>ब्यूटी > कसली सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेण्ट मिळवून देणारी ही घ्या जादू!

कसली सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेण्ट मिळवून देणारी ही घ्या जादू!

कधीतरी आपल्याला वाटतं की आज आपण मस्त दिसतोय, त्यादिवशी नेमकी कुणीतरी कॉम्प्लिमेण्ट देतं की आज किती सुंदर दिसतेय तू, त्यादिवशी नेमकी काय जादू झालेली असते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 03:56 PM2021-04-21T15:56:53+5:302021-04-21T16:00:49+5:30

कधीतरी आपल्याला वाटतं की आज आपण मस्त दिसतोय, त्यादिवशी नेमकी कुणीतरी कॉम्प्लिमेण्ट देतं की आज किती सुंदर दिसतेय तू, त्यादिवशी नेमकी काय जादू झालेली असते?

magic that gives you compliment for beautiful look! | कसली सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेण्ट मिळवून देणारी ही घ्या जादू!

कसली सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेण्ट मिळवून देणारी ही घ्या जादू!

Next
Highlightsमग आपण आपल्या सौंदर्याला आत्मविश्वासाचा खास टच कधी देणार?

गौरी पटवर्धन

आपण सुंदर आहोत असं आपलं मन आपल्याला का सांगत नाही? याचं अगदी स्पष्ट, खरं आणि प्रामाणिक उत्तर द्यायचं तर ते म्हणजे, आपल्या मनाला हे नीट माहिती असतं, की आपण सुंदर दिसत नाही? आहोत म्हणून ते आपल्याला तसं सांगत नाही. आपलं मन आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही? आणि आपणही आपल्या मनाशी कधीच खोटं बोलत नाही. त्यामुळे आपल्याला आपण जेव्हा खरंच सुंदर वाटतो तेव्हा आपल्याला ते आतून समजतंच आणि ते त्यावेळी आपल्याही चेहेऱ्यावर दिसतं.
प्रत्येकीच्या बाबतीत हे ही कधी ना कधी घडलेलं असतं. आपण अगदी नेहेमीचेच कपडे घालतो, नेहेमीसारखंच आवरतो, काहीही वेगळं करत नाही, पण तरीही एखादा दिवस असा येतो जेव्हा सगळा दिवस आपल्याला रँडमली कॉम्प्लिमेंट मिळतात. बस किंवा लोकलमध्ये रोज भेटणारी मैत्रीण, ऑफिसमधली कलीग, शेजारीण असं सहज आपल्याला म्हणतात,
“अरे वा, आज एकदम छान दिसते आहेस… आज काय स्पेशल?”

किंवा
“छान ड्रेस / साडी / टॉप आहे तुझा… तुला छान सूट होतोय.”
किंवा
“कुठून घेतलीस गं साडी? कितीला? फारच सुंदर आहे”
आपण हसून, खूश होऊन ती कॉम्प्लिमेंट घेतो पण मनात येतंच, “अहो काकू / आजी / ताई… ही साडी? पाच वर्षांपूर्वी घेतलेली आहे. पाच वर्षात मी ती किमान दहा वेळा नेसले आहे. त्यापैकी किमान दोन वेळा तुम्हाला भेटले आहे. त्यावेळी तुम्हाला दिसली नाही का ही साडी?”
तर त्या वेळी काय आणि आत्ता काय… त्यांनी नुसती साडी किंवा ड्रेस बघितलेलाच नसतो. तर त्यांना आपल्याकडे एकूण बघून असं वाटलेलं असतं की आपण सुंदर दिसतोय. आणि खरं सांगायचं तर बहुतेक वेळा त्या दिवशी आपल्यालाही तयार होताना असं वाटत असतं, की आज मला छान वाटतंय, हा रंग मला छान दिसतो, आज केस छान सेट झालेत किंवा बांधले गेलेत. एखाद्या दिवशी सगळं छान जमून येतो तो तो दिवस असतो. आपल्याला आतून स्वतःच्या दिसण्याबद्दल छान वाटतं आणि मग ते आपल्या चेहेऱ्यावर दिसतं. मग इतरांनाही आपण सुंदर वाटतो.
मग प्रश्न असा येतो, की एरवी आपण तेच कपडे घालतो किंवा तसेच आवरून सावरून बाहेर पडतो, मग एरवी असं का होत नाही. तो काय फॅक्टर असतो ज्याच्यामुळे आपण सुंदर दिसतो किंवा दिसत नाही. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे आत्मविश्वास!
“ही लिपस्टिक फार गॉडी आहे का?”
“काजळ जरा जास्त लागलंय का?”
“या इयर रिंग्ज घेतांना तर फॉर्मलवर जातील म्हणून घेतल्या, पण आता त्या जरा जास्त फेस्टिव्ह वाटतायत का?”
“ही साडी या फंक्शनला फार साधी आहे का?”
“हा कलर मला सूट होत नाही असं वाटतंय.”
असे अनेक विचार आपल्या मनात स्वतःबद्दल येत असतात. आणि हे विचार आपलं दिसणं तर बदलू शकत नाहीत, पण ते दुसरी एक गोष्ट नक्की करतात आणि ते म्हणजे आपला आत्मविश्वास डळमळीत करतात. मात्र तआत्मविश्वास चेहऱ्यावर आला की आपण सुंदर दिसायला लागतो.
मग आपण आपल्या सौंदर्याला आत्मविश्वासाचा खास टच कधी देणार?

Web Title: magic that gives you compliment for beautiful look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर डाग, मुरुम आहेत? त्वचा विकार झालेत? - मग मानसोपचारतज्ज्ञाकडे जा.. - Marathi News | black spots or pimples on the face? Skin problems? - Then go to a psychiatrist. new british study. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर डाग, मुरुम आहेत? त्वचा विकार झालेत? - मग मानसोपचारतज्ज्ञाकडे जा..

त्वचाविकारांसाठी कोणी मानसोपचारतज्ज्ञांकडे गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण ब्रिटिश स्कीन फाऊण्डेशननं (बीएसएफ) नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध केलं आहे, की त्वचाविकारांसाठी इतर योग्य उपचारांसह मानसोपचारतज्ज्ञाचेही उपचार घेतले तर त्वचेवर चा ...

कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स! - Marathi News | healthy nails are beautiful nails, how to make them healthy, nail art is not enough for nail health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स!

कितीही लपवलं, चेहऱ्याला कितीही मेकअपने सजवलं तरी आपले हात , आपली नखं सांगतातआपलं व्यक्तिमत्व कसं आहे . ...

तिची फिगर भारी आहे, आपणच कसे गबाळे ? -असा प्रश्न पडतो, त्याचं हे उत्तर - Marathi News | what to do for great figure and beautiful look? try this.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिची फिगर भारी आहे, आपणच कसे गबाळे ? -असा प्रश्न पडतो, त्याचं हे उत्तर

आपला कम्फर्ट, आत्मविश्वास आणि फिटनेस वाढवायचा. मग फिगरच नाही आपणच सुंदर दिसायला लागतो. ...

चेहरा टवटवीत रहावा म्हणून घरच्या घरी करण्याचे ७ उपाय - Marathi News | 7 home remedies to keep your face fresh in corona lockdown | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा टवटवीत रहावा म्हणून घरच्या घरी करण्याचे ७ उपाय

चेहऱ्याला पाणी लावून तरी काय उपयोग , घरातच तर आहोत, कुणाला दाखवायचे आहे, असं म्हणालात तर तोटा तुमचाच. ...

झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT.. - Marathi News | makeup, only these 3 things can change your LOOK. TRY IT .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झूम मिटिंग्ज ते इन्स्टा क्लिक मेकअपची गरज काय, फक्त या ३ गोष्टी तुमचा LOOK बदलू शकतात. TRY IT..

घरच्याघरी झूम मिटिंग्ज ते फेस टाइम ते इन्स्टा क्लिक सगळ्यांसाठी आपण तयारी असावं म्हणून ३ छोट्या गोष्टी. ...

एक डार्क कलरची लिपस्टिक तुमच्याविषयी बरंच काही सांगते.. - Marathi News | A dark lipstick & your personality test | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक डार्क कलरची लिपस्टिक तुमच्याविषयी बरंच काही सांगते..

आपण फारच ब्राइट कलर लावला का? पुसू का? कोण काय म्हणेल? बरं दिसेल का? असं वाटून पुसलेल्या लिपस्टिकची गोष्ट. ...