Lokmat Sakhi >Beauty > केस गळतात, कोंडाही वाढलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळा १ पदार्थ - केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

केस गळतात, कोंडाही वाढलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळा १ पदार्थ - केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

Hair Specialist Jawed Habib Shares Coffee Shampoo Hack for Dandruff, Hair Fall & Hair Growth : कोंडा, केसगळती सारख्या समस्या होतील दूर, फक्त शाम्पूत मिसळून लावा स्वयंपाक घरातील खास पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2025 18:53 IST2025-09-30T18:51:58+5:302025-09-30T18:53:12+5:30

Hair Specialist Jawed Habib Shares Coffee Shampoo Hack for Dandruff, Hair Fall & Hair Growth : कोंडा, केसगळती सारख्या समस्या होतील दूर, फक्त शाम्पूत मिसळून लावा स्वयंपाक घरातील खास पदार्थ...

Jawed Habib coffee shampoo hack coffee hack for dandruff control coffee shampoo for hair fall coffee hair growth remedy Hair Specialist Jawed Habib Shares Coffee Shampoo Hack for Dandruff, Hair Fall & Hair Growth | केस गळतात, कोंडाही वाढलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळा १ पदार्थ - केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

केस गळतात, कोंडाही वाढलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळा १ पदार्थ - केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

केसांतील कोंडा आणि केसगळती या केसांच्या मुख्य दोन समस्या जवळपास प्रत्येकालाच सतावतात. केसांच्या या समस्यांवर अनेक उपाय व काहीवेळा अत्यंत  महागड्या ट्रिटमेंट्स (Jawed Habib coffee shampoo hack) करूनही हवा तसा फरक जाणवत नाही. भारतातील सुप्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय सांगितला आहे. जावेद हबीब यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या स्वयंपाकघरातील एक खास पदार्थ या दोन्ही समस्यांवर 'जादुई' उपाय ठरू शकतो(Hair Specialist Jawed Habib Shares Coffee Shampoo Hack for Dandruff, Hair Fall & Hair Growth).

आपल्या सगळ्यांच्याच घरात कॉफी पावडर असते. कॉफी पिण्यासोबतच, केस आणि त्वचेचे सौंदर्य राखण्यासाठी देखील याचा वापर करू शकतो. कॉफी केसांच्या अनेक समस्यांसाठी देखील तितकीच फायदेशीर ठरते. जावेद हबीब यांच्या सांगण्यानुसार, शाम्पूमध्ये कॉफी मिसळून लावल्यास, त्यातील कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स स्काल्पचे आरोग्य सुधारतात, रक्ताभिसरण वाढवतात आणि केसांच्या मुळांना मजबूत करतात. कोंडा आणि केसगळती सारख्या समस्यांपासून सुटका मिळवून, केसांना चमकदार आणि घनदाट बनवण्यासाठी शाम्पूत कॉफी मिसळून लावण्याचे नेमके काय फायदे आहेत आणि ती कशी वापरायची, ते पाहूयात. 

कॉफीचा हेअर मास्क आहे केसांसाठी फायदेशीर... 

प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, कोंडा आणि केसगळती कमी करण्यासाठी आपल्या नेहमीच्या शाम्पूमध्ये  कॉफी मिसळा. याचा वापर आठवड्यातून एकदा करा. केसांचे आरोग्य व सौंदर्य जपून ठेवण्यासाठी फारशी अतिरिक्त मेहनत नाही, ना कोणती मोठी प्रक्रिया  हा एक अत्यंत साधासोपा घरगुती उपाय आहे. तुमच्या रोजच्या शाम्पूच्या आवश्यकतेनुसार, १ ते २ चमचे कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण स्काल्प आणि केसांना लावा. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.

केसांच्या प्रकारानुसार ठरवा आठवड्यातून कितीवेळा केस धुणं आवश्यक? केसांच्या तक्रारी होतील कमी, दिसतील सुंदर...

खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा! केसांवर दिसेल कमालीचा फरक - वाटेल आधीच का नाही केला उपाय...  

शाम्पूत कॉफी मिसळून लावण्याचे मुख्य फायदे... 

१. कॉफीतील मुख्य घटक म्हणजे कॅफिन. हे कॅफिन केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कॅफिन थेट केसांच्या मुळांमध्ये प्रवेश करते आणि यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते. कॅफिन DHT नावाच्या हार्मोनला (जे केसगळतीस कारणीभूत असते) नियंत्रित करते, ज्यामुळे केस तुटणे कमी होते. स्काल्पवर कॉफी लावल्याने त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते आणि केसांची वाढ जलद होते.

२. कॉफीमध्ये अँटी-फंगल (Anti-Fungal) गुणधर्म असतात, जे कोंडा कमी करण्यास मदत करतात. कॉफीचे बारीक कण एक नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतात. हे कण स्काल्पवर जमा झालेली डेड स्किन आणि अतिरिक्त तेल काढून टाकतात. कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केसांना नैसर्गिक चमक देतात सोबतच केस मऊमुलायम देखील होतात.


Web Title : जावेद हबीब का कॉफ़ी शैम्पू हैक: बालों के झड़ने और रूसी का समाधान

Web Summary : जावेद हबीब बालों के झड़ने और रूसी से निपटने के लिए शैम्पू में कॉफी मिलाने का सुझाव देते हैं। कॉफी में मौजूद कैफीन और एंटीऑक्सीडेंट खोपड़ी के स्वास्थ्य में सुधार करते हैं, परिसंचरण को बढ़ावा देते हैं और बालों की जड़ों को मजबूत करते हैं, जिससे बाल स्वस्थ और चमकदार होते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए इस सरल उपाय का साप्ताहिक उपयोग करें।

Web Title : Jawed Habib's Coffee Shampoo Hack: Solution for Hair Fall & Dandruff

Web Summary : Jawed Habib suggests mixing coffee with shampoo to combat hair fall and dandruff. The caffeine and antioxidants in coffee improve scalp health, boost circulation, and strengthen hair roots, leading to healthier, shinier hair. Use this simple remedy weekly for best results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.