Lokmat Sakhi >Beauty > महागडं तेल केसांना चोपडताय? जावेद हबीब सांगतात, केसांसाठी योग्य तेल कोणतं-लावायचं कसं...

महागडं तेल केसांना चोपडताय? जावेद हबीब सांगतात, केसांसाठी योग्य तेल कोणतं-लावायचं कसं...

Jawed Habib Hair Care Tips : Jawed Habib hair care tips : Jawed Habib hair growth tips : how to identify Best oil for hair growth tips given by Jawed Habib : केसांवर नुसतं भरभरुन तेल चोपडताय, मग थांबा बघा नेमकं कोणतं आणि कसं वापरावं तेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 13:59 IST2025-08-07T13:45:31+5:302025-08-07T13:59:37+5:30

Jawed Habib Hair Care Tips : Jawed Habib hair care tips : Jawed Habib hair growth tips : how to identify Best oil for hair growth tips given by Jawed Habib : केसांवर नुसतं भरभरुन तेल चोपडताय, मग थांबा बघा नेमकं कोणतं आणि कसं वापरावं तेल...

Jawed Habib Hair Care Tips Jawed Habib hair care tips Jawed Habib hair growth tips how to identify Best oil for hair growth tips given by Jawed Habib | महागडं तेल केसांना चोपडताय? जावेद हबीब सांगतात, केसांसाठी योग्य तेल कोणतं-लावायचं कसं...

महागडं तेल केसांना चोपडताय? जावेद हबीब सांगतात, केसांसाठी योग्य तेल कोणतं-लावायचं कसं...

आपले केस काळेभोर, घनदाट, लांबसडक असावेत अशी प्रत्येकीचीचं इच्छा असते. परंतु सगळ्याचजणींचे केस हवे तसेच मनासारखेचं असतील असे नाही. अनेकदा आपण (Jawed Habib Hair Care Tips) केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय करून पाहतो. केसांची अनेक पद्धतीने काळजी घेतली (Jawed Habib hair care tips) तरी सततचं प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि केमिकलयुक्त उत्पादने वापरल्यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळत नाही आणि केसगळती, रुक्षपणा, केसांना फाटे फुटणे यांसारख्या समस्या सुरू होतात.  केसांच्या या सगळ्या समस्यांवर सगळ्यात बेसिक आणि साधासोपा उपाय म्हणजे, केसांना तेलाने मालिश करणे(how to identify Best oil for hair growth tips given by  Jawed Habib).

केसांसाठी सर्वात साधासोपा उपाय म्हणून आपण आपण केसांना तेल लावतो, पण योग्य तेल कोणते आणि ते लावण्याची योग्य पद्धत कोणती, हे आपल्याला माहीत नसते. यामुळे केसांना हवे तसे पोषण मिळत नाही आणि केस अजूनच खराब होतात. या सगळ्या केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केसांसाठी नेमकं  कोणतं तेल वापरावं आणि तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती, याविषयी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. जावेद हबीब यांच्या मते, योग्य तेल आणि ते लावण्याची पद्धत ही केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. तेलामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस मजबूत व घनदाट होतात. काळेभोर, घनदाट आणि लांबसडक केसांसाठी जावेद हबीब कोणते तेल लावण्याचा सल्ला देतात आणि तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते पाहूयात. 

योग्य पद्धतीने केसांची काळजी घेण्यासाठी नेमकं काय करावं ? 

१. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब सांगतात, केसांची योग्य निगा राखण्यासाठी दररोज थोडा मेडिटेशन करावं. यामुळे स्ट्रेस कमी होतो. खरंतर, स्ट्रेस हे  केसगळतीचं सर्वात मोठं कारण मानलं जातं.

२. चांगल्या घनदाट, काळ्याभोर, घनदाट केसांसाठी हेअर केअरसाठी जावेद हबीब दररोज केस धुण्याचा सल्ला देतात. मात्र, केस धुण्यापूर्वी केस पाण्याने व्यवस्थित भिजवावेत आणि मग त्या ओल्या केसांमध्ये तेल लावावं. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी केस धुवावेत.

काले घने रेशमी बालों का राज, एक लोखंडी तवा! तव्यावरच्या तेलाची जादू, केसगळती कायमची गायब...

ग्रीन टी प्यायल्यानेच नाही चेहऱ्याला लावल्यानेही दिसाल सुंदर! ‘हा’ उपाय-ओपन पोर्सच्या समस्येचा इलाज...

३. हेअर एक्सपर्ट सांगतात, तेल नेहमी असंच वापरावं जे तुमच्या भागात सहज उपलब्ध होतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये राहत असाल, तर सरसोंचं तेल म्हणजेच मोहरीचे तेल हे सर्वोत्तम ठरेल. तसेच, जर तुम्ही दक्षिण भारतात राहत असाल, तर तिथे नारळाचं तेल अधिक मिळतं, त्यामुळे तिथे नारळाचं तेल वापरणं योग्य ठरेल.

४. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब पुढे सांगतात, चुकूनही केसांना भरपूर तेल लावून चंपी करु नका. आपण अनेकदा असं समजतो की, केसांना भरपूर तेल लावून चंपी केल्याने केस मजबूत होतील, पण खरं तर केसांवर जोरजोरात तेल चोळून चंपी केल्याने केस तुटतात आणि कमकुवत होतात. त्यामुळे केसांवर भरपूर तेल लावून तेल मालिश करण्याचे टाळा. जर केस लांब असतील, तर तेल लावल्यानंतर हलकेपणाने कंगवा केसांतून फिरवा मग ५ मिनिटे थांबा आणि केस धुवा. यासाठी तुम्ही कुठलाही नेहमीच्या वापरातील शाम्पू वापरू शकता. अशाप्रकारे काही साध्यासोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेऊ शकता आणि त्यांना दाट व मजबूत बनवू शकता.


Web Title: Jawed Habib Hair Care Tips Jawed Habib hair care tips Jawed Habib hair growth tips how to identify Best oil for hair growth tips given by Jawed Habib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.