Join us
Daily Top 2Weekly Top 5

जपानी स्त्रियांच्या लांब केसांचे सिक्रेट! तांदळाचा खास पॅक; केसगळती थांबेल, कोंडा होईल कमी- १५ दिवसांत पाहा जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 13:02 IST

Rice water hair mask Marathi: Japani hair growth formula in Marathi: जपानमधील महिलांच्या लांबसडक केसांचे गुपित म्हणजे 'तांदळाचे पाणी'. हा 'मॅजिकल' हेअर मास्क कसा तयार करायचा पाहूया.

लांबसडक, काळेभोर आणि रेशमी केस हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नाहीत, तर ते आपल्या चांगल्या आरोग्याचेही लक्षण आहेत. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, रासायनिक शाम्पू आणि चुकीच्या आहारामुळे केस गळणे, अकाली पांढरे होणे किंवा केसांची वाढ खुंटणे या समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत.(Konda kami karnyache upay Marathi) पार्लरमध्ये जाऊन महागड्या 'हेअर स्पा' किंवा 'कॅरेटिन' ट्रीटमेंटवर हजारो रुपये खर्च केले जातात, पण त्याचे परिणाम तात्पुरते असतात. पण आपल्याला नैसर्गिकरीत्या केसांचा पोत सुधारायचा असेल, तर आपल्या स्वयंपाकघरातील तांदूळ हा सर्वात मोठा खजिना आहे. (Kes galati thambvnyathi gharguti upay)चीन आणि जपानमधील महिलांच्या लांबसडक केसांचे गुपित म्हणजे 'तांदळाचे पाणी'. पण तांदळाच्या पाण्यापेक्षाही दहा पट जास्त प्रभावी असलेला 'शिजवलेल्या तांदळाचा हेअर मास्क' आहे.(Rice water hair mask Marathi) तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो ॲसिड्स, व्हिटॅमिन बी, ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतात. हा 'मॅजिकल' हेअर मास्क कसा तयार करायचा पाहूया. 

नवऱ्यावर प्रेम म्हणून तुम्हीही ‘या’ ५ गोष्टी करता का? कायम दु:खी राहाल आणि नातंही होईल कमजोर

हेअर मास्क बनवण्याची पद्धत 

1. सगळ्यात आधी अर्धा कप तांदूळ घ्या ते स्वच्छ पाण्याने किमान ३ ते ४ वेळा धुवा. यामुळे तांदळावरील घाण निघून जाण्यास मदत होईल. 

2. स्वच्छ धुतलेले तांदूळ एका बाऊलमध्ये पुरेसे पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. यामुळे तांदळातील पोषक तत्वे पाण्यात उतरतात आणि तांदूळ मऊ होतात. 

3. सकाळी तांदळातले जास्तीचे पाणी काढून टाका. तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून त्याची अगदी गुळगुळीत पेस्ट तयार करा. 

4. ही पेस्ट एका भांड्यात काढून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या. शिजवताना ती सतत ढवळत राहा. ज्यामुळे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. ही पेस्ट एखाद्या क्रीमरसारखी झाल्यानंतर कंडिशनरसारखी दिसेल तेव्हा गॅस बंद करा. 

5. पेस्ट पूर्ण थंड झाल्यानंतर यात चमचाभर खोबऱ्याचे तेल किंवा कोरफडीचा गर घालून चांगले मिक्स करा. 

लावण्याची पद्धत 

आपले केस विंचरुन घ्या आणि केसांचे छोटे छोटे भाग करुन ही पेस्ट मुळांपासून टोकापर्यंत लावा. ही पेस्ट लावल्यानंतर केसांना हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा. ३० ते ४० मिनिटानंतर कोमट पाण्याने आणि शाम्पूने केस धुवा. हा मास्क आठवड्यातून एकदा लावल्याने केसांचा पोत सुधारतो तसेच केस गळती थांबण्यासही मदत होईल. आपले केस खूप कुरळे किंवा सतत गुंतत असतील. तर हा हेअर मास्क नैसर्गिक स्ट्रेटनरचे काम करतो. तसेच कोंड्याची समस्या असल्यास हा मास्क लावल्यास फायदा होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rice hair mask: Secrets for long, strong hair revealed!

Web Summary : Discover the secret to long, strong hair with a rice hair mask! Rich in nutrients, it combats hair fall, reduces dandruff, and improves hair texture naturally. Use weekly for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी