डोळ्यांवरील रेखीव, सुंदर, दाट भुवया चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पाडतात. जर आपले आयब्रो अधिक सुंदर आणि छान व्यवस्थित शेपमध्ये असतील तर चेहरा उठून दिसतो, याउलट पातळ, विरळ आयब्रो असतील तर चेहरा तितकाच बिघडलेला दिसतो. जाड आणि दाट भुवयांमुळे चेहऱ्याला एक वेगळाच लुक येतो. परंतु अनेकदा आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या (Karishma Tanna uses special remedies for thick eyebrows) भुवया विरळ - पातळ होतात. अनेक महिलांना जाड (karishma tanna eyebrow care) आणि दाट भुवया हव्या असतात, पण त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे उपाय करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. जर आपल्यालाही नैसर्गिकरित्या जाड आणि आकर्षक भुवया हव्या असतील, तर अभिनेत्री करिष्मा तन्ना (Karishma Tanna) करत असलेल्या एका खास घरगुती उपायाची मदत घेऊ शकता(eyebrow growth remedies).
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा तन्ना तिच्या ब्यूटी आणि स्टाईलसाठी कायमच चर्चेत असते. खास करून तिच्या परफेक्ट शेपच्या आणि दाट आयब्रोमुळे ती अधिक सुंदर दिसते. करिष्मा तन्ना आपल्या आयब्रो जाड आणि दाट दिसण्यासाठी काही खास नैसर्गिक उपाय करते. आयब्रोसाठीचे सोपे आणि घरच्याघरी करता येणारे उपाय केवळ तिच्या सौंदर्यात भर घालतातच, शिवाय चेहऱ्याला एक नॅचरल लूकही देतात. दाट - जाडसर, काळ्याभोर आयब्रोसाठीकरिष्मा तन्ना नेमका कोणता उपाय करते ते पाहूयात...
करिष्मा तन्नाचा सुंदर - रेखीव आयब्रोसाठी खास उपाय...
करिष्मा तन्नाने सांगितले की, जेव्हाही तिला तिच्या भुवया जाड आणि आकर्षक दाखवायच्या असतात, तेव्हा ती त्यासाठी साबणाचा वापर करते. ती कोणताही स्पूली (spoolie) म्हणजे मस्करा (mascara) ब्रश घेते. सर्वात आधी साबणावर थोडे पाणी शिंपडते आणि त्यावर ब्रश घासते. त्यानंतर हाच ब्रश ती आपल्या भुवयांवर फिरवते. ती भुवयांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने आधी ब्रश फिरवते आणि नंतर वाढीच्या दिशेने त्याला योग्य आकार देते. यामुळे भुवया अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. करिष्मा तन्नाने सांगितलेला हा उपाय सध्या इंटरनेटवर खूप लोकप्रिय होत आहे, कारण तो खूप सोपा आणि इन्स्टंट उपाय आहे.
हा उपाय कसा फायदेशीर ?
करिष्मा तन्ना वापरत असलेल्या या पद्धतीला 'सोप ब्रो' (soap brows) असे म्हणतात. साबण केसांमध्ये एक प्रकारचा थर तयार करतो, ज्यामुळे केस जागेवर टिकून राहतात आणि त्यांना योग्य आकार मिळतो. त्यामुळे भुवया दाट आणि अधिक आकर्षक दिसतात. स्पूली ब्रश म्हणजेच मस्कारा ब्रश (spoolie) वापरल्यामुळे भुवयांच्या प्रत्येक केसांना साबण लागतो आणि त्यांना वरच्या दिशेने किंवा योग्य दिशेने सेट करणे सोपे जाते. यामुळे भुवया अधिक भरलेल्या आणि रेखीव, आकर्षक दिसतात.
आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय-टाळा केमिकल...
आयब्रो अधिक दाट व रेखीव करण्यासाठी इतरही उपाय फायदेशीर...
१. रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडे खोबरेल तेल गरम करून भुवयांवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे भुवयांची वाढ चांगली होते.
२. एरंडेल तेल भुवयांसाठी खूप फायदेशीर आहे. रोज रात्री एरंडेल तेलाचे काही थेंब घेऊन भुवयांवर लावा. यामुळे भुवयांचे केस लवकर वाढतात.
३. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते वाटून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट भुवयांवर लावा. नियमितपणे असे केल्याने भुवयांचे केस वाढण्यास मदत होते.
४. कोरफडीचा गर भुवयांवर लावल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते आणि भुवया दाट दिसतात.
५. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून तो गरम करा. हे तेल थंड झाल्यावर रोज भुवयांवर लावा. यामुळे केसांची वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते आणि भुवया दाट होतात.