Join us

जान्हवी कपूरचा २५ हजारांचा भरजरी कुर्ता! चंदेरी सिल्कवर थ्रेडवर्कची बघा सुंदर नजाकत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 15:56 IST

Janhvi Kapoor's Latest Fashion: मिली (Mili) या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री जान्हवी कपूर हिने घातलेला कुर्ता आणि प्लाझो सेट सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेण्डिंग आहे..

ठळक मुद्देसध्या दिवाळीचा सिझन असल्याने जान्हवीच्या अशा एका फेस्टीव्ह लूकची चर्चा होत आहे.

स्टाईल, फॅशन आणि चार्मिंग पर्सनॅलिटी याबाबत जेव्हा बॉलीवूडच्या सध्याच्या लेटेस्ट फळीतल्या अभिनेत्रींची नावं येतात, तेव्हा त्यात एक नाव नेहमीच पुढे असतं. ते नाव म्हणजे अभिनेत्री श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर (Shridevi's daughter Janhvi Kapoor). जान्हवीच्या आऊटफिट्सची नेहमीच चर्चा असते. वेस्टर्न कपडे ती जेवढ्या ग्रेसफुली घालते, तेवढ्याच नजाकतीने ती ट्रॅडिशनल इंडियन आऊटफिट्सही कॅरी करते. सध्या दिवाळीचा सिझन असल्याने जान्हवीच्या अशा एका फेस्टीव्ह लूकची चर्चा होत आहे. भरजरी थ्रेडवर्क असणारा कुर्ता आणि प्लाझो अशा पद्धतीचा तिचा हा ड्रेस तब्बल २५ हजारांचा आहे (Janhvi Kapoor's sheer slit kurta and palazzo pants worth Rs.25K). 

 

जान्हवीच्या ड्रेसची खासियत जान्हवीच्या या ड्रेसचा रंगही अतिशय वेगळा आहे. निळसर हिरव्या sage green रंगाच्या या ड्रेसमधले फोटो जान्हवीने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्याला "Portraits of a girl out of a freezer...and into your hearts?" असे कॅप्शन दिले आहे.

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

तिचा हा ड्रेस shelves of the luxury prêt and couture या कलेक्शनमधला असून तो कविता आणि प्रियांका जैन यांनी डिझाईन केला आहे. कुर्ता आणि प्लाझो हे दोन्हीही चंदेरी सिल्क या प्रकारातले असून कुर्त्याच्या गळ्याला आणि बाह्यांना खूप हेवी प्रकारातली डोरी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. कंबरेच्या खाली असणारा कुर्त्याचा भाग ट्रान्सफरंट असून तो एखाद्या जॅकेटप्रमाणेही भासतो.

 

सुंदर मेकअप आणि आकर्षक ॲक्सेसरीजजान्हवीचा ड्रेस मुळातच शिमरी, शायनी आहे. त्यामुळे तिने हलका, लाईट मेकअप केला आहे. शिवाय ज्वेलरी किंवा ॲक्सेसरीज या बाबतीतही ती खूपच सिलेक्टीव्ह दिसून आली आहे.

एक चमचा दालचिनीची जादू! दिवाळीत चेहऱ्यावर चमक, मनात उत्साह हवा? करुन बघा हा झटपट उपाय

एका हातात ऑक्सिडाईज प्रकारातले जाड ब्रासलेट, कानात तशाच पद्धतीने लांब झुमके आणि दुसऱ्या हातात काळा खडा असणारी एक अंगठी. अशा एवढ्याच ॲक्सेसरीजमध्येही जान्हवी अतिशय मोहक दिसत आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनजान्हवी कपूर