आपले केस सुंदर, घनदाट, लांबसडक असावेत अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. याचबरोबर, आपल्याला हवे तसे आपले केस होण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु केसांसाठी अनेक उपाय करताना केसांच्या अनेक समस्या यात अडथळा ठरतात. अनेकदा केसगळती, टक्कल पडणे किंवा केसांची वाढ खुंटणे यांसारख्या (Make a Herbal Leaf and Flower Toner at Home) समस्यांशी आपण झगडत असतो. केसांच्या या अनेक समस्यांसाठी वेगवेगळी कारणं आहेत, परंतु सगळ्यांत कॉमन आणि मुख्य कारण म्हणजे हानिकारक व केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा सतत मारा (How To Make Toner For Hair At Home) केसांवर करणे. यासगळ्यांतून, केसांचे आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी टोनर वापरणे खूप गरजेचे असते. परंतु बाजारांतील विकतचे हानिकारक, महागडे टोनर घेण्यापेक्षा आपण घरच्याघरीच औषधी पानाफुलांचे पारंपरिक पद्धतीने घरगुती टोनर तयार करु शकतो(leaf and flower hair toner).
आपल्या आजूबाजूला अशी अनेक औषधी पानं आणि फुलं आहेत, जी केसांच्या वाढीसाठी वरदान ठरतात. विशेषतः औषधी पानाफुलांपासून तयार केलेले टोनर केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक पोषण देतात. केस गळणे, कोरडेपणा, डोक्यातील इंफेक्शन आणि केसांची वाढ थांबणे अशा अनेक समस्यांवर हे घरगुती टोनर उपयुक्त ठरते. केसांच्या वाढीस चालना देणारं खास औषधी पानाफुलांचे टोनर घरच्याघरी कसे तयार करायचे ते पाहूयात. हे टोनर वापरल्याने केस मजबूत, चमकदार आणि निरोगी बनतील.
घरगुती औषधी पानाफुलांचे टोनर कसे तयार करायचे?
केसांसाठी घरगुती औषधी पानाफुलांचे टोनर तयार करण्याची सिक्रेट रेसिपी pooja.real.remedies या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. केसांच्या अनेक समस्यांचे प्रमाण कमी करून केसांच्या वाढीस चालना देणारे टोनर तयार करण्यासाठी आपल्याला ३ ते ४ कप पाणी, २ टेबलस्पून मेथी दाणे, ४ ते ५ लवंग काड्या, २ टेबलस्पून रोझमेरी, ७ ते ८ जास्वंदीची पाने, १० ते १५ कडीपत्त्याची पाने, ६ ते ७ जास्वंदीची फुले, ३ ते ४ थेंब गुलाबपाणी किंवा खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
नेमकं करायचं काय ?
टोनर तयार करण्यासाठी एक मोठा काचेचा जग किंवा भांडं घेऊ शकता. या भांड्यात पाणी भरून त्यात मेथी दाणे, लवंग काड्या, रोझमेरी, जास्वंदीची पाने, कडीपत्त्याची पाने, जास्वंदीची फुले असे सगळे घटक पदार्थ एकत्रित घालावे. मग हे भांडं झाकून २४ तासांसाठी तसेच ठेवून द्यावे, जेणेकरून त्या सगळ्या घटक पदार्थांचा अर्क पाण्यांत उतरेल. २४ तासानंतर हे पाणी एका पातेल्यात ओतून घ्यावे मग मंद आचेवर हे पाणी १० ते १५ मिनिटे व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर, गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. सगळ्यांत शेवटी यात गुलाब पाणी किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घालावेत. मग हे पाणी काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावे.
स्किन टोननुसार करा परफेक्ट रंगांच्या कपड्यांची निवड! कोणता रंग तुमच्यावर शोभून दिसेल ते पाहा...
याचा वापर कसा करावा ?
आठवड्यातून किमान ३ वेळा आपण हे टोनर आवर्जून वापरावे. थोडे टोनर घेऊन ते थेट केसांवर स्प्रे करावे किंवा कापसाच्या बोळ्याच्या मदतीने स्काल्प व केसांवर लावून घ्यावे. मग रात्रभर ते टोनर केसांवर तसेच राहू द्यावे, दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
केसगळती थांबवते, केस वाढतात भरभर-लावा ‘हे’ जादुई तेल! एक चंपी-डोकं शांत-केस सुंदर...
हे टोनर वापरण्याचे फायदे...
१. टोनर स्काल्पमध्ये खोलवर जाऊन केसांच्या मुळांना आवश्यक पोषकद्रव्यं पुरवतो.
२. नियमित वापर केल्याने केसांची नैसर्गिक वाढ जलद होते.
३. स्काल्पमधील कोरडेपणा व डँड्रफ कमी करण्यासाठी टोनर उपयुक्त ठरतो.
४. टोनरमुळे केस मऊ, सिल्की आणि शायनी दिसू लागतात.
५. टोनर स्काल्पला थंडावा देतो आणि रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे केसांचे आरोग्य व सौंदर्य सुधारते.
६. नैसर्गिक घटक असलेल्या टोनरमुळे केस गळणे हळूहळू कमी होते.