Lokmat Sakhi >Beauty > सतत हेअर स्टाईल करुन खराब झालेल्या केसांसाठी माधुरी दीक्षितचा 'देसी उपाय' - केस होतील मऊमुलायम...

सतत हेअर स्टाईल करुन खराब झालेल्या केसांसाठी माधुरी दीक्षितचा 'देसी उपाय' - केस होतील मऊमुलायम...

Madhuri dixit’s homemade hair mask for soft & shiny hair : Madhuri Dixit Nene’s homemade hair mask is what you need for healthy, shiny hair : केसांसाठी सतत हिटिंग टूल्स, हेअर प्रॉडक्ट्स वापरुन केसांचा झाडू झाला तर करून पाहा हा माधुरीने सांगितलेला उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 19:04 IST2025-03-24T18:52:48+5:302025-03-24T19:04:05+5:30

Madhuri dixit’s homemade hair mask for soft & shiny hair : Madhuri Dixit Nene’s homemade hair mask is what you need for healthy, shiny hair : केसांसाठी सतत हिटिंग टूल्स, हेअर प्रॉडक्ट्स वापरुन केसांचा झाडू झाला तर करून पाहा हा माधुरीने सांगितलेला उपाय...

Madhuri dixit’s homemade hair mask for soft & shiny hair Madhuri Dixit Nene’s homemade hair mask is what you need for healthy, shiny hair | सतत हेअर स्टाईल करुन खराब झालेल्या केसांसाठी माधुरी दीक्षितचा 'देसी उपाय' - केस होतील मऊमुलायम...

सतत हेअर स्टाईल करुन खराब झालेल्या केसांसाठी माधुरी दीक्षितचा 'देसी उपाय' - केस होतील मऊमुलायम...

केसांना वेगवेगळ्या पद्धतीने स्टायलिंग करण्यासाठी आपण हिटिंग टूल्स आणि हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करतो. केसांना स्टायलिश लूक देण्यासाठी आपण केसांवर अनेक उपाय करतो, परंतु यामुळे केस खराब होऊन (Madhuri dixit’s homemade hair mask for soft & shiny hair) केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. केसांवर सतत हिटिंग टूल्स फिरवल्याने आणि हेअर प्रॉडक्ट्सचा अतिवापर केल्याने केसांच्या नाजूक मुळांना इजा पोहचू शकते. सतत (Madhuri Dixit Nene’s homemade hair mask is what you need for healthy, shiny hair) केसांवर हिटिंग टूल्स, स्प्रे, हेव्ही हेअर प्रॉडक्ट्स वापरून केसांचा नैसर्गिक पोत बिघडतो. यामुळे केस रुक्ष, निस्तेज आणि रखरखीत दिसू लागतात. असे निर्जीव केस दिसताना खूपच खराब दिसतात.

केसांचा नैसर्गिक पोत बिघडललेया अशा केसांना पुन्हा पहिल्यासारखे करण्यासाठी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित एक खास घरगुती उपाय शेअर केला आहे. माधुरी (Madhuri Dixit) तिच्या वेगवेगळ्या भूमिकेनुसार केसांचे हेअर स्टायलिंग करत असते. सतत केसांचे असे हेअर स्टायलिंग केल्यामुळे तिचे केस देखील खराब होऊ लागतात, केसांचा पोत बिघडतो अशावेळी ती कोणतीही ब्यूटी ट्रिटमेंट किंवा महागडे प्रॉडक्ट्स न वापरता एक सोपा घरगुती उपाय करते. हा उपाय नेमका कोणता ते पाहूयात. डल, रुक्ष, रखरखीत झालेल्या केसांना अगदी चुटकीसरशी एकदम मऊमुलायम आणि चमकदार कसं करायचं याविषयी माहिती सांगणारा माधुरी दीक्षितचा व्हिडिओ sushmitas_diaries या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

साहित्य :- 

१. केळं - २ (पिकलेली केळी)
२. दही - १ कप 
३. मध - १ टेबलस्पून 

फक्त शाम्पूने धुवून स्काल्प स्वच्छ होत नाही, वापरा 'हा' आयुर्वेदिक लेप - केस होतील चांगले...


कतरिना केसांना लावते तिच्या सासूबाईंनी तयार केलेलं खास तेल, पाहा या घरगुती तेलाची सिक्रेट रेसिपी...

कृती :- 

१. सर्वात आधी एका बाऊलमध्ये केळ्याचे लहान लहान कप करून घ्यावेत. 
२. चमच्याच्या मदतीने हे केळ्याचे काप मॅश करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 
३. या मॅश केलेल्या केळ्याच्या पेस्टमध्ये दही आणि मध घालावे. 
४. आता चमच्याने कालवून सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. 

केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

या हेअर मास्कचा वापर कसा करावा ? 

तयार करून घेतलेला हेअर मास्क केसांवर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर ३० ते ४० मिनिटे हा हेअर मास्क केसांवर तसाच लावून ठेवावा. ३० मिनिटांनंतर केस हर्बल शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. केस स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांत फरक जाणवेल. केस अधिक जास्त मऊ, मुलायम आणि स्मूद झालेले दिसतील.

Web Title: Madhuri dixit’s homemade hair mask for soft & shiny hair Madhuri Dixit Nene’s homemade hair mask is what you need for healthy, shiny hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.