महिलांच्या चेहऱ्यावर केस असणं ही काय फार मोठी गोष्ट नाही. प्रत्येकीलाच कपाळ, हनुवटी, गाल, नाकाखाली (upper lips) अशा ठिकाणी बारीक केस असतात.( facial hair making you less confident?) मात्र काही जणींच्या चेहऱ्यावरील केसाचे प्रमाण जास्त असते. ते लांबूनसुद्धा दिसून येतात. आता असे केस असणं ही काय फार मोठी किंवा लाजिरवाणी गोष्ट नाही.( facial hair making you less confident?) पण आजकाल बाह्य सौंदर्याला आपण खूपच जास्त महत्त्व देतो.( facial hair making you less confident?) मुलींचा आत्मविश्वास चेहऱ्यावरील या केसांमुळे कमी होतो. याविषयावर माहिती देताना डॉ. हंसाजी योगेंद्र त्यांच्या योगा इंस्टिट्यूट या चॅनलवर म्हणतात, एवढा विचार करण्यासारखी समस्याही नाही. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावा ते आपल्याला समजायला हवं.
त्यापुढे म्हणतात, हार्मोनल चेंजेसमुळे या चेहऱ्यावरील केसांची वाढ होते. ज्या ज्या मुलींचे हार्मोन्स फार असंतुलित असतात, अशा मुलींचे चेहऱ्यावरील केस अति वाढतात. त्याबद्दल मुळात वाईट वाटून घेण्याची गरज नाही. तरीही तुम्हाला ते काढायचेच असतील तर रसायने न वापरता नैसर्गिक प्रसादने वापरा.
घरच्याघरी हे उपाय करून बघा.
१. २ चमचे हळद, ३ चमचे बेसन, लिंबाचा रस, २ चिमटी चंदन पावडर घेऊन त्यांचे मिश्रण तयार करा. पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. महिनाभर असे नियमित केल्यास चेहऱ्यावरील केसांची वाढ खुंटते.
२. लिंबुरस आणि साखर एकत्र घ्या. त्याची पाण्यात कालवून जाडसर पेस्ट तयार करा.( facial hair making you less confident?) या मिश्रणाने रोज चेहरा घासा. सहा आठवड्यात केसांची वाढ कमी होईल.
३. लिंबु व मधाचा मास्क बनवून लावा. २० मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्यात कापड बुडवून चेहरा पुसा.
४. योग्य आहार घ्या. ज्यामुळे हार्मोनल इनबॅलेन्स होणार नाही.
त्यांनी अशा उपायांचा वापर करा असे सांगितले आहे. त्या पुढे सांगतात शरीर त्यानुसार काम करत असते. आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टींचा बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही. या घरगुती उपायांनी जर केस येणं कमी झालं नाही तरी कुडतं न बसता आयुष्य हसत जगा.