Join us

भारती सिंग केस काळे करण्यासाठी वापरते 'असे' घरगुती हेअर डाय, पांढरे केस दिसतच नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2025 15:38 IST

Laughter Queen Bharti Singh Shared Her White Hair Remedy With Natural Ingredients : Homemade remedy for white hair : Home Remedy for Gray Hair : Home Remedy to Get Rid of Grey Hair : 1 Best Home Remedy For Premature Greying Hairs : पांढरे केस काळे करण्यासाठी महागड्या सलॉन-पार्लरमध्ये न जाता करा भारतीचा खास हटके देसी उपाय...

आजकाल लहान वयातच लवकर केस पिकून पांढरे होण्याची समस्या फारच कॉमन झाली आहे. वाढत्या वयात केस पांढरे होणं सहाजिक आहे. परंतु ऐन तारुण्यात वय झालं नसताना देखील अकाली केस पांढरे (Laughter Queen Bharti Singh Shared Her White Hair Remedy With Natural Ingredients) होणे ही समस्या कित्येकांना लाजिरवाणी  वाटते. बदलती लाईफस्टाईल, ताण-तणाव, अपुरी झोप, चुकीची आहार पद्धती आणि केसांसाठी केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा (Homemade remedy for white hair) वापर अशी यामागची प्रमुख कारणं आहेत. आपल्यापैकी बरेचसेजण अकाली केस पांढरे (Home Remedy to Get Rid of Grey Hair) झाल्यावर ते पुन्हा काळे करण्यासाठी महागड्या ब्यूटी ट्रीटमेंट्स, हेअर डाय, हेअर कलर यांसारखे अनेक उपाय (Home Remedy for Gray Hair) करून पाहतात. आपण असे असंख्य उपाय केले तरी त्याचे तात्पुरते परिणाम दिसतात, तसेच त्यांचे दुष्परिणामही अनेक असू शकतात. यासाठीच, आजकाल आपल्यापैकी बरेचजण पांढरे केस काळे करण्यासाठी नैसर्गिक व घरगुती उपाय करण्यावर अधिक भर देतात(1 Best Home Remedy For Premature Greying Hairs).

असाच काहीसा एक देसी हटके उपाय सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Laughter Queen Bharti Singh) हिने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. भारतीने अकाली पांढरे झालेले केस घरच्याघरीच नॅचरल पदार्थ (1 Best Home Remedy For Premature Greying Hairs ) वापरुन कसे काळे करता येतील याचे एक सिक्रेट सांगितले आहे. आपले पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी भारती कोणत्याही महागड्या सलॉन किंवा पार्लरमध्ये न जाता सरळ घरगुती पारंपरिक उपाय करण्यावर अधिक जास्त भर देते. जर तुमचेही केस अकाली पांढरे झाले असतील तर सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिने सांगितलेला हा खास देसी उपाय नक्की ट्राय करुन पाहा.    

साहित्य :- 

१. कॉफी पावडर - १ टेबलस्पून २. मध - १ टेबलस्पून ३. खोबरेल तेल - १ टेबलस्पून ४. दही - २ कप 

जया बच्चन सांगतात त्यांच्या आजीचा घरगुती उपाय, उन्हात काळवंडलेल्या त्वचेसाठी खास उपाय - चेहरा चमकतो...

कृती :-  

सगळ्यातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून कॉफी पावडर, खोबरेल तेल आणि मध घ्यावे. आता चमच्याने हे सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे. सगळे घटक पदार्थ एकजीव झाल्यावर तुमचा घरगुती, नैसर्गिक हेअर डाय वापरण्यासाठी तयार आहे. 

सारा तेंडुलकर, केसांसाठी करते तिच्या आईने सांगितलेला पारंपरिक उपाय - पाहा तिचे हेअर केअर सिक्रेट!

स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थच आहेत केसांसाठी उत्तम कंडिशनर! नको महागडे कंडिशनर - करा नैसर्गिक उपाय...

याचा वापर कसा करावा ? 

सगळ्यातआधी तयार घरगुती, नैसर्गिक हेअर डाय केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत सगळीकडे अगदी व्यवस्थित ब्रशच्या किंवा हातांच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर हा तयार हेअर डाय केसांवर ३० मिनिटे ते तासभर तसाच राहू द्यावा. मग केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर आपण आपल्या केसातील झालेला बदल पाहू शकता. या नैसर्गिक व घरगुती हेअर डायमुळे पांढरे केस काळे केले जातात सोबतच, केसांना पोषण देखील मिळते. रुक्ष, निस्तेज झालेले केस पुन्हा मऊमुलायम होतात. इतकेच नाही तर केसांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा येण्यास मदत होते. या नॅचरल पद्धतीने केस काळे केल्यास पुढचे किमान ६ ते ८ महिने तरी आपले पांढरे केस दिसून येणार नाहीत. सोबतच, हा नॅचरल हेअर मास्क मेहेंदी, केमिकल्सयुक्त हेअर डाय यांच्यापेक्षा बराच काळ केसांवर टिकून राहतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीभारती सिंग