lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का?

ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का?

Makeup Tips And Beauty Tips: कोणतंही कॉस्मेटिक्स वापरण्यापुर्वी काही गोष्टी निश्चितच तपासून घेतल्या पाहिजेत. नाहीतर आहे ते सौंदर्यही गमावण्याची वेळ येऊ शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2024 04:56 PM2024-04-04T16:56:34+5:302024-04-04T17:26:27+5:30

Makeup Tips And Beauty Tips: कोणतंही कॉस्मेटिक्स वापरण्यापुर्वी काही गोष्टी निश्चितच तपासून घेतल्या पाहिजेत. नाहीतर आहे ते सौंदर्यही गमावण्याची वेळ येऊ शकते.

Make sure 4 things before using any cosmetics, how to choose proper cosmetics? | ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का?

ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का?

Highlightsकोणतंही कॉस्मेटिक्स वापरताना किंवा पार्लर निवडताना काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे.

सुंदर दिसणं, नटणं, मुरडणं हे बहुतांश मुलींचं, महिलांचं आवडतं काम. आपण छान दिसावं यासाठी वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरले जातात. सध्या तर लग्नसराई आहे. त्यामुळे कॉस्मेटिक्सची खरेदी, वापर असं सगळंच जोरात सुरू आहे. अशातच हरियाणामधील दीपिका नावाच्या तरुणीची गोष्ट व्हायरल होत आहे. नातेवाईकांच्या लग्नासाठी जायचं म्हणून ती पार्लरला गेली आणि तिथे तिने केसांसाठी जी काही ट्रिटमेंट घेतली त्यामुळे तिचे बरेच केस गळून गेले. असं आपल्याही चेहऱ्याच्या, केसांच्या बाबतीत होऊ नये, म्हणून कोणतंही कॉस्मेटिक्स वापरताना किंवा पार्लर निवडताना काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे.

 

कॉस्मेटिक्सची निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

१. स्वस्तात मिळत आहे म्हणून कोणतेही माहिती नसलेले कॉस्मेटिक्स घेण्याच्या मोहात पडू नका. जे ओळखीचे आणि नावाजलेले ब्रॅण्ड आहेत, त्यांचेच कॉस्मेटिक्स थोडे महाग पडत असले तरी घ्या. तसेच एकदम अनोळखी पार्लरमध्ये जाऊन कधीच कोणती ट्रिटमेंट करून घेऊ नका.

लालेलाल टोमॅटोविषयी तुम्हाला अजिबात माहिती नसलेल्या ५ महत्त्वाच्या गोष्टी, टोमॅटो खायचा तर....

२. लिपस्टिक, काजळ, मस्कारा असे कोणतेही कॉस्मेटिक्स विकत घेताना आपण त्या कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट तपासून घेतो आणि निर्धास्त होतो. पण प्रॉडक्टची Expiry Date आणि Shelf Life या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रॉडक्ट वापरण्यापुर्वी या दोन्ही गोष्टी तपासून बघणं गरजेचं आहे.

 

३. तुम्ही जेव्हा एखादं कॉस्मेटिक्स वापरण्यासाठी उघडता, तेव्हा त्या तारखेपासून पुढे किती दिवस तुम्ही ते वापरू शकता, हा कालावधी म्हणजे शेल्फ लाईफ होय.

Summer Special: स्लिव्ह्जलेस ब्लाऊजचे १० एकदम लेटेस्ट पॅटर्न्स, ब्लाऊज शिवण्यापूर्वी 'हे' डिझाईन्स पाहाच...

पण बऱ्याचदा आपल्याला याबाबत माहिती नसल्याने आपण ते प्रॉडक्ट शेल्फ लाईफ संपलेली असतानाही एक्सपायरी डेट येईपर्यंत वापरतो. यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. 

 

४. कोणत्याही प्रॉडक्टची शेल्फ लाईफ तपासायची असेल तर त्या प्रॉडक्टवर अशा पद्धतीचं एक झाकण उघडल्याचं चित्र असतं.

उन्हाळ्याची गर्मी कमी करणारा पांढऱ्या साडीतला 'कुल' लूक, बघा पांढऱ्या साडीतले देखणे सौंदर्य

त्या चित्रावर जो काही आकडा Y किंवा M असं लिहून टाकलेला असतो, तितके वर्ष किंवा तितके महिने ही त्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ असते. एकदा उघडलेलं प्रॉडक्ट त्या शेल्फ लाईफ एवढंच वापरलं पाहिजे. 


 

Web Title: Make sure 4 things before using any cosmetics, how to choose proper cosmetics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.