हल्ली केस कमी वयातच पांढरे होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या कित्येक मुलांचेही केस पांढरे झालेले दिसतात. कमी वयात केस पांढरे झाले की मग आपोआपच कॉन्फिडन्स कमी होत जातो. बऱ्याचदा हे जेनेटिकल आहे असं म्हणत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तज्ज्ञ असं सांगत आहेत की शरीरातील मेलॅनिन कमी होऊ लागलं आणि ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस वाढू लागला की केस कमी वयात पांढरे होण्याचं प्रमाण खूप वाढतं (1 Common Reason For Gray Hair At Early Age). असं होत असेल तर काही पदार्थ आपल्या आहारात तातडीने घ्यायला हवे (4 simple remedies that prevents hair from graying). त्या पदार्थांमुळे केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण बरंच कमी होत जातं. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..(simple home hacks for naturally black hair)
केस पांढरे होऊ नयेत म्हणून कोणते पदार्थ खायला हवे?
याविषयी माहिती देणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी ishalall_wellness या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी खायला सांगितलेले काही पदार्थ पुढीलप्रमाणे..
घरकाम करून हात खरखरीत झाले- काळवंडून गेले? फक्त १० मिनिटांचा उपाय- हात होतील मऊ
१. तज्ज्ञ सांगतात की केस पांढरे होऊ नयेत यासाठी काळे तीळ अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे १ ते २ टीस्पून काळे तीळ नियमितपणे खायला हवे. काळ्या तिळामध्ये कॉपर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मेलॅनिन प्रोडक्शन चांगलं होतं. शिवाय काळ्या तिळांमधून एडिबल मेलॅनिन, ॲण्टीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात मिळतं.
२. कडिपत्त्याची पानंही केसांचा काळा रंग टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे दिवसातून एकदा कडिपत्त्याची २ ते ३ पाने बारीक चावून खा किंवा मग त्याचा काढा करून प्या. त्यातून मिळणारे लोह, फॉलिक ॲसिड, बीटा कॅरेटिन केसांची मुळं पक्की करण्यास मदत करतात.
सोहा अली खान सकाळी उठताच खाते कच्चा लसूण! व्हिडिओ शेअर करत म्हणाली सहन होत नाही, पण...
३. तिसरा उपाय म्हणजे रोज एक आवळा नियमितपणे खा. आवळ्यामधले व्हिटॅमिन सी शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते.
४. चौथा पर्याय म्हणजे कॉपरच्या भांड्यातले पाणी रोज किमान २ ग्लास तरी प्या. कारण कॉपरमुळेही केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.