Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > पार्लरचं महागडं वॅक्सिंग विसरा! गूळ हळदीची इवलीशी पोटली सहज करेल हेअर रिमूव्ह - ना दुखणं, खुपणं सुपरईझी उपाय...

पार्लरचं महागडं वॅक्सिंग विसरा! गूळ हळदीची इवलीशी पोटली सहज करेल हेअर रिमूव्ह - ना दुखणं, खुपणं सुपरईझी उपाय...

jaggery lemon turmeric wax : natural wax for facial hair removal : how to remove facial hair naturally at home : वेदनेशिवाय त्वचेवरील नको असलेले केस काढण्याचा सहजसोपा इन्स्टंट घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 15:18 IST2026-04-01T15:03:48+5:302026-04-01T15:18:52+5:30

jaggery lemon turmeric wax : natural wax for facial hair removal : how to remove facial hair naturally at home : वेदनेशिवाय त्वचेवरील नको असलेले केस काढण्याचा सहजसोपा इन्स्टंट घरगुती उपाय...

jaggery lemon turmeric wax how to remove facial hair naturally at home natural wax for facial hair removal | पार्लरचं महागडं वॅक्सिंग विसरा! गूळ हळदीची इवलीशी पोटली सहज करेल हेअर रिमूव्ह - ना दुखणं, खुपणं सुपरईझी उपाय...

पार्लरचं महागडं वॅक्सिंग विसरा! गूळ हळदीची इवलीशी पोटली सहज करेल हेअर रिमूव्ह - ना दुखणं, खुपणं सुपरईझी उपाय...

चेहऱ्यावर किंवा शरीरावर येणारे अनावश्यक केस आपल्या सौंदर्यात अडथळा ठरतात. आपले गाल, ओठा किंवा हनुवटी अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागांवर बारीक केस येतात, जे अगदीच चटकन दिसत नाही परंत्तू आपला संपूर्ण लूक बिघडवते. आपल्या त्वचेवर हे नको असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग, प्लकिंग असे अनेक उपाय करतो... इतकंच नाही तर काहीजणी यासाठी पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिंगच्या वेदना सहन करण्यासोबतच दर महिन्याला त्यावर हजारो रुपये खर्च करतात. त्वचेवरील असे नको असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी उपाय करताना त्वचेची काळजी घेणं देखील  तितकंच गरजेच असत...(jaggery lemon turmeric wax).

थ्रेडींग, वॅक्सिंग, प्लकिंग करताना अनेकदा त्वचेला इजा होण्याची शक्यता असते यासोबतच, वारंवार केमिकल्सयुक्त उपाय केल्यानं त्वचेवर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. अशा परिस्थितीत, घरच्याघरीच काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करता येऊ शकतात. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने अनावश्यक केसांची वाढ कमी करण्यास आणि त्वचा मऊ व स्वच्छ ठेवण्यास मदत मिळू शकते. या घरगुती  उपायाने केवळ त्वचेवरील केसच निघत नाहीत, तर त्वचेचा रंगही (natural wax for facial hair removal) उजळतो आणि फारशा वेदनाही (how to remove facial hair naturally at home) सहन कराव्या लागत नाहीत. त्वचेवरील केस काढण्याचा हा नेमका उपाय काय आहे ते पाहूयात... 

त्वचेवरील केस काढण्याचा हा नेमका उपाय काय ? 

त्वचेवरील केस काढण्याचा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला १ छोटा गुळाचा खडा, २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून खोबरेल तेल, १ छोटी कॉटनची जाळीदार बँडेजची पट्टी इतकं साहित्य लागणार आहे. 

सुरकुत्या विसरा आणि तरुण दिसा! हजारो रुपये घालवण्यापेक्षा लावा 'हा' फेसपॅक - चेहरा दिसेल विशीतल्या तरुणीसारखा...

तासंतास मेहेंदी लावूनही रंग येत नाही? मग मेहेंदी भिजवताना करा १ छोटा बदल - केस होतील रेशमी येईल गडद रंग... 

सगळ्यात आधी एक छोटा पॅन घेऊन तो गॅसच्या मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावा. त्यानंतर या गरम पॅनमध्ये गुळाचा खडा घालून तो व्यवस्थित वितळवून त्याचा पाक तयार करून घ्यावा. या गुळाच्या पाकात हळद, लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण थोडं जेल सारख हलकंसं घट्ट होईपर्यंत नीट शिजवून घ्यावं. मग एका स्टिलच्या डिशला थोडंसं खोबरेल तेल नीट पसरवून लावावं, मग त्यावर हे गूळ, हळद आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण ओतून घ्यावं. मग चमच्याच्या मदतीने हे मिश्रण थोड हलवून घ्यावं. आता १ छोटी कॉटनची जाळीदार बँडेजची पट्टी अंथरून त्यावर हे मिश्रण थोडं कोमट असतानाच घालावं आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करून घ्यावी. 

चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...

ही तयार पोटली हलकीशी कोमट असतानाच केसांवर ही पोटली टेकवून हलकेच दाब देऊन खेचावं म्हणजे, वेदनेशिवायही केस अगदी सहजपणे काढता येणं शक्य होत. हा घरगुती उपाय एका नॅचरल वॅक्सप्रमाणेच काम करतो. जेव्हा आपण गूळ वितळवून त्याचा पाक करतो, तेव्हा त्याला एक चिकटपणा येतो. लिंबाचा रस या पाकाला जास्त कडक होऊ देत नाही आणि त्याला 'जेल' सारखा पोत देतो. जेव्हा ही कोमट पोटली आपण त्वचेवर दाबून ओढतो, तेव्हा गुळाचा चिकटपणा अनावश्यक केसांना घट्ट पकडतो. ओढल्यामुळे हे केस मुळापासून निघण्यास मदत होते. कोमट उष्णतेमुळे त्वचेची रोमछिद्रे थोडी मोकळी होतात, ज्यामुळे केस निघताना व्हॅक्सिंगच्या तुलनेत कमी वेदना होतात.

 हा उपाय करण्याचे फायदे... 

१. या नैसर्गिक पद्धतीचा वारंवार वापर केल्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. परिणामी, नवीन येणाऱ्या केसांची वाढ हळूहळू कमी होऊ लागते.

२. या मिश्रणात हळद असल्यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि इन्फेक्शनचा धोका टळतो. हळद आणि लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

३. जेव्हा आपण ही पोटली ओढतो, तेव्हा केवळ केसच नाही तर त्वचेवरील डेड स्किन देखील निघून जातात, ज्यामुळे त्वचा अधिक मऊ आणि गुळगुळीत वाटते. 

४. पार्लरमधील व्हॅक्स किंवा हेअर रिमूव्हल क्रीममध्ये केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचा काळी पडू शकते. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे त्वचेवर कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत.

५. मिश्रणात खोबरेल तेल असल्यामुळे केस काढल्यानंतर त्वचा कोरडी पडत नाही, त्वचेला नैसर्गिक ओलावा पुरवते.


Web Title : महंगी वैक्सिंग को अलविदा! गुड़-हल्दी की पोटली से आसान हेयर रिमूवल

Web Summary : दर्दनाक वैक्सिंग को छोड़ें! एक साधारण गुड़ और हल्दी की पोटली घर पर दर्द रहित, आसान हेयर रिमूवल प्रदान करती है। यह प्राकृतिक उपाय बालों की जड़ों को कमजोर करता है, त्वचा को निखारता है, और कठोर रसायनों के बिना मृत कोशिकाओं को हटाता है, जिससे त्वचा नरम और चिकनी हो जाती है।

Web Title : Goodbye Expensive Waxing! Jaggery-Turmeric Potli for Easy Hair Removal

Web Summary : Ditch painful waxing! A simple jaggery and turmeric potli offers painless, easy hair removal at home. This natural remedy weakens hair roots, brightens skin, and removes dead cells without harsh chemicals, leaving skin soft and smooth.