Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केसांची वाढच खुंटली, खूप पातळही झाले? 'या' पद्धतीने रोजमेरी तेल लावा, १ महिन्यात केस वाढतील

केसांची वाढच खुंटली, खूप पातळही झाले? 'या' पद्धतीने रोजमेरी तेल लावा, १ महिन्यात केस वाढतील

How to Use Rosemary Oil For Hair Growth?: केसांची वाढ होतच नसेल तर रोजमेरी तेलाचा पुढील पद्धतीने वापर करून पाहा...(how to control hair loss using rosemary oil?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2026 17:45 IST2026-03-06T17:45:05+5:302026-03-06T17:45:55+5:30

How to Use Rosemary Oil For Hair Growth?: केसांची वाढ होतच नसेल तर रोजमेरी तेलाचा पुढील पद्धतीने वापर करून पाहा...(how to control hair loss using rosemary oil?)

how to use rosemary oil for hair growth, rosemary oil for hair growth, how to control hair loss using rosemary oil | केसांची वाढच खुंटली, खूप पातळही झाले? 'या' पद्धतीने रोजमेरी तेल लावा, १ महिन्यात केस वाढतील

केसांची वाढच खुंटली, खूप पातळही झाले? 'या' पद्धतीने रोजमेरी तेल लावा, १ महिन्यात केस वाढतील

Highlights३ ते ४ तासांनी माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहा. 

काही जणांची केसांच्या बाबतीत एक तक्रार असते की काही केल्या त्यांचे केस वाढतच नाहीत. केसांची चांगली वाढ होतच नाही. अगदी ५- ६ महिने उलटून जातात, तरीही केस इंचभरही वाढलेले नसतात. शिवाय केस गळण्याचं प्रमाणही जास्त असतं. अशीच तक्रार तुमचीही असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा. यामध्ये आपण केसांसाठी रोजमेरी तेलाचा वापर कसा करायचा ते पाहुया (how to control hair loss using rosemary oil?).. रोजमेरी तेलामध्ये असणारे काही गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात...(How to Use Rosemary Oil For Hair Growth?)

 

केसांची चांगली वाढ होण्यासाठी रोजमेरी तेल कशा पद्धतीने वापरावं?

काही ब्यूटी एक्सपर्टच्या मते रोजमेरी तेलामध्ये असणारे काही घटक ब्लड सर्कुलेशन वाढण्यासाठी मदत करतात. यामुळे केसांची मुळं पक्की होण्यासाठी मदत होते. शिवाय केसांची वाढही चांगली होते. पण एक मात्र खरं की रोजमेरी तेलाचा तुमच्या केसांना चांगला उपयोग होण्यासाठी तुम्ही ते काही महिने नियमितपणे लावायला हवं. तरच त्याचे चांगले परिणाम केसांवर दिसून येतील. यासाठी सलग ४ ते ५ महिने आठवड्यातून २ ते ३ वेळा रोजमेरी तेल वापरायला हवं. 

 

रोजमेरी तेलाचा केसांना चांगला उपयोग होण्यासाठी एका वाटीमध्ये १ ते दिड चमचा खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये ४ ते ५ थेंब रोजमेरी तेल घाला. आता या तेलामध्ये अर्धा चमचा कॅस्टर ऑईल घाला. कॅस्टर ऑईल आणि रोजमेरी तेलाचा एकत्रित परिणाम केसांवर जणू काही जादू करतो.

स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

रोजमेरी तेलामुळे केस गळणं कमी होतं, केसांची चांगली वाढ होते. तर कॅस्टर ऑईलमुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन ते छान सिल्की आणि मऊ होतात. आता ही तिन्ही तेलं एकत्रित करून त्याने केसाच्या मुळाशी मालिश करा. यानंतर ३ ते ४ तासांनी माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहा. 

 

Web Title : बालों के विकास के लिए रोजमेरी तेल: इस तरह लगाएं और पाएं परिणाम

Web Summary : क्या आपके बाल नहीं बढ़ रहे और पतले हो रहे हैं? रोजमेरी तेल मदद कर सकता है! रोजमेरी, नारियल और कैस्टर तेल के मिश्रण से नियमित रूप से मालिश करने से बालों के विकास को बढ़ावा मिलता है और बाल झड़ना कम होता है। बाद में माइल्ड शैम्पू का प्रयोग करें।

Web Title : Rosemary oil for hair growth: Apply this way for results.

Web Summary : Struggling with stunted hair growth and thinning? Rosemary oil can help! Massaging a blend of rosemary, coconut, and castor oil into the scalp regularly promotes hair growth and reduces hair fall. Use mild shampoo after.