प्रदूषण, बदलेली जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीचा आहार यामुळे आपल्या आरोग्यासह केसांवर देखील परिणाम होतो.(white hair solution) अगदी कमी वयातच केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. केस पांढरे होणे, टक्कल पडणे, गळणे किंवा सतत कोरडे पडण्याचा समस्या निर्माण होतात.(Natural hair darkening oil) अगदी तिशीच अनेकांचे केस पांढरे होऊ लागते आहेत. अशावेळी आपण अनेक तेल, सिरम, केमिकल गोष्टींचा केसांसाठी वापर करतो. पण काही केलं तरी केसगळती थांबत नाही ना केस पुन्हा काळे होतात.(Home remedy for white hair)
केमिकल डाय किंवा केसांना मेहेंदी लावली तरी केस तात्पुरते काळेभोर दिसतात. पण त्यासाठी वापरले जाणारे इतर केमिकल घटक केसांच्या मुळांवर वेगाने परिणाम करतात.(Ayurvedic treatment for white hair) त्यामुळे केस कमकुवत होणे, कोरडेपणा वाढणे, कोंडा होणे किंवा केसगळती वाढण्याचा समस्यांना सामोरे जावे लागते.(Black hair home remedy) पण काही सोपे घरगुती उपाय केल्यास पांढरे केस मुळापासून पुन्हा काळेभोर होण्यास मदत होईल.
वयाच्या चाळिशीतही दिसाल मॉर्डन अन् ट्रेंडी! प्रत्येक महिलेकडे हव्याच ५ साड्या, दिसाल एकदम क्लासिक
केस काळे करण्यासाठी आपण हेअर डाय, हेअर कलर आणि मेहेंदीच्या उत्पादनांचा वापर करतो. यामध्ये अनेक केमिकल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे आपल्या केस आणि टाळूचे नुकसान होते. ज्यामुळे केस कोरडे, निर्जीव होतात. पण केसांना काळे करण्यासाठी आपण घरगुती उपाय करु शकतो.
केसांना काळे करण्यासाठी आपल्याला मोहरीचे तेल, हळद, कॉफी पावडर, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, अर्ध्या लिंबाचा रस लागेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लोखंडी कढई लागेल. त्यावर मोहरीचे तेल गरम करुन त्यात हळद पावडर घाला. थोडा वेळ ढवळून घ्या नंतर त्यात कॉफी पावडर घाला. पूर्णपणे मिसळेपर्यंत ढवळून घ्या. यानंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून लिंबाचा रस घाला.
ही तयार केलेली पेस्ट केसांना हेअर डाय किंवा मेहेंदीसारखे लावा. केसांवर हे किमान अर्धा तास राहू द्या. सुकल्यानंतर केस शाम्पूने धुवा. महिन्यातून किमान तीन वेळा लावल्यास फरक दिसेल.
