Lokmat Sakhi >Beauty > केस धुतांना शाम्पूत मिसळा ‘हे’ औषधी पाणी, केसांच्या सर्व समस्या कायमच्या होतील दूर...

केस धुतांना शाम्पूत मिसळा ‘हे’ औषधी पाणी, केसांच्या सर्व समस्या कायमच्या होतील दूर...

Mix this water with your shampoo while washing your hair : diluted shampoo : शाम्पूत फक्त पाणी मिसळून तो dilution करण्यापेक्षा, करुन पाहा हा साधासोपा घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 14:43 IST2025-06-11T14:37:38+5:302025-06-11T14:43:10+5:30

Mix this water with your shampoo while washing your hair : diluted shampoo : शाम्पूत फक्त पाणी मिसळून तो dilution करण्यापेक्षा, करुन पाहा हा साधासोपा घरगुती उपाय...

Mix this water with your shampoo while washing your hair diluted shampoo | केस धुतांना शाम्पूत मिसळा ‘हे’ औषधी पाणी, केसांच्या सर्व समस्या कायमच्या होतील दूर...

केस धुतांना शाम्पूत मिसळा ‘हे’ औषधी पाणी, केसांच्या सर्व समस्या कायमच्या होतील दूर...

केस धुण्यासाठी आपण सगळेचजण शाम्पू वापरतो. शाम्पू वापरल्याने केसांची तसेच स्काल्पची स्वच्छता राखण्यास मदत होते. अनेक ब्यूटी एक्स्पर्टस आणि डर्माटॉलॉजिस्ट देखील शाम्पूत पाणी (Diluted Shampoo) मिसळून केसांवर लावण्याचा सल्ला देतात. केसांवर थेट शाम्पू लावण्यापेक्षा तो पाण्यांत मिसळून लावल्यास अधिक फायदेशीर ठरते. १ भाग शॅम्पू आणि ३ भाग पाणी या साध्या उपायामुळे शाम्पू अधिक सौम्य होतो, या पद्धतीमुळे शाम्पू कमीत कमी रसायनयुक्त होतो आणि  केस व स्काल्प यांचे आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत होते(Mix this water with your shampoo while washing your hair).

Healthshots वेबसाइटनुसार, शाम्पूचे dilution केल्याने केस तुटणे कमी होते आणि केसांवर रसायनांचे नकारात्मक परिणाम देखील कमी होतात. परंतु केस धुताना, शाम्पूत फक्त पाणी मिसळून तो dilution करण्यापेक्षा आपण मेथी दाणे, कडीपत्त्याचे पाणी तयार करुन त्यात शाम्पू dilution केल्याने त्याचा केसांना अधिक जास्त फायदा होतो. यासाठी, आपण घरच्याघरीच औषधी पाणी कसे तयार करु शकतो ते पाहूयात.      

साहित्य :- 

१. पाणी - १ ग्लास 
२. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
३. कडीपत्त्याची पाने - १० ते १२ पाने   
४. तांदूळ धुवून उरलेलं पाणी - १/२ ग्लास 
५. शाम्पू - गरजेनुसार

मूठभर कांद्याच्या टरफलांनी करा नॅचरल हेअर कलर, पांढरे केसही होतील १५ मिनिटांत काळेभोर...

नेमकं करायचं काय ? 

सगळ्यातआधी एका मोठ्या भांड्यात पाणी ओतून ते हलके गरम करून घ्यावे. पाण्याला हलकी उकळी आल्यावर यात मेथी दाणे, कडीपत्त्याची पाने घालून पुन्हा एक हलकी उकळी काढावी. त्यानंतर, हे पाणी बारीक जाळीदार गाळणीने गाळून थंड करून घ्यावे. हे पाणी थंड झाल्यावर त्यात तांदूळ धुवून शिल्लक राहिलेलं पाणी आणि केसांच्या गरजेनुसार शाम्पू घालावा. हे सगळे मिश्रण एकजीव करून चमच्याने ढवळून घ्यावे. या मिश्रणाने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. केस धुताना शाम्पूमध्ये फक्त पाणी मिसळून लावण्यापेक्षा आपण अशा प्रकारचे पाणी तयार करून, मग त्यात शाम्पू मिसळून लावल्यास केसांना त्याचे अनेक फायदे मिळतात. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होऊन, केसांचे आरोग्य व सौंदर्य खुलून येण्यास अधिक मदत होते.   

मूठभर कडूनिंबाची पानं आणि वाटीभर तूप, फक्त १५ मिनिटांत करा डोळ्यांसाठी गारेगार औषधी काजळ...


हे पाणी केसांसाठी वापरण्याचे फायदे... 

१. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमुळे स्काल्पची जळजळ, खाज, इंफेक्शन यांपासून आराम मिळतो. याचबरोबर, केस व स्काल्प यांची स्वच्छता राखली जाते. 

२. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्यामधील लोह, कॅल्शियम, फॉस्फरस यांसारखी खनिजं केसांच्या वाढीस मदत करतात. यामुळे केस घनदाट, लवचिक, मजबूत  होतात. 

३. तांदुळाचे पाणी :- तांदळातील स्टार्च केसांना मऊमुलायम करून, अधिक शायनी आणि घनदाट करतो.

Web Title: Mix this water with your shampoo while washing your hair diluted shampoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.