जपानी लोक विशेषतः जपानी स्त्रिया त्यांचे सौंदर्य आणि देखणेपणासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. साधारणपणे त्यांचा सडसडीत बांधा आणि चमकदार, मऊमुलायम केस हीच काय ती त्यांच्या सौंदर्याची विशेष ओळख...जपानी स्त्रियांचे केस कायमच मऊमुलायम, लांबसडक, चमकदार व निरोगी असेच असतात. तेथील स्त्रियांचे केस असे असण्यामागे फक्त अनुवांशिकताच नाही तर केसांची काळजी घेण्याची पारंपरिक पद्धत देखील विशेष आहे. जपानी स्त्रिया केसांच्या आरोग्याला खूप महत्त्व देतात आणि त्यांच्या हेअर केअर रुटीनमध्ये अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या नैसर्गिक घटकांचा आणि विशिष्ट टेक्निक्सचा समावेश करतात. केसांच्या समस्येवर तात्पुरता उपचार करण्याऐवजी, त्यांची मुळापासून काळजी घेण्यासाठी वेळ देतात (japanese hair growth secrets).
नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं, पण असरदार असं जपानी हेअर केअर जगभर प्रसिद्ध आहे. आपल्याप्रमाणे वारंवार स्टायलिंग किंवा केमिकल प्रॉडक्ट्स न वापरता जपानी लोक नैसर्गिक उपचार, हेअर केअर आणि स्कॅल्पच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात, म्हणूनच त्यांचे केस दिसतात नेहमीच घनदाट, मजबूत आणि सिल्की. जपानी महिलांचे हेअर केअर सिक्रेट्स जर आपल्या डेली रुटीनमध्येही फॉलो केले तर केसांमध्ये होणारा बदल तुम्हाला काही दिवसांतच जाणवू लागेल. चमकदार, लांबसडक, घनदाट केसांसाठी जपानी स्त्रियांचे सिक्रेट नेमकं काय ते पाहा....
जपानी स्त्रियांचे हेअर केअर सिक्रेट...
१. मसाज करण्याची पद्धत :- अनेक हेअर स्टायलिस्ट सांगतात की, जपानी लोक केस धुताना ते खूप काळजीपूर्वक आणि केसांच्या मुळांना हानी न पोहोचवता धुतात. या प्रक्रियेत शाम्पू करताना एकदा नाही, तर दोन वेळा सिलिकॉन मसाज ब्रशचा वापर केला जातो. यामुळे स्काल्पचा मसाज अधिक असरदार होतो, तसेच स्काल्पची खोलवर स्वच्छता होते आणि रक्ताभिसरण सुधारते. मसाज नेहमी डोक्याच्या मागच्या बाजूकडून वरच्या दिशेने आणि टाळूच्या बरोबर मध्यभागापर्यंत केला पाहिजे, कारण याच भागात नसांचे प्रमाण अधिक असते. ही मसाजची पद्धत केसांच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासोबतच स्काल्पवरील ताण देखील कमी करते.
केसांच्या मुळाशी तेलात कालवून ‘अशी’ लावा अळशीची पावडर, तटातट तुटणार नाहीत-येईल चमक...
२. प्री - शाम्पू ऑयलिंग :- जपानी हेअर केअरमधील सर्वात मोठे सिक्रेट म्हणजे ते लोक शाम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावतात आणि त्यानंतर केस धुतात. शाम्पू करण्यापूर्वी तेल लावल्याने स्काल्पचा pH बॅलन्स राखला जातो, स्काल्प जास्त काळ स्वच्छ राहते आणि मुळांना पोषण मिळते. असे सांगितले जाते की, पूर्वीच्या काळात तिथे राहणाऱ्या महिला केसांची वाढ सुधारण्यासाठी कॅमेलिया तेलाचा (Camellia Oil) वापर करत असत.
ब्रेस्ट इम्प्लाण्ट काढून टाकण्याचा शर्लिन चोप्राचा निर्णंय, सुंदर दिसण्याच्या नादात झाला मोठा घोळ...
३. ओले केस सुकवण्याची जपानी पद्धत :- जपानी हेअर केअर रुटीनचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे केस अलगद, हळूवारपणे सुकवणे. जपानी लोक केस धुतल्यानंतर लगेच ड्रायर न वापरता, सुकवण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल किंवा सॉफ्ट कॉटन टी-शर्ट वापरून केसांतील पाणी शोषून घेतात. यामुळे केसांना कमीत कमी फ्रिझीनेस येतो आणि केस तुटत नाहीत. केस ड्रायरने सुकवण्यापूर्वी ते केसांतील ७०% पाणी काढून टाकतात, ज्यामुळे केस निरोगी आणि स्मूद राहतात.
