Lokmat Sakhi >Beauty > टक्कल पडलेल्या भागातही उगवतील नवे केस! 'या' पानांचा रस लावा- केस गळणं बंद, वाढतील केस

टक्कल पडलेल्या भागातही उगवतील नवे केस! 'या' पानांचा रस लावा- केस गळणं बंद, वाढतील केस

How To Use Thai Basil For Hair Growth: केस खूप गळत असतील तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(thai basil hair mask to reduce hair fall)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 20:08 IST2025-06-03T18:59:01+5:302025-06-03T20:08:46+5:30

How To Use Thai Basil For Hair Growth: केस खूप गळत असतील तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(thai basil hair mask to reduce hair fall)

how to use thai basil for hair growth, use of thai tulsi for fast hair growth, thai basil hair mask to reduce hair fall | टक्कल पडलेल्या भागातही उगवतील नवे केस! 'या' पानांचा रस लावा- केस गळणं बंद, वाढतील केस

टक्कल पडलेल्या भागातही उगवतील नवे केस! 'या' पानांचा रस लावा- केस गळणं बंद, वाढतील केस

Highlightsत्वचेमध्ये रक्ताभिसरण चांगलं होऊन केसांची मुळं पक्की होतील. यामुळे केस गळण्याचं प्रमाण आपोआपच कमी होईल. 

हल्ली केस गळण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे. काही जणांच्या केसांना अजिबातच वाढ नसते आणि त्यात केस गळण्याचं प्रमाणही खूप जास्त असतं. त्यामुळे हेअरलाईन मागे सरकत जाणे, कपाळाच्या दोन्ही बाजुंकडचे केस विरळ होत जाऊन तिथे टक्कल पडल्यासारखं होणे असे त्रास अनेकांना होत आहेत. यासाठी शाम्पू बदलून उपयोग नाही. कारण हा त्रास मुळापासूनच कमी व्हायला हवा आणि त्यासाठी Thai Basil म्हणजेच थाई तुळस खूप उपयुक्त ठरते. टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार या तुळशीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, कॅल्शियम, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सगळे घटक डोक्याच्या त्वचेसाठी आणि केसांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असल्याने ती केसांसाठी एखाद्या टॉनिकप्रमाणेच काम करते (how to use thai basil for hair growth?). म्हणूनच केसांच्या वाढीसाठी तिचा कशा पद्धतीने वापर करता येईल ते पाहूया..(thai basil hair mask to reduce hair fall)

केसांच्या वाढीसाठी थाई तुळस कशा पद्धतीने वापरावी?

 

१. थायी तुळशीचं तेल

थायी तुळशीची एक कपभरून पानं घ्या आणि ती स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एका पातेल्यामध्ये अर्धा कप खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता. आता थायी तुळशीची पानं थोडी ठेचून घ्या आणि ती तेलामध्ये घालून १० ते १५ मिनिटे गॅसवर चांगली गरम करून घ्या.

चुकीच्या दप्तरामुळे मुलांच्या पाठीला बाक येऊ शकतो! दप्तर खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स

यानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर ते गाळून घ्या आणि एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाने डोक्याला मसाज करा. त्वचेमध्ये रक्ताभिसरण चांगलं होऊन केसांची मुळं पक्की होतील. यामुळे केस गळण्याचं प्रमाण आपोआपच कमी होईल. 

 

२. थायी तुळशीचा हेअरमास्क

थायी तुळशीचा हेअरमास्क करून तो केसांना लावल्यानेही खूप फायदा होतो. हेअर मास्क तयार करण्यासाठी थायी तुळशीची १५ ते २० पाने घ्या आणि ती स्वच्छ धुवून थोडी ठेचून घ्या.

पावसाळ्यात घरात गोम, गांडूळ निघतात? ४ उपाय- गोम येण्याचा धोका कायमचा टळेल

त्यामध्ये २ चमचे आवळा पावडर आणि २ चमचे दही घाला. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासानंतर एखादा माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. यामुळे केसांची चांगली वाढ होते. तसेच कोंडाही कमी होतो. याशिवाय केसही मऊ, सिल्की होतात. 

 

Web Title: how to use thai basil for hair growth, use of thai tulsi for fast hair growth, thai basil hair mask to reduce hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.