हल्ली अनेकांना केसगळती, कोंडा, राठ केस, कोरडेपणा, केसांना फाटे फुटणे, केसांची चमक कमी होणे यापैकी अनेक समस्या भेडसावत आहेत.(Fenugreek seed hair oil) बदललेला आहार, प्रदूषण, मानसिक ताण, जास्तीचा हेअर-स्टायलिंग आणि केमिकल्सची सवय या सगळ्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. केसांना मजबूत करण्यासाठी आपण सतत काहींना काही करत असतो. (Hair growth home remedy) अनेकदा केसगळती इतकी वाढते की आता टक्कलच पडते की काय हा प्रश्न देखील उद्भवतो. अशावेळी स्वयंपाकघरातील काही पदार्थ तेलात मिसळले तर केसांची पुन्हा नव्याने वाढ होण्यास मदत होईल. जाणून घेऊया तेलात काय मिसळायला हवे.
रेखा ते दीपिका! 'या' ७ हिरोईन्सने केली प्लास्टिक सर्जरी - जुने फोटो पाहून विश्वासच बसणार नाही..!
केसांना लांबसडक, घनदाट आणि मजबूत करायचे असेल तर मोहरीचे, नारळाचे तेल, मेथीचे दाणे, कढीपत्ता, कांदा आणि आवळ्याची गरज लागेल. यानंतर एका लोखंडाच्या कढईत मोहरीचे तेल, नारळाचे तेल आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्या. थोडा वेळा ढवळल्यानंतर मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि आवळा घाला. तेल मंद आचेवर २० ते २५ मिनिटे शिजवा. पूर्ण एक दिवस हे तेल तसेच राहू द्या. गार झाल्यानंतर गाळून बाटलीत भरा. आठवड्यातून ३ वेळा या तेलाने टाळूची मालिश केल्यास केसांना पोषण मिळेल.
मोहरीच्या तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. जे केसातील कोंडा दूर करण्यास मदत करतात तर नारळाचे तेल टाळूला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. तसेच केसांना आवश्यक पोषण देखील प्रदान करते. ज्यामुळे केसांची मुळापासून ताकद वाढते. या दोन्ही तेलांमध्ये प्रथिने, लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असतात. जे केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे निरोगी टाळू राखण्यास मदत होते. हे केसांना मजबूत करते आणि केसगळती रोखण्यास मदत होते.
तसेच या नैसर्गिक उपायांचा फायदा हा की त्यात साइड इफेक्ट्स नसतात. उलट केसांना आतून पोषण मिळवून ते अधिक निरोगी होतात. मेथीचा सुगंध सौम्य असतो, त्यामुळे केसांना तेल लावताना मनही शांत होतं.
