पावसाळ्यात आपल्याला केसांची अधिक काळजी घ्यावी लागते.(Hair Care Tips) केसांना धूळ, प्रदूषणपासून वाचवण्यासाठी आणि सॉफ्ट, सिल्की बनवण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. पावसाळ्यात केसात ओलावा तयार झाल्याने उवा आणि लिखा होण्याची समस्या उद्भवते.(monsoon dandruff and lice care) या समस्येवर उपचार करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि औषधे मिळतात. परंतु याचा जास्त वापर केल्यास यात असणारे रसायन केसांचे नुकसान करते. (monsoon hair problems solutions)
केसात उवा-लिखा झाल्यामुळे केसांना सारखी खाज सुटते. केस मोकळे सोडण्याची देखील आपल्याला भीती वाटू लागते.(hair hygiene during rainy season) स्काल्पवर घाम जमा झाल्यामुळे डोकं सतत खाजवत असेल तर उवा किंवा पुरळ झाल्या असतील असं अनेकांना वाटते.(monsoon hair problems solutions) पण या उवा- लिखा डोक्यातून काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर केसांच्या अनेक समस्या दूर होतील.(hair care tips for rainy season)
श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो
1. कडुलिंबामध्ये अँटी- बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मासाठी ओळखले जाते. यात असणारे घटक केसांमधील उवा काढून टाकण्यास मदत करतात. यासाठी आपल्याला कडुलिंबाची पाने घेऊन त्याची पेस्ट तयार करायला हवी. ही पेस्ट टाळूला नीट लावा. १ ते २ तासांनी केस शाम्पूने स्वच्छ धुवा. कडुलिंबामध्ये असणारा कडूपणा उवा-लिखा मारण्यास मदत करतो.
2. ऑलिव्ह ऑइल हे उवांना श्वास घेण्यापासून रोखते, ज्यामुळे त्या मरतात. केसांमधील घाण काढून टाकण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइल हलके गरम करुन ते टाळूला आणि केसांना लावा. झोपताना शॉवर कॅप घाला. सकाळी केस कंगवा किंवा फणीने विंचरा, नंतर केसांना शाम्पू लावून केस धुवा.
3. पांढऱ्या व्हिनेगरमध्ये आम्ल असते. जे केसांना चिकटलेल्या घाणीला बाहेर काढण्यास मदत करते. त्यासाठी पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात घेऊन मिसळा. शाम्पू केल्यानंतर केसांना आणि टाळूला हे मिश्रण लावा. १५ ते २० मिनिटानंतर कंगव्याने किंवा फणीने केस विंचरा. नंतर साध्या पाण्याने केस धुवा.
4. कांद्याचा रस टाळूला किंवा केसांच्या मुळांवर लावा. कमीत कमी ३० मिनिटे किंवा १ तास राहू द्या. नंतर केस शाम्पूने धुवा. कांद्याच्या वासामुळे उवा - लिखा मरतात. तसेच केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
5. टी ट्री ऑइरमध्ये अँटीसेप्टिक आणि कीटकनाशक गुणधर्म असतात जे केसांती ओवा, लिखा आणि कोंडा काढून टाकण्यास मदत करते. शाम्पूमध्ये ५ ते ६ थेंब टी ट्री ऑइलचे घाला. या मिश्रणाने केस धुवा. टाळूवर हा शाम्पून ५ ते १० मिनिटे राहू द्या. ऑलिव्ह ऑइलमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळून केसांना लावू शकता. यामुळे टाळूची खाज आणि जळजळ कमी होईल.