हल्ली बऱ्याच जणांना केसांच्या बाबतीत कोणत्या ना कोणत्या समस्या असतातच. कोणाचे केस खूप गळतात तर कोणाच्या केसांना अजिबातच वाढ नसते. काही जणांच्या केसांमध्ये नेहमीच खूप कोंडा असतो तर कोणाचे केस कमी वयातच पांढरे व्हायला लागतात. केसांच्या या सगळ्या तक्रारी कमी करायच्या असतील तर मोहरीच्या तेलाचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो. मोहरीचं तेल उष्ण असल्याने डोक्याच्या त्वचेतलं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि त्यामुळे मग केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं (benefits of sarso oil for hair growth). कारण केसांची मुळं पक्की होत जातात (how to use sarso oil for hair?). आता केसांच्या वाढीसाठी आणि कमी वयात केस पांढरे होऊ नयेत म्हणून मोहरीचं तेल कशा पद्धतीने लावायचं ते पाहूया..(how to use sarso oil for hair growth?)
१. केसांच्या वाढीसाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग
केसांची अजिबातच वाढ होत नसेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने केसांसाठी तेल तयार करा. हा उपाय करण्यासाठी १ वाटी मोहरीचं तेल घ्या. त्यामध्ये २ चमचे मेथी दाणे, २ चमचे कलौंजी आणि २ चमचे आवळा पावडर घाला.
सकाळी चहा पिण्याच्या आधी 'हे' प्या - भराभर वजन उतरून पोट -कंबर होईल सपाट
आता हे तेल ५ ते ६ मिनिटे चांगलं उकळवून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. थंड झालेलं तेल गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून एकदा या तेलाने डोक्याला मालिश करा आणि एखाद्या तासाने माईल्ड शाम्पू वापरून केस धुवा. केसांची चांगली वाढ होईल आणि केस गळणं थांबेल.
२. केसांत खूप कोंडा झाला असल्यास...
डोक्यात झालेल्या कोंड्यामुळे वैतागला असाल तर कडुलिंबाची वाटीभर पानं घ्या. ती स्वच्छ धुवा आणि मिक्सरमध्ये घालून त्यांची पेस्ट तयार करा.
फक्त ३ सेकंदात ओळखा साडीची अस्सल सिल्कची की सिंथेटिक? महाग हातमाग सिल्क साडी घेताना ‘एवढंच’ करा
यानंतर १ वाटी मोहरीच्या तेलात ही पेस्ट घालून गॅसवर ५ ते ७ मिनिटे उकळवून घ्या. थंड झाल्यानंतर हे तेल गाळून घ्या. आठवड्यातून २ वेळा या तेलाने डोक्याला मालिश करा आणि मग एखाद्या तासाने केस धुवून घ्या. डोक्यातला कोंडा कमी होईल. हा उपाय नियमितपणे केल्यास डोक्यातल्या उवादेखील कमी होतील.
Web Summary : Mustard oil can address hair problems like hair fall, slow growth, dandruff, and premature graying. Using it with ingredients like fenugreek, amla, or neem can boost hair growth and reduce dandruff. Regular use promotes healthy, strong hair.
Web Summary : सरसों का तेल बालों के झड़ने, धीमी वृद्धि, रूसी और समय से पहले सफ़ेद होने जैसी समस्याओं को दूर कर सकता है। मेथी, आंवला या नीम जैसे तत्वों के साथ इसका उपयोग बालों के विकास को बढ़ावा दे सकता है और रूसी को कम कर सकता है। नियमित उपयोग स्वस्थ, मजबूत बालों को बढ़ावा देता है।