केस हे केवळ आपल्या शरीराचा भाग नसून ते आपल्या सौंदर्याचा आणि आत्मविश्वासाचा एक अविभाज्य घटक आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रदूषण, चुकीचा आहार, मानसिक ताण आणि केमिकलच्या अतिवापरामुळे केसगळती ही एक गंभीर समस्या बनली आहे.(onion juice for hair) अनेकजण महागडे शाम्पू, हेअर सीरम आणि पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात, पण निकाल मात्र शून्य मिळतो. अशावेळी आपण काही घरगुती सोपे उपाय करायला हवे. (onion for hair growth)
आपल्या स्वयंपाकघरात मिळणारा १० रुपयांचा कांदा आपल्या केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण ठरू शकतो. पूर्वीच्या काळापासून केसांसाठी कांद्या रस वापरला जात आहे.(natural hair regrowth remedy) आयुर्वेदात आणि स्वयंपाकघरात असे काही घटक दडलेले आहेत, जे आपल्या केसांच्या मुळांना पुन्हा जिवंत करण्यास मदत करतात. त्यातीलच एक कच्च्या कांदाचा रस. हा रस आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. फक्त तो योग्य पद्धतीने वापरल्यास आपल्या केसांना भरपूर फायदा होतो.
कांदाच्या रस केसांना कसा लावावा?
सगळ्यात आधी कच्चा कांदो सोलून त्याचे बारीक तुकडे करा. मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा. आता कांद्याच्या रसात कापूस बुडवून हा रस टाळूवर लावा. रात्री लावा आणि सकाळी केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यास महिन्याभरात फरक दिसेल.
कांद्याच्या रसामध्ये सल्फर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असते. हे आपल्या केसांच्या वाढीला प्रोत्साहन देते. यामुळे केसगळती कमी होते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. कांद्याचा रस टाळूला लावल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होते. ते आपल्या टाळूला पोषण देते आणि मजबूत करते, ज्यामुळे कोंडा देखील कमी करू शकते. त्वचेवर आणि केसांवर कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा.
