Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर....

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर....

Is It Okay To Apply Oil On Hair In Summer?: उन्हाळ्यात डोक्याला तेल लावून मालिश करणं केसांसाठी कितपत योग्य ठरू शकतं?(hair care tips for summer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 16:19 IST2025-04-29T16:18:20+5:302025-04-29T16:19:04+5:30

Is It Okay To Apply Oil On Hair In Summer?: उन्हाळ्यात डोक्याला तेल लावून मालिश करणं केसांसाठी कितपत योग्य ठरू शकतं?(hair care tips for summer)

is it okay to apply oil on hair in summer? which oil is perfect for hair care in hot summer, hair care tips for summer | उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर....

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर....

Highlightsतेल लावल्यानंतर कडक उन्हामध्ये बाहेर जाणे टाळा. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पंखा, कुलर असूनही अंगातून, डोक्यातून घामाच्या धारा येत असतात. एसीच्या गारेगार हवेत तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण आपण काही २४ तास एसीमध्ये बसू शकत नाही. त्यामुळे खूप घाम येऊन या दिवसांत आपलं डोकं बऱ्याचदा ओलंच राहतं. अशा ओलसर, घामट झालेल्या केसांना तेल लावणं कितपत योग्य आहे, त्याचा खरंच या दिवसांत केसांना फायदा होऊ शकतो का (hair care tips for summer), या दिवसांत डोक्याला तेल लावायचंच असेल तर ते कोणतं आणि कशा पद्धतीने लावावं (which oil is perfect for hair care in hot summer?), याविषयीही ही थोडी माहिती...(is it okay to apply oil on hair in summer?)

 

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं योग्य आहे का?

एक्सपर्ट असं सांगतात की या उन्हाळ्याच्या घामट दिवसांमध्ये डोक्याला तेल लावायचं असेल तर बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल, कॅस्टर ऑईल असं कोणतंही घट्ट तेल वापरू नका. या दिवसांत अतिशय हलक्या आणि केसांना खूप चिकटून न राहणाऱ्या तेलाचा वापर करावा.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

कारण चिकट तेलामुळे आधीच घामट झालेले केस आणि डोक्याची त्वचा आणखीनच खराब होते. त्यामध्ये धूळ, घाण चिटकून बसते. यामुळे मग डोक्याच्या त्वचेचे ओपन पोअर्स बंद होऊन कोंड्याचे प्रमाण वाढणे, डोक्यात फोड येणे, खाज येणे असे त्रास सुरू होतात.

 

त्यामुळे या दिवसांत केसांना आर्गन ऑईल, खोबरेल तेल लावून मालिश करणं अधिक योग्य. तसेच तेल नेहमीपेक्षा थोडे कमी प्रमाणात घेतले तरी चालेल. डोक्यातल्या ओलसरपणामुळे आणि सततच्या घामामुळे केसांची मुळं आधीच नाजुक झालेली असतात.

जेवणात रंगत आणणारी कैरी- टोमॅटोची चटकदार चटणी!! कुणाल कपूर स्पेशल रेसिपी- करायला सोपी 

त्यामुळे तेल लावताना खूप जोरात चोळू नका. बोटाच्या टोकांनी हळूवारपणे गोलाकार फिरवत डोक्याला मसाज करा. तसेच केस धुण्याच्या एक ते दोन तास आधीच केसांना तेल लावून ठेवा. तेल लावल्यानंतर कडक उन्हामध्ये बाहेर जाणे टाळा. 


 

Web Title: is it okay to apply oil on hair in summer? which oil is perfect for hair care in hot summer, hair care tips for summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.