Join us

ऐन तारुण्यात केस गळाल्यानं खप्पड दिसताय-टक्कल पडलं? ५ सवयी बदला-केस वाढतीलही वेगानं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2025 19:05 IST

Hair fall in young age : How to stop hair loss naturally: Baldness in early 20s or 30s: Habits causing hair fall: ऋतू बदलला की केसांच्या समस्या अधिक वाढतात. केसगळती रोखण्यासाठी काय करायला हवं जाणून घेऊया.

केसगळतीच्या समस्यांमुळे हल्ली प्रत्येक वयोगटातील लोक त्रस्त आहे.(Hair falls) केस गळणं, तुटणं, टक्कल पडणं किंवा कमकुवत होणं यांसारख्या समस्या सामान्य वाटत असल्या तरी याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आपले केस सुंदर, लांबसडक असावे असं प्रत्येकाला वाटतं.(Hair loss issue) पण केसगळतीची कारण वेगळी असू शकतात. (Habits causing hair fall)बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या बाह्य आरोग्यासह अंतर्गत आरोग्यावर देखील तितकाच होतो.(How to stop hair loss naturally) पुरेशी झोप न घेतल्याने, सततचा थकवा, चिंता किंवा पचनसंस्था सुरळीत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. केसांना पोषणांची कमतरता जाणवली की केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. ऋतू बदलला की केसांच्या समस्या अधिक वाढतात. केसगळती रोखण्यासाठी काय करायला हवं जाणून घेऊया. 

त्वचा सतत तेलकट-चिपचिपी दिसते? ३ फेसपॅक, पिंपल्स-पिगमेंटेशन जाऊन चेहऱ्यावर येईल तेज

तज्ज्ञ म्हणतात शरीरातील पित्त प्रकृती बिघडल्यामुळे केसांच्या समस्या उद्भवतात. अशावेळी व्यक्तीचे केस गळतात, तुटतात किंवा पांढरे होतात. केसांच्या समस्या टाळण्यासाठी आपले पित्त संतुलित करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया पित्त संतुलित करण्याचे मार्ग. 

1. पित्ताचे प्रमाण संतुलित करण्यासाठी आहारात गोड पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ वगळावे लागतील. या दोन्ही गोष्टींमुळे पित्त संतुलित होऊ देत नाहीत. तसेच केसगळतीसह शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पित्त संतुलित करण्यासाठी मासांहरी पदार्थांचे सेवन कमी करा. 

2. पित्त संतुलित करण्यासाठी जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणे टाळा. भरपूर प्रमाणात पाणी प्या. ज्यामुळे केसगळती दूर होईल. यासोबत आरोग्य देखील सुधारेल. 

3. पित्ताचे संतुलन करण्यासाठी चिया सीड्स पाण्यात भिजवून ते पाणी प्या. यासाठी रात्रभर ग्लासमध्ये चिया सीड्स भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. ज्यामुळे शरीराला भरपूर फायबर मिळेल. 

4. तसेच डिंक पाण्यात भिजवून सकाळी या पाण्याचे सेवन करु शकता. यामुळे शरीर थंड राहते आणि पचनसंस्था सुधारते. हे केसांच्या समस्यांसाठी देखील फायदेशीर आहे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी