काळेभोर, घनदाट, लांबसडक केस सगळ्यांनाचं आवडतात. आपल्या केसांच्या अनेक समस्या कायमच्या दूर होऊन केस सुंदर दिसावेत यासाठी आपण अनेक उपाय करतो. केसांसाठी काहीवेळा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करूनही केसांच्या समस्या काही केल्या कमी होतच नाहीत. याउलट केसांच्या समस्या (Mix These 3 Things In Mustard Oil & Apply Your Hair Will Become Naturally Black & Long) वाढतच जातात. वाढते प्रदूषण, ताणतणाव, केसांसाठी (Home Remedies For Black & Long Hair Naturally) आर्टिफिशियल ब्यूटी प्रॉडक्ट्सचा सतत वापर आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, पातळ होणे आणि चमक हरवणे, केसांची वाढ खुंटणे, केस अकाली पांढरे होणे यासारख्या समस्या सतावतात. केसांच्या या अनेक समस्या दूर करण्यासाठी काहीवेळा इतर उपयांपेक्षा साधेसोपे घरगुती उपायही असरदार ठरतात(Mix these 3 ingredients with mustard oil to stop).
या घरगुती आणि पारंपरिक उपायांचा परिणाम हळुहळु होत असला तरी त्याचे परिणाम चांगले आणि कायम टिकून राहणारे असतात. केस काळेभोर, घनदाट, लांबसडक होण्यासाठी मोहरीचे तेल उपयुक्त ठरते. मोहरीचं तेल केसांची मुळे मजबूत करण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी आणि नैसर्गिक चमक देण्यासाठी ओळखलं जातं. पण केवळ मोहरीचं तेलच नाही, तर त्यात विशिष्ट ३ घरगुती पदार्थ मिसळून लावल्यास केसांना दुपटीने पोषण मिळते. केस काळेभोर, घनदाट, लांबसडक होण्यासाठी मोहरीच्या तेलात कोणते ३ पदार्थ मिसळून लावावेत ते पाहूयात.
मोहरीच्या तेलात मिसळा ३ पदार्थ...
१. कडीपत्ता :- कडीपत्ता हा अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिने यांचा उत्तम स्रोत आहे. कडीपत्ता केसांची मुळे मजबूत करतो आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतो. यासाठी मूठभर ताजी कडीपत्त्याची पाने घ्या आणि ते मोहरीच्या तेलात गरम करा, जोपर्यंत पाने कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत तेलात तळा. त्यानंतर तेल थंड होऊ द्या आणि ते गाळून घ्या. हे तेल स्काल्पवर आणि केसांवर हलक्या हाताने मसाज करा, हे तेल किमान एक तास किंवा संपूर्ण रात्रीसाठी डोक्यावर तसेच राहू द्या. यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. नियमित हे तेल वापरल्यास केस अधिक घनदाट, मजबूत आणि नैसर्गिकरित्या काळेभोर होतात.
केसांना टोकं फुटल्यामुळे सतत केस कापता? १ घरगुती हेअर मास्क - स्प्लिट एंड्स होतील कमी...
२. कांद्याचा रस :- कांद्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे कोलेजन निर्मितीला चालना देते आणि केसांच्या मुळांना पोषण पुरवते. या उपायामुळे केसांची वाढ सुधारते आणि केसगळती कमी होते. एक मध्यम आकाराच्या कांद्याचा रस काढा. २ चमचे कांद्याचा रस आणि ४ चमचे मोहरीचं तेल एकत्र करा. हे मिश्रण आपल्या स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करत लावा. त्यानंतर ते ३० मिनिटांपासून १ तासापर्यंत केसांवर तसेच राहू द्या. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा केल्यास केसांची मुळे मजबूत होतात, गळती कमी होते आणि केस दाट होऊ लागतात.
आंब्याची हिरवीगार पानं केसांसाठी वरदान! या ३ पद्धतींनी केसांना लावा, केसांच्या समस्या गायब...
३. मेथी दाणे :- मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिनं आणि निकोटिनिक ॲसिडचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे केसगळती कमी होते आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते, यामुळे केस अधिक मजबूत, दाट आणि निरोगी होतात. २ ते ३ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे दाणे वाटून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये ४ चमचे मोहरीचं तेल मिसळा. हे मिश्रण स्काल्पवर आणि केसांवर लावा. ३० ते ४५ मिनिटांपर्यंत तसेच ठेवा नंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा केल्यास केसगळती कमी होते आणि नवीन केसांची वाढ झपाट्याने होते. मेथीमुळे केसांना नैसर्गिक चमकही येते.
लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...