Join us  

मध-हळद-दूध; चेहऱ्यावर चमक हवी तर मीरा राजपूतप्रमाणे वापरा हे ३ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 4:09 PM

हळद, मध, कच्चं दूध आणि गुलाब पाणी हे नैसर्गिक घटक वापरुन मीरा राजपूत (Mira Rajput) आपल्या त्वचेचं पोषण करते, त्वचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याचाच परिणाम म्हणजे मीराचा चेहेरा (Mira Rajput's glowing skin secret) कायम फ्रेश आणि एनर्जेटिक दिसतो.

ठळक मुद्देआंबे हळद आणि मधाच्या लेपानं चेहेरा स्वच्छ होतो.उन्हापासून त्वचेचं सरंक्षण करण्यासाठी मीरा कच्च्या दुधाचा वापर करते. 

मीरा राजपूत (Mira Rajput)  ही स्वत: अभिनेत्री नसली तरी तिचा लूक कोण्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. आपल्या लूक, फिटनेस, डाएटबद्दल मीरा कमालीची जागरुक असते. आयुर्वेद आणि पारंपरिक उपायांवर मीराचा जास्त विश्वास. ती चेहेरा, केस, फिटनेस, डाएट याबाबत पाळत असलेल्या नियमांच्या बाबत सोश्ल मीडियावर लिहित देखील असते. मीराच्या  या उपायांबाबत फाॅलोअर्समध्ये प्रचंड उत्सुकता असते. मीराने नुकत्याच एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे (Mira Rajput glowing skin secret) चेहेऱ्यावर नॅचरल ग्लो (natural glow) येण्यासाठी आपण काय करतो याबद्दल सविस्तर लिहिलं आहे.

Image: Google

चेहेऱ्यावर चमक येण्यासाठी मीरा राजपूत ज्या घटकांचा वापर करते ते आजीबाईच्या बटव्यातले उपाय आहेत. हळद, मध, कच्चं दूध आणि गुलाब पाणी हे नैसर्गिक घटक वापरुन मीरा आपल्या त्वचेचं पोषण करते, त्वचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याचाच परिणाम म्हणजे मीराचा चेहेरा कायम फ्रेश आणि एनर्जेटिक दिसतो. 

Image: Google

 नॅचरल ग्लो येण्यासाठी..

1. मीरा राजपूत आंबे हळद उगाळून त्यात मध मिसळून हा लेप चेहेऱ्यास लावते. हा उपाय आपल्या आईचा असल्याचं मीरा सांगते. हळद आणि मध हे दोन घटक प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. मधामध्ये सूज आणि दाह विरोधी घटक, जिवाणूविरोधी घटक असल्यानं त्वचेवर जिवाणूचा संसर्ग होत नाही आणि चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येत नाही. तर आंबे हळद ही नैसर्गिक स्क्रब प्रमाणे काम करते. हळद आणि मधाचा लेप हातानं हलका मसाज करत चेहेऱ्यास लावल्यास चेहेऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि चेहेऱ्यावर ग्लो येतो. 

2. उन्हामुळे त्वचा खराब होवू नये, त्वचेचं सरंक्षण व्हावं यासाठी मीरा त्वचेला कच्चं दूध लावते. चेहेरा स्वच्छ करण्यासोबतच कच्च्या दुधाने उन्हानं खराब झालेली त्वचा आणि  त्वचेचा काळवंडलेपणा कमी होतो. मीरा सांगते की आपल्या दोन्ही मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी ती त्यांच्या चेहेऱ्याला कच्चं दूध लावते.

 

Image: Google

मीरा सांगते चेहेऱ्याला कच्चं दूध लावण्याच्या दोन पध्दती आहेत. सकाळ संध्याकाळ कच्च्या दुधानं चेहेरा स्वच्छ करावा. यासाठी कच्चं दूध आणि गुलाब पाणी समप्रमाणात घ्यावं. ते चांगलं मिसळून या मिश्रणानं चेहेऱ्याला मसाज करावा. 5-10 मिनिटानंतर कापूस ओला करुन चेहेरा स्वच्छ करावा. चेहेऱ्यासाठी कच्चं दूध वापरण्याची दुसरी पध्दत म्हणजे कच्च्या दुधात चिमूटभर मीठ घालावं आणि या मिश्रणानं चेहेऱ्यास मसाज करावा. 3-4 मिनिटंमसाज केल्यानंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा.मीरा म्हणते हळद, मध, गुलाबपाणी, कच्चं दूध आणि मीठ या नैसर्गिक घटकांपासून मिळणारा ग्लो कोणत्याही ब्यूटी उत्पादनापेक्षा जास्त गुणाचा आणि टिकाऊ असतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमीरा राजपूत