आपल्यापैकी अनेकांच्या घरात भात रोज बनवला जातो.(Hair Care Tips) भातापासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात. आयुर्वेदानुसार तांदळाचा वापर हा त्वचा आणि केसांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.(Rice Water For Hair) त्वचेवर ग्लो आणण्यासाठी आणि केसांना नॅचरल क्लिंझर म्हणून तांदळाचा वापर केला जातो.(kren hair care secrets) तांदळाचा योग्य वापर केल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होतात. तांदळात भरपूर प्रमाणात अमीनो अॅसिड असते. जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. (How to use rice water for hair)
केस आहे की खराटा? गळणाऱ्या-ड्राय केसांना लावा ‘या’ पांढऱ्या फुलाचं तेल-सोपा उपाय
अनेकदा तांदळाचे पाणी लावताना आपण बऱ्याच चुका करतो ज्यामुळे केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होते. हल्ली बऱ्याच व्हायरल व्हिडीओमध्ये केसांना सॉफ्ट करण्यासाठी किंवा केसगळती रोखण्यासाठी तांदळाचे पाणी लावण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी आपण भरपूर प्रमाणात टाळूला किंवा केसांना तांदळाचे पाणी लावतो, ज्यामुळे आपल्याला खाज सुटते. इतकेच नाही तर केसांसाठी तांदळाचे पाणी खरंच फायदेशीर आहे का? डॉक्टर याविषयी काय सांगतात जाणून घेऊया.
डॉ. सुगन्या नायडू यांना इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला त्या म्हणतात. तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल, अमीनो अॅसिड आणि जीवनसत्त्व असतात जे कोरड्या केसांना मऊ होण्यास मदत करतात. इतकेच नाही तर केरेटिन म्हणून देखील आपण याचा वापर करु शकतो. एका अभ्यासानुसार असं समजून आलं की, तांदळाच्या कोंडाचे पाणी लावल्याने केस मुळांपासून वाढण्यास मदत होते. तसेच जळजळ कमी करण्यास देखील फायदेशीर आहे. तांदळाचे पाणी केस पातळ होण्याची समस्या सोडवू शकते. तसेच केस निरोगी आणि जाड राखण्यास मदत करते.
केसांना तांदळाचे पाणी कसं लावावं?
जर आपण केसांना तांदळाचे पाणी लावत असू तर कुकरमधून थेट बाहेर काढलेले गरम तांदळाचे पाणी केसांना लावू नका. तांदळाचे पाणी बनवण्यासाठी पाणी थंड झाल्यानंतर केसांना लावायला हवे. ज्यामुळे केसांना त्याचा फायदा होईल.