आपल्यापैकी अनेकांना लांब- दाट आणि घनदाट केस हवे असतात.(Hair Care Tips) त्यासाठी आपण अनेक तेल आणि महागड्या उत्पादनांचा वापर करतो. परंतु याचा परिणाम आपल्या केसांवर उलटा होतो.(Hair Falls Solution) केस वाढण्याऐवजी ते अधिक गळू लागतात. केसगळतीच्या समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात केसांचं विरळ होणं, गळणं, केसात कोंडा होणं किंवा केस रुक्ष होणे या समस्यांना अगदी कमी वयात सामोरे जावे लागत आहे. (Hair Oil) पण आयुर्वेदानुसार केसगळती रोखण्यासाठी काही सुवासिक फुलांचे तेल लावायला हवे. ज्यामुळे केसगळती थांबवता येते. (Homemade hair oil)
जास्मीन अर्थात चमेली हे फूल दिसायला जितके सुंदर आहे तितकेच केसांसाठी फायदेशीर. ज्याप्रमाणे हे फूल केसांना लावल्याने केसांचे सौंदर्य वाढते. त्याचप्रमाणे चमेलीचे तेल केसांना लांब, जाड आणि सॉफ्ट करते. पण हे तेल केसांना लावायचे कसे? केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया.
केसांना टोकदार फाटे फुटलेत-विचित्र दिसतात? तेलात ५ पदार्थ मिसळून लावा-केस होतील रेशमासारखे मऊ
केसांना चमेलीचे तेल लावण्यापूर्वी ते थोडे गरम करा. असे केल्याने रक्ताभिसरण वाढते. रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दहा मिनिटे या तेलाने केसांची मालिश करा. यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत योग्यरित्या पोहोचेल. तसेच कोरडे पडलेले केस हळूहळू दुरुस्त होतील. मसाज केल्यानंतर रात्रभर हे तेल केसांवर राहू द्या. हवे असल्यास या तेलात आपण खोबऱ्याचे किंवा एरंडीचे तेल मिसळू शकतो. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळेल आणि केस मुळांपासून मजबूत होण्यास मदत होईल.
घरीच करा पार्लरसारखं फेशियल, त्वचा इतकी दिसेल सुंदर की सगळे विचारतील बोटॉक्स केलं का..
जर आपण शाम्पू करताना केसांमध्ये २ ते ३ थेंब चमेलीच्या तेलाचे घातले तर कोरडे आणि रुक्ष केसांना चमक येईल. हे तेल केसांना मॉइश्चरायझर करण्याचे काम करते. स्कॅल्पची आर्द्रता राखते. कोरड्या टाळूला स्वच्छ करते. रात्रभर चमेलीची फुले पाण्यात भिजवून या पाण्याने केस धुतल्यास फायदा होईल. सतत केसगळती होत असेल तर आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हे तेल केसांना लावा.