Join us

पांढऱ्या केसांचं टेन्शन? 'या' पद्धतीने चहा पावडर वापरा, केस नॅचरली होतील काळे- चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 16:14 IST

Benefits Of Tea Powder For White Hair: पांढरे केस नैसर्गिकपणे काळे करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय..(how to use tea powder or chay patti for naturally black hair?)

ठळक मुद्देचहा पावडर वापरून केसांचे सौंदर्य कसे टिकवून ठेवायचे ते पाहूया..

हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. महाविद्यालयीन मुलांचेही केस पांढरे झालेले आहेत. आता हे पांढरे केस लपविण्यासाठी मेहेंदी, डाय, हेअर कलर असे अनेक पर्याय आहेत. पण एवढ्या कमी वयापासून केसांवर वेगवेगळे केमिकल्स लावणं धोकादायक वाटतं. शिवाय मेहेंदी लावणे हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम आहे. त्यामुळे त्याचाही अनेकांना कंटाळा येतो. म्हणूनच आता पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा (how to use tea powder or chay patti for naturally black hair?). यामध्ये चहा पावडर वापरून केसांचे सौंदर्य कसे टिकवून ठेवायचे ते पाहूया..(benefits of tea powder for white hair)

 

चहा पावडर वापरून केस कसे काळे करता येतील?

चहा पावडरमध्ये कैटेचिन हा एक घटक असतो. हा घटक केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. आता केस पांढरे होऊ नयेत म्हणून चहा पावडरचा उपयोग कशा पद्धतीने करायचा ते पाहूया..

तुम्ही इंजेक्शन दिलेला दुधी तर खात नाही ना? 'असा' दिसणारा दुधी भोपळा खाणं टाळा- आरोग्यासाठी घातक

हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये १ लीटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये २ ते ३ टेबलस्पून चहा पावडर घाला. आता हे पाणी १५ ते २० मिनिटांसाठी चांगले उकळवून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.

 

पाणी थंड झाल्यानंतर ते दोन भांड्यात थाेडे थोडे विभागून घ्या. आता एका भांड्यातल्या पाण्यामध्ये कोरफडीचा ताजा गर घाला. आता ते पाणी केसांना लावा आणि साधारण पाऊण तासाने केस धुवा.

मंगळागौरीला नऊवारी साडी नेसणार? पाहा नऊवार नेसण्याच्या ६ वेगवेगळ्या पद्धती, सगळ्यांमध्ये उठून दिसाल

केस धुण्यासाठी दुसऱ्या भांड्यात ठेवलेल्या चहाच्या पाण्याचा वापर करा. तुम्हाला केस धुण्यासाठी जेवढा शाम्पू लागतो तेवढा शाम्पू त्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा. यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण खूप कमी होते. याशिवाय केसांवर नैसर्गिक चमक येऊन ते छान सिल्की होतात आणि लवकर वाढतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी