राईस वॉटर म्हणजेच तांदळाचं पाणी आपल्या केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किती उपयुक्त ठरतं, हे आता आपल्याला माहितीच आहे. सौंदर्यासाठी तांदळाचं पाणी वापरण्याची कोरियन पद्धत आता जगभर गाजते आहे. त्यामुळेच तर हल्ली कित्येक कॉस्मेटिक्समध्येही तांदळाचं पाणी वापरण्यात येतं. आपण घरच्याघरीही तांदळाचं पाणी तयार करून ते केसांसाठी वापरू शकतो (benefits of rice water for hair). पण ते नेमकं कशा पद्धतीने तयार करावं आणि कशा पद्धतीने केसांना लावावं हे अनेकींना कळतच नाही (how to make rice water for hair?). म्हणूनच आता पुढे दिलेली माहिती वाचा आणि घरच्याघरी स्वस्तातमस्त पद्धतीने तांदळाचं पाणी तयार करा.(correct method of using rice water for hair)
घरच्याघरी केसांसाठी तांदळाचं पाणी कसं तयार करायचं?
तांदळाच्या पाण्यामध्ये अमिनो ॲसिड्स, ॲण्टी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे ते लावल्याने केसांना भरपूर फायदा होतो.
दिवाळीत पाहुणे येणार? ‘अशी’ करा तयारी, छोटंसं घरही वाटेल प्रशस्त-करा फक्त ५ सोपे बदल
तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये १ ग्लास तांदूळ घ्या. यानंतर ते २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर धुतलेल्या तांदळामध्ये २ ते ३ वाट्या पाणी घाला आणि हे पाणी २ ते ३ तास तसेच राहू द्या.
यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि पुढच्या १० ते १२ तासांसाठी ते तसेच झाकून फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्या. यानंतर जे पाणी तयार होईल त्या पाण्यामध्ये त्याच्याएवढेच साधे पाणी घाला.
किडनी स्टोनचा त्रास? 'ही' चूक कराल तर कॅल्शियम कमी होऊन हाडं ठिसूळ होतील, तज्ज्ञ सांगतात.....
अन्यथा नुसते राईस वॉटर केसांना लावल्यास केस कोरडे आणि कडक होण्याची शक्यता असते. आता हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून एकदा हे पाणी केसांच्या मुळाशी स्प्रे करा. यानंतर एखाद्या तासाने केस धुवून टाका. केसांवर हळूहळू खूप छान परिणाम दिसून येईल.