Join us

मेहेंदीत मिसळा स्वयंपाकघरातील २ गोष्टी, अकाली पांढरे झालेले केस, गळण्याची समस्या होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2023 15:59 IST

Mix these things in Henna to get jet black hair : मेहेंदी फक्त पाण्यात मिसळून लावू नका, त्यात मिसळा २ गोष्टी, केस होतील घनदाट

केस पांढरे होणे हे एखाद्या व्यक्तीच्या अनुभवाचे प्रतिबिंब दर्शवते. मात्र, अनेकांचे अकाली वयातच केस पांढरे (Grey Hairs) झालेत. कमी वयात पांढरे केस झाल्यामुळे आणखी टेन्शन येतं. महिलावर्ग आपल्या केसांची अधिक काळजी घेतात. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची काळजी घ्यायला जमेलच असे नाही.

केस पांढरे झाल्यावर अनेक महिला मेहेंदी लावतात. पण मेहेंदी लावूनही काही केस पांढरे राहतात, किंवा केस लाल होतात. जर मेहेंदी लावून केस पांढरे करायचे असतील तर त्यात कांद्याच्या सालींचा (Onion Peels) वापर करा. कांद्याच्या सालींमुळे केसांवर नैसर्गिक काळा रंग चढतो. यासह केसांच्या अनेक समस्या सुटतात(Mix these things in Henna to get jet black hair).

अशा पद्धतीने तयार करा मेहंदी आणि कांद्याच्या सालीची पावडर

साहित्य

४ चमचे मेहेंदी

१ कप कांद्याची साल

साबुदाणा न भिजवता-बटाटा न उकडता करा साबुदाण्याचे कुरकुरीत वडे, नवरात्रासाठी झटपट उपवास रेसिपी

२ चमचे एलोवेरा जेल

चहापत्तीचे पाणी

कृती

सर्वप्रथम, गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर कांद्याची सालं घालून भाजून घ्या. कांद्याची साल काळपट पडल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कांद्याची साल घालून बारीक पावडर तयार करा. तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून ठेवा. मिक्सरच्या भांड्यात मेथी दाणे घालून त्याचीही पावडर तयार करा. तयार पावडर त्याच बाऊलमध्ये काढून ठेवा. त्यात मेहेंदी पावडर, एलोवेरा जेल आणि चहापत्तीचे पाणी घालून मिक्स करा. त्यावर झाकण ठेवा. ५ ते ६ तासानंतर पुन्हा चमच्याने मिक्स करा. अशा प्रकारे हेअर मास्क रेडी.

अशा पद्धतीने लावा केसांवर मास्क

केस आणि विंचरून घ्या, नंतर स्काल्पपासून सुरुवात करून केसांच्या टोकापर्यंत मेहेंदी लावा. मेहेंदी लावल्यानंतर केसांवर शॉवर कॅप लावा. एका तासानंतर केस पाण्याने धुवा. केस धुताना शाम्पू किंवा साबणाचा वापर करू नका. यामुळे केसांवर लवकर रंग चढणार नाही. दुसऱ्या दिवशी केसांवर तेल लावा, त्यानंतर शाम्पू लावून केस धुवा.

चेहरा फक्त साबण आणि फेस वॉशने धुता? ४ घरगुती उपाय, चेहरा होईल स्वच्छ-तेजस्वी

केसांवर मेहेंदीसह कांद्याची साल, मेथी दाणे लावण्याचे फायदे

- मेहेंदी लावल्याने केसांच्या क्यूटिकलमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यासह कोरड्या केसांना चमक येते.

- मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते. शिवाय स्काल्पवर खाज सुटणे, कोंड्याची समस्या सुटते.

- कांद्याची साल स्काल्पवरील इन्फेक्शन दूर करते. कांद्याची साल सल्फरचे उत्तम स्त्रोत आहे. यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स