sensitive skin ? मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या ? - Marathi News | Inadvertent mistakes in sensitive skin can also be costly. What are these mistakes? | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > sensitive skin ? मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या ?

sensitive skin ? मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या ?

त्वचेवर वेगवेगळ्या ब्यूटी प्रोडक्टसचा वापर , वातावरण बदल, जीवनशैली यामुळे त्वचा संवेदनशील होते. अनेकजणींना आपली त्वचा संवेदनशील आहे हे माहित असतं. पण संवेदनशील त्वचा जपण्यासाठी जे उपाय आवश्यक असतात ते मात्र केले जात नाही आणि संवेदनशील त्त्वचेचं आणखीनच नुकसान होतं. संवेदनशील त्वचेबाबतच्या चुका त्वचेचं आणखी नुकसान करतात. या चुका अर्थातच अनावधानानं होतात. या चुका कोणत्या हे समजलं तर टाळता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:17 PM2021-05-17T19:17:38+5:302021-05-17T20:43:15+5:30

त्वचेवर वेगवेगळ्या ब्यूटी प्रोडक्टसचा वापर , वातावरण बदल, जीवनशैली यामुळे त्वचा संवेदनशील होते. अनेकजणींना आपली त्वचा संवेदनशील आहे हे माहित असतं. पण संवेदनशील त्वचा जपण्यासाठी जे उपाय आवश्यक असतात ते मात्र केले जात नाही आणि संवेदनशील त्त्वचेचं आणखीनच नुकसान होतं. संवेदनशील त्वचेबाबतच्या चुका त्वचेचं आणखी नुकसान करतात. या चुका अर्थातच अनावधानानं होतात. या चुका कोणत्या हे समजलं तर टाळता येतात.

Inadvertent mistakes in sensitive skin can also be costly. What are these mistakes? | sensitive skin ? मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या ?

sensitive skin ? मग अनावधानानं होणाऱ्या चुकाही महागात पडतात. या चुका कोणत्या ?

Next
Highlightsअनेकजणी आपली त्वचा संवेदनशील आहे हे माहीत असूनही तीव्र स्वरुपाचे क्लिन्जर वापरतात. आणि तेही खसाखसा घासून लावतात. यामुळे त्वचेचा नैसर्गिक समतोल ढळतो.संवेदनशील त्वचेसाठी टोनर वापरताना ते अल्कोहोल आणि तीव्र रासायनिक घटक विरहितच असले पाहिजेत.संवेदनशील त्वचेसाठी सौम्य स्वरुपाची उत्पादनं वापरणं जितकं महत्त्वाचं तितकंच त्वचेवर ती वापरताना ती हळुवारपणे लावणं आवश्यक असतं.

कोरडी त्वचा, तेलकट त्वचा, मिश्र त्वचा यासोबतच त्वचेचा आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे संवेदनशील त्वचा. हा त्वचेचा प्रकार पटकन ओळखू येत नाही. चेहेऱ्यावरची त्वचा तेलकट होतेय, फोड,मुरुम येताय म्हणून तेलकट त्वचेसाठीचे उपाय केले जातात. पण हे उपाय कामास आले नाही की मग आपली त्वचा कदाचित कोरडी असावी हा समज बाळगून कोरड्या त्वचेसाठी जी काळजी घेतली जाते त्याचे प्रयोग चेहेऱ्यावर होतात. पण लक्षात येतं की आपली त्वचा यालाही प्रतिसाद देत नाहीये. त्वचेवर काहीही प्रयोग उपाय केले तरी त्वचा अस्वस्थ होते. आणि त्वचेची ही अस्वस्थता हेच त्वचा संवेदनशील असल्याचं मुख्य लक्षण आहे.

त्वचेवर वेगवेगळ्या ब्यूटी प्रोडक्टसचा वापर , वातावरण बदल, जीवनशैली यामुळे त्वचा संवेदनशील होते. अनेकजणींना आपली त्वचा संवेदनशील आहे हे माहित असतं. पण संवेदनशील त्वचा जपण्यासाठी जे उपाय आवश्यक असतात ते मात्र केले जात नाही आणि संवेदनशील त्त्वचेचं आणखीनच नुकसान होतं. संवेदनशील त्वचेबाबतच्या चुका त्वचेचं आणखी नुकसान करतात. या चुका अर्थातच अनावधानाने होतात. या चुका कोणत्या हे समजलं तर टाळता येतात.


 

त्वचेस हानी पोहोचवणाऱ्या चुका कोणत्या?

चेहेरा धुण्यासाठी तीव्र स्वरुपाचे प्रोडक्सटस वापरणे:- संवेदनशील त्वचा जपताना त्वचेसाठी सौम्य स्वरुपाचे क्लिन्जिंग उत्पादनं वापरणं महत्त्वाचं आहे. असे क्लिन्जर ज्यात रसायनांचा वापर नसून नैसर्गिक घटकांचा समावेश असेल. विशेषत: त्वचाविकार तज्ज्ञांनी संवेदनशील त्वचेसाठी ज्या उत्पादनांची शिफारस केलेली असते अशी उत्पादनं वापरावीत. इतकंच नाही तर अनेकजणी आपली त्वचा संवेदनशील आहे हे माहीत असूनही तीव्र स्वरुपाचे क्लिन्जर वापरतात. आणि तेही खसाखसा घासून लावतात. यामुळे त्वचेचा नैसर्गिक समतोल ढळतो. त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग वगैरे करणं हेही या संवेदनशील त्वचेसाठी मर्यादित आणि कमी प्रमाणात करायला हवं. स्क्रब निवडतांनाही यात रासायनिक घटक नाहीत ना याची खात्री करुन घ्यावी.

 चुकीचे टोनर वापरले जातात:- संवेदनशील त्वचेसाठी टोनर वापरताना ते अल्कोहोल आणि तीव्र रासायनिक घटक विरहितच असले पाहिजेत. तेलकट त्वचेसाठी वापरले जाणारे टोनर हे प्रामूख्याने मुरुम पुटकुळ्याना प्रतिरोध करण्यासाठी असतात. असे टोनर वापरले तर संवेदनशील त्वचेचं नुकसान होतं. सॅलिसिलिक अ‍ॅसिडसारखे घटक असलेली उत्पादनं वापरल्यास त्वचा खाजणे, फोड येणे, लाल होणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे रासायनिक घटक असलेले टोनर टाळून लॅक्टिक किंवा ग्लायकोलिक अ‍ॅसिड असलेले टोनर या प्रकारच्या त्वचेसाठी आदर्श मानले जातात.
 

 रेटिनॉल उत्पादनं वापरताना होणाऱ्याया चुका:- रेटिनॉल हा घटक असलेली उत्पादनं हे तेलकट, कोरड्या किंवा मूरुम पूटकूळ्यांना संवेदनशील असलेल्या त्वचेवर वापरली तर थोड्या स्वरुपात खाज येण्यासारखं होतं. पण हे सामान्य असतं. पण हेच असंवेदनशील त्वचेसाठी मात्र तीव्र स्वरुपाचं जाणवू शकतं. त्यामूळे आपल्याला रेटिनॉलचं किती प्रमाण असलेलं उत्पादन चालेल याबाबत त्वचा विकार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पण रेटिनॉलचं कमीत कमी प्रमाण असलेली उत्पादन वापरणं हे सुरक्षित समजलं जातं.

रगडून-घासून मॉश्चरायझर लावणं- संवेदनशील त्वचेसाठी सौम्य स्वरुपाची उत्पादनं वापरणं जितकं महत्त्वाचं तितकंच त्वचेवर ती वापरताना ती हळुवारपणे लावणं आवश्यक असतं. संवेदनशील त्वचेसाठीचं योग्य सौंदर्य उत्पादन पण तेच जर घासून लावलं तर त्वचेच्या आतील भागातील रक्तवाहिन्या किंवा केशिकांना इजा पोहोचते त्यामुळे त्वचा खराब होते. त्वचेवर यामुळे घाव बसून त्वचेवर लाल ठिपके पडतात. संवेदनशील त्वचेवर मॉश्चरायझर हे सुध्दा हळुवार लावावं लागतं.

Web Title: Inadvertent mistakes in sensitive skin can also be costly. What are these mistakes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.