Join us  

इन्स्टंट ग्लो हवा, पपई आइस क्यूब बनवा; घरच्या घरी पपया फेशियल करा हवं तेव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 6:52 PM

पार्लरला जाऊन सौंदर्योपचार करण्यासाठी अजिबातच वेळ नाही ना, मग हे घरगुती उपाय ट्राय करा आणि इन्स्टंट ग्लो मिळवा..

ठळक मुद्देसगळ्या स्किन टाईपसाठी हे फेशियल फायद्याचे ठरते.

घरातली कामं, बाहेरची कामं यामध्येच अनेक जणी इतक्या व्यस्त असतात की पार्लरला जाऊन फेशिअल, क्लिनअप असे सौंदर्योपचार करून घ्यायला वेळच मिळत नाही. पण काळजी करू नका. पार्लरला जाऊनच तुमची त्वचा चांगली होईल आणि तुम्ही टापटीप दिसू लागाल, असं काही नसतं. घरच्या घरी देखील अशा अनेक गोष्टी करता येतात, ज्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार, तजेलदार दिसू शकते. आपल्या स्वयंपाक घरातलेच अनेक पदार्थ यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात. पपई हा तसाच एक पदार्थ. पपई खाणं हे आरोग्यासाठी जसं फायदेशीर असतं, तसंच पपईचं फेशिअल करणं आपल्या त्वचेसाठी अतिशय पोषक असतं. म्हणूनच घरच्या घरी पपईचे आइस क्यूब तयार करा आणि पपई फेशिअल करून इन्स्टंट ग्लो मिळवा.

 

चेहरा उजळविण्यासाठी आणि स्किन टाईटनिंगसाठी पपई अतिशय उपयुक्त आहे. त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठीही पपईचा खूप उपयोग होते. तसंच पपईमध्ये ॲण्टी एजिंग गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पपईचा नियमित उपयोग जर त्वचेसाठी केला, तर त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होत जातात. पपईच्या या सगळ्या गुणांचा फायदा आपल्या त्वचेला व्हावा, असं वाटत असेल तर लगेचच हे अतिशय सोपं असणारं पपिता फेशियल ट्राय करून बघा. 

 

कसे बनवायचे पपई आइस क्यूब?- पपई आइस क्यूब बनविण्यासाठी आपल्याला अर्धा कप पपईची प्यूरी लागणार आहे. या प्यूरीमध्ये २ टेबलस्पून गुलाबजल आणि १ टेबलस्पून मध आणि अर्धा टीस्पून हळद टाकावी. - हे सगळे साहित्य एका बाऊलमध्ये टाकून त्याला व्यवस्थित हलवून घ्या आणि बर्फाच्या ट्रे मध्ये हे मिश्रण भरुन रात्री क्यूब तयार करण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्या.- अशाप्रकारे तुमचे पपई आइस क्यूब तयार झाले.

 

कसे करायचे पपिता फेशियल?- पपिता फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे नेहमीचे फेसवॉश वापरून चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यानंतर दोन आइस क्यूब एका सूती कपड्यात टाका आणि तो कपडा चेहऱ्यावरून गोलाकार दिशेने फिरवा.- या आइस क्यूबने हलक्या हाताने चेहऱ्याची व्यवस्थित मालिश करा. डोळ्याखालील आणि वरील भागावरही आइस क्यूब फिरवा.

 

- हा उपाय दररोज दिवसातून एकदा करा. मसाज झाल्यानंतर चेहरा पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्या. आता कोणतेही फेसवॉश न लावता साध्या पाण्याने चेहरा धुवा.- चेहरा धुतल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित मॉईश्चरायझर लावा. त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी तुम्ही मॉईश्चरायझर लावण्याआधी टोनरही लावू शकता. - सगळ्या स्किन टाईपसाठी हे फेशियल फायद्याचे ठरते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स