Join us

रोज लावा जास्वंदीच्या फुलांचे ‘हे’ तेल- महिनाभरात दिसेल फरक, डोक्यावरचा एक केस गळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 19:02 IST

Hibiscus oil for hair: Hair fall solution: Natural hair growth tips: ही फुले टाळूला पोषण देतात आणि केस वाढवण्यास मदत करतात. हे तेल कसे बनवायचे पाहूया.

सध्या केस गळतीच्या समस्येपासून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला सामोरे जावे लागत आहे. आपलेही केस लांब- दाट असावेत असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी आपण केसांची पुरेशा प्रमाणात काळजी देखील घेतो.(Hair falls Solution) परंतु चुकीचा आहार, प्रदूषण, ताणतणाव, केस पातळ होणे, शेपटासारखे दिसतात तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो.(Hibiscus oil for hair) केसगळती थांबवण्यासाठी आपण बाजारात मिळणारे अनेक महागडे केमिकल्स केसांना लावतो. ज्यामुळे केस आणखी खराब होतोत.(Stop hair fall naturally)आयुर्वेदात असे अनेक घटक आहेत जे केसांना निरोगी राखण्यास मदत करतात.(Hibiscus benefits for hair) त्यातील सर्वोत्तम उपाय म्हणजे जास्वंदीच्या फुलांचे तेल. आपण हे तेल घरच्या घरी बनवू शकतो. जास्वंदीचे फूल हे केवळ सुंदरच नाही तर औषधांपेक्षा कमी नाही.(Healthy scalp care) यात असलेले नैसर्गिक गुणधर्म केसांना मजबूत करण्यास मदत करते. ज्यामुळे केस गळतही नाही ना तुटत. ही फुले टाळूला पोषण देतात आणि केस वाढवण्यास मदत करतात. हे तेल कसे बनवायचे पाहूया. 

केसांना महिन्यातून किती वेळा मेहेंदी लावावी? १ चूक- कोंडा वाढवते, केसही होतात कोरडे- पाहा योग्य पद्धत

सगळ्यात आधी आपल्याला १० ते १२ ताजी जास्वंदीचे फूल घ्या. एका पॅनमध्ये नारळाचे तेल घ्या ते हलके गरम झाले की त्यात जास्वंदीचे फुले घाला. फुले काळे होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. गाळून काचेच्या बाटलीत भरा. 

जर आपल्याला या तेलाला अधिक हेल्दी बनवायचे असेल तर यात कढीपत्ता, मेथीदाणे आणि रोझमेरी फुल तेलात घालू शकतो. केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आणि चकवण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना हलक्या हातांनी लावा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि मुळांना पोषण मिळेल. रात्रभर केसांना हे तेल लावून दुसऱ्या दिवशी केस धुवा. हे तेल नियमित लावल्याने केसांचं गळणं आणि तुटणं कमी होईल. टाळू निरोगी राहिल, तसेच कोंड्याची समस्या देखील कमी होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी