Lokmat Sakhi >Beauty > काळवंडलेले ओठ होतील गुलाबी सुंदर! करून पाहा घरगुती लीप मास्कची जादू - सोपा घरगुती उपाय...

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी सुंदर! करून पाहा घरगुती लीप मास्कची जादू - सोपा घरगुती उपाय...

Know How To Make Lip Care Mask At Home : Instantly Brighten Dark Lips Naturally At Home : Homemade Lip Mask for Dark Lips : natural home remedy to lighten dark lips : Natural Home Remedy to Lighten Dark Lips : घरगुती लीप मास्कच्या मदतीने अगदी स्वस्तात, ओठांचा गुलाबीपणा आणि सौंदर्य टिकवून ठेवता येते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2025 12:32 IST2025-06-12T12:18:12+5:302025-06-12T12:32:55+5:30

Know How To Make Lip Care Mask At Home : Instantly Brighten Dark Lips Naturally At Home : Homemade Lip Mask for Dark Lips : natural home remedy to lighten dark lips : Natural Home Remedy to Lighten Dark Lips : घरगुती लीप मास्कच्या मदतीने अगदी स्वस्तात, ओठांचा गुलाबीपणा आणि सौंदर्य टिकवून ठेवता येते...

Instantly Brighten Dark Lips Naturally At Home Natural Home Remedy to Lighten Dark Lips Homemade Lip Mask for Dark Lips | काळवंडलेले ओठ होतील गुलाबी सुंदर! करून पाहा घरगुती लीप मास्कची जादू - सोपा घरगुती उपाय...

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी सुंदर! करून पाहा घरगुती लीप मास्कची जादू - सोपा घरगुती उपाय...

सुंदर, गुलाबी, मऊमुलायम ओठ आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. ओठांच्या नैसर्गिक सौंदर्याने आपल्या चेहऱ्याला एक वेगळंच तेज मिळतं. ओठ जितके सुंदर तितकेच आपला लूक देखील अधिकच खुलून दिसतो, असे असले तरी ओठांचे सौंदर्य टिकवून ठेवणे सोपे नाही. वयोमानानुसार किंवा इतर अनेक कारणांमुळे आपल्या ओठांचे सौंदर्य (Instantly Brighten Dark Lips Naturally At Home) बिघडू शकते. जसजसे वय वाढत जाते तसे त्वचेप्रमाणे ओठांमध्ये (Homemade Lip Mask for Dark Lips) देखील बदल होत जातात. ओठांची त्वचा काळवंडते, ओठ सुकतात कोरडे पडतात, ओठ सोलवटून निघतात, वारंवार ओठाचे पापुद्रे निघतात. यामुळे ओठ फारच खराब दिसतात. यासाठीच काहीजणी वेगवेगळ्या प्रकारचे (natural home remedy to lighten dark lips) महागडे उपचार किंवा अनेक ट्रिटमेंट्स करून घेतात(Natural Home Remedy to Lighten Dark Lips).

ओठांचा मऊमुलायमपणा आणि गुलाबी रंग टिकवून ठेवण्यासाठी महागड्या उपचारांपेक्षा काहीवेळा साधेसोपे घरगुती उपायही फायदेशीर ठरु शकतात. यासाठीच, आपण चेहऱ्याप्रमाणेच ओठांना देखील घरगुती लीप मास्क तयार करून लावू शकतो. या घरगुती लीप मास्कच्या वापराने अगदी स्वस्तात घरच्याघरीच ओठांचा गुलाबीपणा आणि सौंदर्य टिकवून ठेवता येऊ शकते. काळवंडलेल्या ओठांचे सौंदर्य परत आण्यासाठी करून पाहा हा खास घरगुती उपाय...    

साहित्य :- 

१. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून 
२. मध - १ टेबलस्पून 
३. बीटरुट पावडर - १ टेबलस्पून
४. खोबरेल तेल - २ टेबलस्पून

मूठभर कांद्याच्या टरफलांनी करा नॅचरल हेअर कलर, पांढरे केसही होतील १५ मिनिटांत काळेभोर...

घनदाट- काळ्याभोर लांबसडक केसांसाठी मोहरीच्या तेलात मिसळा ३ पदार्थ, केसांचं रुपच पालटेल...

कृती :- 

सगळ्यातआधी एका बाऊलमध्ये, प्रत्येकी १ टेबलस्पून एलोवेरा जेल, मध, बीटरुट पावडर घेऊन हे सगळे जिन्नस चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावेत. आता या तयार मिश्रणात खोबरेल तेल घालूंन पुन्हा एकदा हे सगळे मिश्रण कालवून एकजीव करावे. आपल्या ओठांसाठी लीप मास्क तयार आहे. हा तयार  लिप मास्क काचेच्या हवाबंद बाटलीत भरुन स्टोअर करुन ठेवावा.   

याचा वापर कसा करावा ? 

रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर हा लीप मास्क व्यवस्थित पसरवून लावून घ्यावा. त्यानंतर २ ते ३ मिनिटे बोटांच्या मदतीने ओठांवर हलकेच मसाज करून घ्यावा. मग रात्रभर हा लीप मास्क ओठांवर तसाच ठेवून द्यावा. सकाळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.   

केस धुतांना शाम्पूत मिसळा ‘हे’ औषधी पाणी, केसांच्या सर्व समस्या कायमच्या होतील दूर...


ओठांवर लीप मास्क लावण्याचे फायदे... 

१. एलोवेरा जेल :- ओठांच्या त्वचेवर सौम्य कवच तयार करून ताजेपणा, आर्द्रता आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.  
२. मध :- मधाच्या आर्द्र गुणधर्मामुळे ओठांना पोषण मिळते, ओठांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. 
३. बीटरुट पावडर :- बीटरुट पावडर ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग आणि उजळपणा आणण्यास मदत करते. 
४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल ओठांना खोलवर मॉइस्चरायझिंग करून मऊमुलायम करते.

Web Title: Instantly Brighten Dark Lips Naturally At Home Natural Home Remedy to Lighten Dark Lips Homemade Lip Mask for Dark Lips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.