair care tips for rainy season: केस रखरखीत झाले असतील तर हा होममेड हेअर पॅक नक्की ट्राय करुन पाहा ज्यामुळे केस सॉफ्ट आणि शायनी होतील.

monsoon hair care tips homemade hair pack for dry and rough hair use this simple trick smooth and shiny hair | पावसामुळे केसांचा पोत खराब-रखरखीत झाला? होममेड हेअर पॅक लावा, केस होतील सॉफ्ट-शायनी

पावसामुळे केसांचा पोत खराब-रखरखीत झाला? होममेड हेअर पॅक लावा, केस होतील सॉफ्ट-शायनी

पावसाळा सुरू झाला असून अनेकदा त्याचे पाणी आपल्या केसांवर पडते. ज्यामुळे केसांचे जास्त नुकसान होते. (monsoon hair care tips) वातावरणातील प्रदूषणामुळे पावसाच्या पाण्याचा आपल्या आरोग्यासह केसांवर परिणाम होतो.(homemade hair pack for dry hair) ऋतू बदलला की, केसांवर अनेक नकारात्मक परिणाम होतात. केस गळणे, कोंडा होणे, टाळूला सतत खाज लागणे किंवा केस कमकुवत होण्याची समस्या उद्भवते. (hair pack for rough and frizzy hair)
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि घामामुळे टाळू तेलकट आणि चिकट होते.(natural hair care tips for rainy season) ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. तसेच डोक्याच्या त्वचेला खाज सुटते.(smooth and shiny hair tips) फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. सतत पावसाचे पाणी डोक्यावर पडल्यामुळे केस व्यवस्थित विंचरता देखील येतात. (home remedies for dry hair in monsoon)

केसांना मऊ आणि रेशमी ठेवण्यासाठी आपण अनेक केमिकल्स असणारे घटक लावतो. परंतु यामुळे केसांचा पोत खराब होतो. केस रखरखीत झाले असतील तर हा होममेड हेअर पॅक नक्की ट्राय करुन पाहा ज्यामुळे केस सॉफ्ट आणि शायनी होतील. तसेच यामुळे टाळूचे आरोग्य सुधारेल. केसांच्या टोकांना फाटे कमी फुटण्यास मदत होईल. 

1. कोरफड जेल हे केसांसाठी हायड्रेशनचे साधन आहे. यात प्रोटीओलाइटिक एंजाइम असतात, जे टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी दुरुस्त करतात. कोरफड हे त्वचेसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. ताज्या कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस मऊ होतात तसेच केसगळती देखील थांबते. 

2. मेथीच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात म्युसिलेज असते. जे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. २ चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत घाला. त्याची पेस्ट बनवून ती टाळू आणि केसांना लावा. ३० ते ४० मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे केस चमकदार होतात, केसांतील गुंता सुटण्यास मदत होते. 

3. कडुलिंबामुळे केसातील कोंडा नाहीसा होण्यास मदत होते. दह्यामध्ये कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करुन टाळूला लावल्यास जळजळ आणि कोंड्यापासून सुटका होईल. हा हेअर मास्क केसांना आठवड्यातून एकदा लावल्याने केसातील कोंडा कमी होईल. 


 

Web Title: monsoon hair care tips homemade hair pack for dry and rough hair use this simple trick smooth and shiny hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.