Join us
Daily Top 2Weekly Top 5

आईने लावलेली सवय भारी की घातक? रात्री केसांना तेल लावून झोपणं चांगलं की केसांचं वाटोळं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2025 16:00 IST

hair oiling at night: applying oil before sleep: hair care habits: केसांना तेल कधी आणि किती वेळ लावायला हवे.

लहानपणी आई-आजी आपल्या केसांना तेल लावून झोपवायची. यामुळे केस मजबूत होतात, वाढतात आणि गळतही नाही असा त्यांचा समज होता.(hair care habits) त्यामुळे अनेकांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा किंवा रात्री केसांना तेल लावून झोपण्याची सवय होती.(hair oiling at night) पण बदलेल्या जीवनशैलीनुसार, प्रदूषण, त्वचेच्या प्रकारांमध्ये हीच सवय आज काही लोकांसाठी फायदेशीर न राहता घातक ठरू शकते, हे अनेकांना माहीतच नसतं.(applying oil before sleep)आजकाल केसगळती, टक्कल पडणं, केस पातळ होणं अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यामागे हार्मोन्स, ताणतणाव, चुकीचा आहार यासोबतच चुकीच्या हेअर केअर सवयीही कारणीभूत असतात. रात्रभर केसांना तेल ठेवणं ही त्यातलीच एक सवय ठरू शकते. टाळू चिकट-तेलकट झाल्यामुळे जास्त घाम येतो किंवा ज्यांना कोंडा, खाज बुरशीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी ही सवय अधिक धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया केसांना तेल कधी आणि किती वेळ लावायला हवे. 

फेअर, व्हाइटीश की डस्की? प्रत्येक स्कीन टोनवर सूट होणाऱ्या ५ लिपस्टिक शेड्स, ओठ दिसतील सुंदर- लूकही येईल खुलून

आपण रोज केसांना तेल लावावे की नाही हे केसांच्या प्रकारावर अवलंबून असते. आपले केस कोरडे आणि निर्जीव असतील तर तेल लावणे ठीक. पण केस आधीच तेलकट असतील तर केसांना तेल लावू नका. कोरड्या केसांना आठवड्यातून २ ते ३ वेळा तेल लावू शकता. तसेच रात्रभर केसांना तेल लावल्याने फायदा होत नाही. ज्यामुळे हळूहळू केसात कोंडा किंवा बुरशी तयार होते. 

केसांना तेल हे धुण्यापूर्वी ३० मिनिटांआधी लावायला हवे. रात्रभर केसांना तेल लावल्यास कोंडा वाढू शकतो आणि केसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. केसांना तेल लावल्याने केस गळती कमी होते. तसेच टाळूला पोषण मिळते, मुळे मजबूत होतात, रक्ताभिसरण वाढते आणि केस तुटण्यापासून रोखले जातात. केसांच्या अनेक समस्या सहजपणे टाळता येतात. केसांना मजबूत करायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Night hair oiling: Good or bad? The truth revealed!

Web Summary : Oiling hair overnight, a childhood habit, may harm some. It can worsen dandruff, fungal issues, and hair fall. Instead, oil hair 30 minutes before washing, especially if dry. Avoid if hair is oily. This nourishes the scalp and strengthens hair roots.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी