सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, चुकीचा आहार आणि केमिकल शाम्पूचा अतिवापर यामुळे केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. अनेकदा महागडे ट्रिटमेंट्स करूनही केसांचा पोत सुधारण्याऐवजी ते शेपटीसारखे पातळ दिसू लागतात. (Kes galati thambvanyache upay ) अशा वेळी आपण विसरतो की, आयुर्वेदात घनदाट केसांचे एक नैसर्गिक रहस्य आहे ते म्हणजे मुलतानी माती.(Multani mati benefits)
मुलतानी माती फक्त चेहऱ्याच्या सौंदर्यासाठीच नाही, तर केसांच्या आरोग्यासाठीही एक वरदान आहे. जर आपले केस निर्जीव झाले असतील, मुळांपासून कमकुवत असतील किंवा त्यांची चमक हरवली असेल, तर मुलतानी मातीचा हा सोपा उपाय करुन पाहा.(Scalp detox with Multani Mitti) यात असणारी नैसर्गिक खनिजे टाळूतील अतिरिक्त तेल शोषून घेतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. पाहूया मुलतानी मातीचा उपयोग केसांसाठी कसा करायचा.
मुलतानी माती ही एक नैसर्गिक क्लिन्झर आहे. यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड सारखी महत्त्वाची खनिजे असतात. हे घटक टाळूवरील मृत पेशी (Dead cells) आणि साचलेली घाण काढून टाकतात. आपले केस खूप तेलकट असतील तर मुलतानी माती अत्यंत फायदेशीर आहे कारण ती छिद्रे मोकळी करते, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते.
मुलतानी माती कशी वापरायची?
1. सगळ्यात आधी आपल्याला १ चमचा मुलतानी माती घ्यावी लागेल. नियमित वापरला जाणारा शाम्पू घ्या आणि त्यात थोडे पाणी मिसळा. हे सर्व मिश्रण केसांना लावून ५ ते ७ मिनिटे मसाज करा. नंतर केस धुवा. यामुळे शाम्पूतील रसायनांचा प्रभाव कमी होतो आणि केसांना नैसर्गिक कंडिशनिंग मिळते.
2. केसांची वाढ होण्यासाठी २ चमचे मुलतानी माती, १ चमचा दही आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. या सर्व गोष्टी एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. २० मिनिटानंतर कोमट पाण्याने केस धुवा. दह्यातील प्रथिने केसांना पोषण देतात, तर मुलतानी माती केसांना मजबूत करते.
3. आपले केस जास्त कोरडे असतील तर आठवड्यातून एकदा मुलतानी माती वापरावी. कोरड्या केसांना मुलतानी माती वापरताना त्यात थोडे कोरफड जेल आणि नारळाचे तेल मिसळा.
Web Summary : Combat hair fall with Multani mitti! This natural remedy strengthens roots, removes oil, and boosts circulation. Use it in your shampoo or with curd and lemon for enhanced growth. For dry hair, mix with aloe vera and coconut oil.
Web Summary : मुल्तानी मिट्टी से बालों का झड़ना रोकें! यह प्राकृतिक उपाय जड़ों को मजबूत करता है, तेल हटाता है और परिसंचरण को बढ़ाता है। इसे अपने शैम्पू में या दही और नींबू के साथ मिलाकर बालों के विकास के लिए उपयोग करें। सूखे बालों के लिए, एलोवेरा और नारियल तेल मिलाएं।