पांढरे झालेले केस लपवण्यासाठी किंवा केसांना नवा आकर्षक लुक देण्यासाठी अनेकजण हेअर कलर किंवा डाय लावतात. बाजारात मिळणारे हे सिंथेटिक रंग केसांना लगेच गडद रंग देत असले तरी त्यातील हानिकारक रसायने केस आणि त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतात. यामुळे केस कोरडे होणे, तुटणे किंवा ॲलर्जी होणे अशा समस्या वाढतात. जर तुम्हांला पांढऱ्या झालेल्या केसांना लाल किंवा बर्गंडी रंगात रंगवून हटके लूक करायचा असेल आणि त्यासाठी रासायनिक रंगांचा वापर टाळायचा असेल, तर मेहंदी हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण नुसत्या मेहंदीने केसांना हवा असलेला गडद लाल रंग येत नाही. यासाठी, मेहंदीमध्ये एक खास नैसर्गिक घटक मिसळण्याची गरज असते(natural hair dye with henna & kattha).
केसांना मेहेंदी लावताना गडद रंग येणासाठी आपण चहा पावडरचे पाणी, दही, मेथी दाणे असे अनेक पदार्थ घालतो, यामुळे मेहेंदीला नैसर्गिक लाल गडद रंग येऊन केसांवर देखील छान रंग चढतो. परंतु या सगळ्या पदार्थांसोबतच एक जादुई पदार्थ मेहंदीसोबत मिसळल्यास केसांना खोलवर पोषण मिळेल. एवढंच नाही तर त्याचबरोबर हानिकारक रंगांचा (how to get dark hair with henna & kattha) वापर न करता केसांना हवा असलेला चमकदार लाल किंवा बर्गंडी रंग मिळेल. हा खास घटक (mix kattha in mehendi for dark hair colour) कोणता आहे आणि तो मेहंदीत कसा मिसळायचा ते पाहूयात...
केसांना लाल/बर्गंडी रंग देण्यासाठी 'कात' (Kattha) वापरा...
मेहंदीमध्ये मिसळायचा 'तो' खास पदार्थ म्हणजे 'कात' (Kattha). विड्याच्या पानांमध्ये वापरला जाणारा हा नैसर्गिक पदार्थ मेहंदीच्या रंगाला एक वेगळी आणि गडद लाल किंवा बर्गंडी रंगाची छटा देण्यास मदत करतो. रासायनिक रंगांच्या तुलनेत हा एक सुरक्षित आणि सोपा घरगुती उपाय आहे.
केसांना लाल/बर्गंडी रंग येण्यासाठी मेहेंदी कशी भिजवावी ?
केसांना लाल/बर्गंडी रंग येण्यासाठी, एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात कात चा एक छोटा तुकडा घालून त्याचा रंग पाण्यांत उतरेपर्यंत तो पाण्यांत भिजत ठेवावा. याच पाण्यात चमचाभर मेथी दाणे देखील घालावेत. मेथी दाणे आणि कात एकत्रित रात्रभर पाण्यांत भिजत ठेवावे. एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळवून घ्यावे, मग या पाण्यांत चमचाभर चहा पावडर घालून मिश्रण व्यवस्थित गरम करून घ्यावे. आता भिजवून घेतलेले मेथी दाणे आणि कात मिक्सरच्या भांड्यात घालूंन त्याची एकत्रित वाटून पेस्ट तयार करून घ्यावी. एका बाऊलमध्ये मेहेंदी पावडर घेऊन त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मेथी दाणे आणि कात यांची पेस्ट घालावी मग यात चहा पावडरचे पाणी गाळून ओतावे. सगळ्यात शेवटी सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. मग झाकण ठेवून मेहेंदी किमान ३ तास व्यवस्थित भिजू द्यावी.
३ तासांनंतर तयार मेहेंदीची पेस्ट केसांवर ब्रश किंवा हाताने व्यवस्थित लावून घ्यावी. केसांवर ही मेहेंदी सुकेपर्यंत किंवा २ ते ३ तास तशीच राहू द्यावी,मग पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. लगेच शाम्पू वापरू नका. शाम्पू दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वापरावा, ज्यामुळे रंग केसांमध्ये व्यवस्थित सेट होईल. मेहेंदीत कात घातल्याने मेहेंदीचा रंग केसांवर व्यवस्थित सेट होतो आणि केसांना सुंदर नैसर्गिक टोन मिळतो.आपण केसांमध्ये झालेला फरक पाहू शकता, केसांवर हलकासा लाल, बर्गंडी रंग आला दिसेल. अशा प्रकारे आपण पार्लरला न जाता किंवा हानिकारक हेअर कलर, डाय यांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने केसांना रंगवू शकता.
केसांना अधिक चांगला रंग येण्यासाठी लक्षात ठेवा...
१. चहाचे किंवा कॉफीचे पाणी मेहेंदी भिजवण्यासाठी वापरावे.
२. गडद रंगासाठी मेहेंदी कायम लोखंडाची कढई किंवा भांड्यात भिजवावी.
३. रंगाची तीव्रता वाढवण्यासाठी आपण मेहेंदीत लिंबाचा रस देखील घालू शकता.
