केस गळणे, केसांची चमक कमी होणे, कोंडा होणे किंवा केस लवकर पांढरे होणे अशा अनेक समस्या आजकाल सर्वसामान्य झाल्या आहेत. महागडी हेअर प्रॉडक्ट्स वापरूनही कायमस्वरूपी केसांवर परिणाम दिसून येत नाहीत. अशावेळी घरच्याघरी करता येणारे सोपे आणि नैसर्गिक उपाय सर्वात जास्त उपयोगी ठरतात. त्यात चहाचे पाणी हा एक उत्तम उपाय मानला जातो(how to use tea water for hair growth).
चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक रंगद्रव्ये केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत संपूर्णपणे पोषण देतात. यामुळे केसगळती कमी होऊन केसांना नैसर्गिक चमक, मजबुती आणि दाटपणा मिळतो. यासाठीच केसांच्या अनेक समस्यांसाठी चहाचे पाणी हा एक सोपा आणि सहज करता येईल असा घरगुती उपाय आहे. केसांच्या (how to use tea water to make your hair stronger) अनेक समस्यांवर स्वयंपाकघरातील साधा चहा एक जादुई उपाय ठरू शकतो. चहामध्ये असलेले नैसर्गिक टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर तुमच्या केसांच्या आरोग्यासाठीही (how to apply tea water on hair) अत्यंत उपयुक्त ठरते. केसांसाठी चहाचे पाणी नेमके कसे तयार करायचे? केसांसाठी याचा वापर नेमका कसा करावा आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात.
१. केसांसाठी चहाचे पाणी कसे तयार करावे ?
केसांसाठी उपयुक्त असलेले हे चहाचे पाणी तयार करणे खूप सोपे आहे. सर्वातआधी एका भांड्यात एक कप पाणी घ्या. या पाण्यात १ ते २ टी बॅग्ज किंवा एक चमचा चहा पावडर घाला. हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे चांगले उकळू द्या. जेव्हा पाण्याचा रंग पूर्णपणे गडद होईल, तेव्हा गॅस बंद करा आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर ते चांगल्या प्रकारे गाळून घ्या आणि नंतर एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. केसांसाठी नैसर्गिक 'चहाचे पाणी' वापरण्यासाठी तयार आहे.
अप्पर लिप्सचे केस वाढले? करा बेसनाचा झक्कास उपाय - वेदना न होता केस निघतील सहज...
२. चहाचे पाणी केसांसाठी कसे वापरावे ?
तयार केलेले चहाचे पाणी केसांवर योग्य पद्धतीने वापरु शकता. सर्वातआधी केसांना शाम्पूने चांगल्या प्रकारे धुवून घ्या. केस हलके ओले असताना, तयार केलेले चहाचे पाणी स्प्रे बॉटलच्या मदतीने केसांवर स्प्रे करा किंवा बोटांनी मुळांमध्ये व्यवस्थित लावा. चहाचे पाणी स्कॅल्पमध्ये चांगले मिसळून जावे यासाठी डोक्याची हलकी मालिश करा. हे पाणी केसांवर ३० मिनिटांपर्यंत तसेच राहू द्या. ३० मिनिटांनंतर, केस साध्या पाण्याने धुवून टाकू शकता (शाम्पूचा वापर करु नका) किंवा, केसांवर अधिक फायदा हवा असल्यास, तुम्ही ते तसेच राहू देऊ शकता. या उपायामुळे केसांमध्ये नैसर्गिक चमक येईल आणि ते मजबूत होण्यास मदत मिळेल.
केसांवर चहाचे पाणी लावण्याचे फायदे....
१. नैसर्गिक चमक वाढते :- चहामध्ये टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक केसांच्या क्यूटिकल्सना मजबूत करण्यास मदत करतात, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारुन, नैसर्गिक चमक येते.
२. केसांची वाढ सुधारते :- कॅफीन थेट केसांच्या मुळांना उत्तेजित करते. यामुळे केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांची वाढ जलद होते आणि ते दाट दिसू लागतात.
३. अकाली पांढरे होणे थांबते :- काळ्या चहाचा नैसर्गिक गडद रंग केसांना नॅचरल रंग देतो. नियमितपणे वापरल्यास, हे पाणी अकाली पांढऱ्या झालेल्या केसांना हलका नैसर्गिक रंग देऊन पांढरे केस लपवण्यास मदत करते.
४. कोंड्याची समस्या कमी होते :- चहामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि सौम्य अँटीसेप्टिक गुणधर्म स्काल्पवरील कोंडा, खाज आणि इतर संसर्ग कमी करण्यास मदत करतात.
५. केस मऊ आणि मुलायम होतात :- चहाचे पाणी केसांसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक रिन्स म्हणून काम करते, जे केसांना कंडिशनिंग करते. यामुळे केस अधिक मऊ, मुलायम आणि व्यवस्थित सेट करण्यास सोपे जातात.
Web Summary : Tea water nourishes hair, reducing hair fall and promoting shine. Prepare it by boiling tea in water, cooling, and applying to hair after shampooing. Regular use can improve hair growth, reduce dandruff, and soften hair.
Web Summary : चाय का पानी बालों को पोषण देता है, बालों का झड़ना कम करता है और चमक बढ़ाता है। इसे पानी में चाय उबालकर, ठंडा करके और शैम्पू के बाद बालों पर लगाकर तैयार करें। नियमित उपयोग से बालों का विकास बेहतर हो सकता है, रूसी कम हो सकती है और बाल मुलायम हो सकते हैं।