Lokmat Sakhi >Beauty > टू व्हीलर चालवताना केसांची दुर्दशा, केस कोरडे होतात-गुंता वाढतो? पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी

टू व्हीलर चालवताना केसांची दुर्दशा, केस कोरडे होतात-गुंता वाढतो? पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी

two-wheeler hair damage fix : frizzy hair solution in monsoon: पावसाळ्यात आपण जास्त वेळ प्रवास करण्यासाठी टू व्हीलरचा वापर करतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 18:17 IST2025-06-19T18:13:06+5:302025-06-19T18:17:49+5:30

two-wheeler hair damage fix : frizzy hair solution in monsoon: पावसाळ्यात आपण जास्त वेळ प्रवास करण्यासाठी टू व्हीलरचा वापर करतो.

monsoon hair care for bikers how to protect hair while riding a two-wheeler hair care tips for rainy season | टू व्हीलर चालवताना केसांची दुर्दशा, केस कोरडे होतात-गुंता वाढतो? पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी

टू व्हीलर चालवताना केसांची दुर्दशा, केस कोरडे होतात-गुंता वाढतो? पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी

वाढत्या लोकलच्या गर्दीमुळे प्रत्येकाला प्रायव्हेट गाड्यांमधून प्रवास करणं सोप्प वाटतं.(Hair care solution) परंतु, स्कूटी किंवा बाईकने प्रवास करणे ही सामान्य गोष्ट आहे. ऑफिस असो वा कॉलेज, घरातील कामे किंवा बाजारातून सामान आणण्यासाठी आपण स्कूटीचा सहज वापर करतो.(monsoon hair care for bikers) आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग स्कूटी मोठ्या प्रमाणात बनली आहे. परंतु या सगळ्यात आपल्या केसांची विल्हेवाट लागते. (hair care tips for rainy season)
पावसाळ्यात आपण जास्त वेळ प्रवास करण्यासाठी स्कुटीचा वापर करतो.(dry and tangled hair solution) पण प्रदूषण, धूळ, पावसाचे पाणी आणि हेल्मेटमध्ये असलेली उष्णता केसांचे नुकसान करते. यामुळे केस गळू लागतात, कोरडे पडतात आणि विंचरल्यावर तुटतात.(helmet hair protection hacks) जर आपण नियमितपणे स्कूटी चालवत असू आणि राईड केल्यानंतर केस दरवेळी खराब होत असतील तर काही सोपे उपाय करायला हवे. काही घरगुती उपाय केले तर आपले केस मऊ, निरोगी राहतील. (two-wheeler hair damage fix)

आरोग्यासाठी वरदान आहे कडुनिंबाची पानं! 'असा' करा उपयोग, पुटकुळ्या-फोड्या- कोंडा होईल दूर

 स्कूटी चालवताना केस मोकळे सोडू नका. त्यांना सिल्क किंवा सॅटिन स्कार्फने बांधा आणि झाका. या कापडामुळे केसांवरील घर्षण कमी होईल. ज्यामुळे केस गुंतणार नाही आणि तुटणारही नाहीत. कॉटनचे स्कार्फ वापरणे टाळा. हे केसांमधील ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे केस कडक होऊन कोंडा तयार होतो. 

घराबाहेर पडण्यापूर्वी केसांना लीव्ह-इन कंडिशनर किंवा हेअर सीरम लावा. यामुळे केसांचे संरक्षण होईल. प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्यापासून केसांचे रक्षण होते. केसांना कडक आणि गुंतण्यापासून रोखतात. केसांची वेणी, लो बन किंवा केसांचा पोनीटेल बांधा. खूप घट्ट हेअरस्टाईल करु नका, केस ताणल्यामुळे तुटू शकतात. हेल्मेट घालताना केसांची काळजी घ्या. वारा, प्रदूषण आणि पावसापासून केसांचे रक्षण करण्यासाठी त्यांना पोषण मिळते जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी केसांना आठवड्यातून कोमट खोबऱ्याचे तेल, आवळा तेल किंवा बदामाच्या तेलाने मालिश करा. यामुळे केस मजबूत होतील. 

सतत केसांवर शाम्पू लावू नका. केस सारखे खराब होत असतील तर आठवड्यातून दोन वेळा शाम्पू लावा. हेल्मेट वापरण्यापूर्वी ते स्वच्छ करा. घामामुळे त्यात जंतू पसरतात, जे आपल्या त्वचेला संक्रमित करु शकतात. दर आठ ते १० दिवसांनी हेल्मेट उन्हात ठेवा. ज्यामुळे त्यातील जंतू मरतील. आहारात प्रथिने, व्हिटॅमिन ए, सी, ई आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा समावेश करा. 

Web Title: monsoon hair care for bikers how to protect hair while riding a two-wheeler hair care tips for rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.