केसांसाठी मेहेंदीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. मेहेंदी केसांच्या आरोग्यात आणि सौंदर्यात अधिक भर पाडते. आपल्यापैकी बरेचजण केसांच्या अनेक समस्या कमी (Mehendi For Hair Care) करण्यासाठी केसांसाठी मेहेंदी आवर्जून (natural hair coloring with mehendi) लावतात. खरंतरं, केसांना मेहेंदी लावण्याने त्याचे अनेक फायदे दिसून येतात. पांढरे केस रंगवण्यासाठी बहुतेकजण हानिकारक डाय किंवा आर्टिफिशियल हेअर कलर्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक मेहेंदी वापरणंच अधिक (Beetroot juice & Fenugreek paste for hair) पसंत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी मेहेंदी एक उत्तम पर्याय आहे. पण केसांना मेहेंदी लावताना ती नुसती पाण्यात भिजवून लावल्याने हवा तसा परिणाम मिळत नाही(mehendi for vibrant hair color).
केसांना नैसर्गिक रंग आणि पोषण देण्यासाठी मेहेंदी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. पण फक्त मेहेंदी भिजवून लावण्यापेक्षा त्यात काही खास पदार्थ मिसळल्यास तिचा रंग, सुगंध आणि केसांवरील फायदे दुप्पट होतात. योग्य पदार्थ घालून भिजवलेली मेहेंदी केसांना अधिक मऊ, मजबूत आणि चमकदार बनवते. केसांना योग्य पोषण मिळून त्यांचा रंग अधिक गडद आणि टिकाऊ होण्यासाठी मेहेंदीत काही खास पदार्थ मिसळणे खूप फायदेशीर ठरते. आपण मेहेंदी भिजवताना त्यात कोणते २ महत्त्वाचे (mehendi hair pack for color) पदार्थ घालावेत, ज्यामुळे केसांना चांगला रंग तर मिळेलच, पण केस मजबूत आणि चमकदार होतील, हे पाहूयात...
केसांसाठी मेहेंदी भिजवताना अशी भिजवा....
शक्यतो पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा केसांना मऊ, मुलायम व चमकदार करण्यासाठी तसेच केसांच्या अनेक समस्यांसाठी मेहेंदी वापरणे फायदेशीर ठरते. परंतु ही केसांसाठी मेहेंदी भिजवताना ती फक्त पाण्यांत न भिजवता, इतर काही पदार्थ त्यात घातले तर केसांना त्याचा अधिक फायदा होतो. इतकेच नाही तर पांढऱ्या केसांवरही चांगला नैसर्गिक रंग येऊन केस पुन्हा पहिल्यासारखे सुंदर दिसू लागतात.
कियारा अडवाणीचा आवडता फेसमास्क, तिच्या चेहऱ्यावर दिसतं तसं तेज आपल्यालाही मिळेल अगदी सहज...
मेहेंदीत नेमके कोणते २ पदार्थ मिसळावेत...
केसांवर मेहेंदी लावण्यापूर्वी ती नुसत्या पाण्यात भिजवण्यापेक्षा, मेथी दाण्यांची पेस्ट व बीटरुटचा किस हे दोन्ही पदार्थ जर मेहेंदीत घातते तर त्याचा केसांना दुप्पट फायदा होतो. यासाठी मेहंदी नेमकी कशी भिजवावी ते पाहूयात.
सगळ्यातआधी कपभर मेथी दाणे घेऊन ते पाण्यांत रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ही मेथी दाण्यांची पेस्ट व पाणी एकत्रित मिक्सरच्या भांडयात घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या. मग बीटरुट किसून त्याचा रस काढून घ्यावा. आता एका मोठ्या बाऊलमध्ये मेथी दाण्यांची पेस्ट, बीटरूटचा रस आणि मेहेंदी पावडर भिजवून घ्यावी. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. तयार मेहेंदी ३० ते ३५ मिनिटे झाकून ठेवून द्यावी. मग एका ब्रशच्या मदतीने ही मेहेंदी पेस्ट केसांवर लावून घ्यावी. तासभर ही मेहेंदी केसांवर ठेवून मग पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत केस आधी फक्त पाण्यानेच धुवून घ्यावेत लगेच शाम्पूचा वापर करु नये. दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत.
आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम? तज्ज्ञ सांगतात, कोणते पाणी जास्त फायद्याचे..
मेहेंदी अशा पद्धतीने भिजवल्याने केसांवर होणारे फायदे...
१. बीटाचा रस :- बीटाचा रस केसांना नैसर्गिक लालसर रंग देतो आणि स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारतो.
२. मेथी दाण्यांची पेस्ट :- मेथी दाण्यांची पेस्ट केसगळती कमी करून केसांना मऊ करते व पोषण देते.
३. मेहेंदी पावडर :- मेहेंदी पावडर केसांना नैसर्गिक रंग देऊन त्यांना मजबूत व निरोगी बनवते.