Lokmat Sakhi >Beauty > केसांच्या प्रकारानुसार ठरवा आठवड्यातून कितीवेळा केस धुणं आवश्यक ? केसांच्या तक्रारी होतील कमी, दिसतील सुंदर...

केसांच्या प्रकारानुसार ठरवा आठवड्यातून कितीवेळा केस धुणं आवश्यक ? केसांच्या तक्रारी होतील कमी, दिसतील सुंदर...

Know How Many Times a Week You Should Shampoo Based on Your Hair Type : आठवड्यातून कितीवेळा केस धुवायचे, हे तुमच्या केसांचा प्रकार, स्काल्पची स्थिती आणि लाइफस्टाईलवर अवलंबून असते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2025 14:21 IST2025-09-30T14:07:58+5:302025-09-30T14:21:15+5:30

Know How Many Times a Week You Should Shampoo Based on Your Hair Type : आठवड्यातून कितीवेळा केस धुवायचे, हे तुमच्या केसांचा प्रकार, स्काल्पची स्थिती आणि लाइफस्टाईलवर अवलंबून असते...

Know How Many Times a Week You Should Shampoo Based on Your Hair Type how often to wash hair based on hair type | केसांच्या प्रकारानुसार ठरवा आठवड्यातून कितीवेळा केस धुणं आवश्यक ? केसांच्या तक्रारी होतील कमी, दिसतील सुंदर...

केसांच्या प्रकारानुसार ठरवा आठवड्यातून कितीवेळा केस धुणं आवश्यक ? केसांच्या तक्रारी होतील कमी, दिसतील सुंदर...

आपले केस सुंदर, घनदाट, चमकदार आणि निरोगी असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. केसांचे आरोग्य व सौंदर्य कायमच चांगले टिकवून ठेवण्यासाठी आपण केसांची अनेक (how many times should you wash hair weekly) प्रकारे काळजी घेतो. सुंदर केसांसाठी त्यांची योग्य ती काळजी घेण्यासोबतच वेळोवेळी स्वच्छता ठेवणे देखील महत्वाचे असते. साधारणतः केसांची स्वच्छता करायची म्हटलं की, आपण आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा तरी केस धुतो. केसांवर तेल लावून ते दुसऱ्या दिवशी धुणे इतकी बेसिक काळजी तर आपण घेतोच. परंतु केस आठवड्यातून कितीवेळा धुवावेत असा प्रश्न पडतो(Know How Many Times a Week You Should Shampoo Based on Your Hair Type).

काहीजणी दररोज केस धुतात, तर काहीजणी आठवड्यातून फक्त एकदाच. मात्र, केस किती वेळा धुवावेत हे तुमच्या केसांचा प्रकार आणि त्याचा पोत यावर अवलंबून असते. चुकीच्या पद्धतीने आणि अगदी रोज केस धुतल्यास, केस कोरडे होतात किंवा जास्त तेलकट राहतात. आपल्या केसांसाठी ‘परफेक्ट हेअर वॉश सायकल’ कोणती आहे आणि केसांचा (how often to wash hair based on hair type) पोत लक्षात घेऊन आठवड्यातून किती वेळा केस धुणे फायदेशीर आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. आठवड्यातून किती दिवसांनी केसांना शाम्पू करायचा हे तुमच्या केसांचा प्रकार, स्काल्पची स्थिती आणि लाइफस्टाईलवर अवलंबून असते. यापेक्षा जास्त किंवा कमी वेळा केस धुतल्यास केसांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकते. 

केसांच्या प्रकारानुसार आठवड्यातून किती वेळा केस धुणं फायदेशीर...

१. तेलकट केस :- दर दुसऱ्या दिवशी किंवा आठवड्यातून ३ वेळा धुणे गरजचे आहे. स्काल्पमध्ये जास्त तेल तयार झाल्यामुळे केस लवकर खराब व तेलकट होतात आणि त्यामुळे ते लवकर किंवा दर २ दिवसांनी धुणे आवश्यक असते.

२. पातळ केस :- आठवड्यातून २ ते ३ वेळा धुणे आवश्यक असते. पातळ केस (Thin Hair) लवकर तेलकट होतात आणि स्काल्पमधील नैसर्गिक तेल  लवकर शोषून घेतात. त्यामुळे असे पातळ केस वारंवार धुणे गरजेचे असते. 

खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा! केसांवर दिसेल कमालीचा फरक - वाटेल आधीच का नाही केला उपाय...  

३. थोडे जाड असलेलं केस :- जर तुमचे केस थोडे जाड असतील तर आठवड्यातून २ ते ४ वेळा ते स्वच्छ धुणे फायदेशीर ठरते. थोडे जाड असलेले केस सामान्यतः लवचिक असतात, त्यामुळे योग्य शाम्पू आणि कंडिशनिंगने त्यांना चमकदार आणि हेल्दी ठेवता येतं.  

४. दाट आणि कुरळे केस :- जर केस दाट आणि कुरळे (Thick and Curly Hair) असतील तर आठवड्यातून १ किंवा २ वेळा शाम्पू करा. वारंवार शाम्पू केल्याने या केसांमध्ये असलेले नैसर्गिक तेल (Natural Oil) कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे निघून जाऊ शकते, ज्यामुळे केस कोरडे होतात.आठवड्यातून १ किंवा २ वेळा शाम्पू करणे फायद्याचे ठरेल. वारंवार शाम्पू केल्याने या प्रकारच्या केसांमध्ये असलेले नैसर्गिक तेल कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे निघून जाऊ शकते, ज्यामुळे केस कोरडे होतात.

चहा पावडरचा सुपरहिट हेअर कलर! केसांवर येईल सुंदर रंग - पार्लरचा खर्च वाचेल असा बजेट फ्रेंडली उपाय... 

साडी कोणतीही असो, शोभून दिसतील असे ब्लाऊजचे ६ नेक पॅटर्न्स! प्रत्येकीकडे असायलाच हवे अशा डिझाइन्सचे ब्लाऊज... 

५. कोरडे किंवा खराब, कमकुवत झालेले केस :- आठवड्यातून फक्त १ वेळा शाम्पू करा आणि सौम्य (Mild) किंवा सल्फेट-फ्री (Sulfate-Free) शाम्पूचा वापर करा. कोरड्या किंवा खराब झालेल्या केसांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण लगेच कमी होते, त्यामुळे वारंवार शाम्पू करणे टाळले पाहिजे.

६. हवामान आणि लाईफस्टाईलनुसार बदल :- उन्हाळा किंवा पावसाळा या काळात घाम आणि धुळीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शाम्पू करण्याची गरज अधिक जास्त असते. एक्सरसाइज किंवा इतर ॲक्टिव्हिटी करणाऱ्यांनी आठवड्यातून ३ वेळा केस स्वच्छ धुवावेत, कारण घाम आणि तेल यामुळे केस व स्काल्प लवकर अस्वच्छ होते.

७. केसांना नुकसान पोहोचवणाऱ्या चुकीच्या सवयी :- दररोज केसांना शाम्पू लावून धुतल्याने केसांची नैसर्गिक चमक आणि केसांमध्ये असलेले नैसर्गिक तेल पूर्णपणे नष्ट होऊ शकते. यामुळे केस कोरडे, दुभंगलेलेआणि कमजोर होऊ शकतात.

Web Title : सही तरीके से धोएं बाल! बालों के प्रकार पर निर्भर करता है स्वस्थ बालों के लिए

Web Summary : बालों को धोने की आवृत्ति बालों के प्रकार पर निर्भर करती है: तैलीय बालों को अधिक धोने की आवश्यकता होती है, जबकि सूखे बालों को कम। जीवनशैली भी मायने रखती है। अधिक धोने से प्राकृतिक तेल निकल जाते हैं, जिससे नुकसान होता है। स्वस्थ बालों के लिए अपनी दिनचर्या समायोजित करें।

Web Title : Wash hair right! Frequency depends on hair type for healthy hair.

Web Summary : Washing frequency depends on hair type: oily hair needs more washes, while dry hair needs less. Lifestyle also matters. Over-washing strips natural oils, causing damage. Adjust your routine for healthier hair.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.