केसगळती, कोंडा आणि कोरड्या-निस्तेज केसांची समस्या आजकाल सामान्य वाटत असली तरी याचा आपल्या केसांवर दुष्परिणाम होतो.(Hair Care Tips) आपल्यापैकी अनेकांना लांब-दाट आणि काळेभोर केस आवडतात.(Herbal hair pack) लांबसडक केसांमुळे आपलं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.(Flower-based hair treatment) पण अचानक केसगळती सुरु झाली की, काही केल्या ती थांबत नाही.(Hibiscus for black hair) वाढते प्रदूषण, चुकीचे खाणं-पिणं, जास्तीचा ताण आणि अपुरी झोप यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.(Hibiscus hair remedy) पण याचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या त्वचेसह केसांवर होतो. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले नाही की केसगळती सुरु होते. बाहेरची धूळ आणि प्रदूषणामुळे केस अधिक कोरडे होतात. स्काल्प खराब होतो आणि केसांमध्ये कोंडा साचायला सुरुवात होतो.(Ayurvedic hair care) अनेकदा केस व्यवस्थित धुतले नाही की, केसांमध्ये चिकटपणा साचतो आणि केस अधिक गळू लागतात. केसगळती रोखण्यासाठी औषधांशिवाय काही घरगुती आयुर्वेदिक उपाय केल्यास फायदा होईल. (hibiscus hair mask at home)
लहानपणी आई-आजी केसांची काळजी घेण्यासाठी बागेतील काही पानं-फुलांचा वापर करायची. त्यामुळे केसांच्या अनेक तक्रारी सहज कमी व्हायच्या. केसगळती रोखण्यासाठी जास्वंदीचे फूल अधिक चांगले आहे. जास्वंदीच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात जे केसांच्या मुळांना बळकटी देतात. याचा नियमितपणे वापर केल्यास केसगळती थांबते. तसेच नवीन केस उगवण्यास मदत होते. जास्वंदीची फुले केसांना लावल्याने कोंड्याचा त्रास कमी होतो. जर आपल्यालाही केसांना निरोगी आणि सुंदर ठेवायचे असेल तर जास्वंदीच्या फुलांचा केसांसाठी कसा वापर करायचा पाहूया.
1. आपल्याला जाड, सुंदर आणि काळेभोर केस हवे असतील तर जास्वंदीच्या फुलांचा वापर अनेक पद्धतीने करता येतो. जर आपले केस वारंवार गळत असतील तर आठवड्यातून ३ ते ४ वेळा सुकवलेल्या जास्वंदीच्या फुलांचा चहा प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पित्तदोष संतुलित राहते आणि हार्मोनल संतुलन सुधारते. हा चहा प्यायल्याने केस आतून मजबूत होतात.
कोरियन सिल्की केसांसाठी तांदळाचं पाणी भसाभस लावताय? आवरा, ‘असं’ लावलं तरच होईल फायदा
2. केसगळती आणि वाढ खुंटण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर ताजी जास्वंदीची फुले, पाने आणि कोरफडीचा गर मिसळू याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळूवर लावून ३० मिनिटांनी धुवा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि केसांच्या कुपांना बळकटी मिळते.
3. जर केस पांढरे होत असतील जास्वंदीची फुलांचा केसांसाठी वापर करु शकतो. एका भांड्यात जास्वंदीचा पावडर, भृंगराज आणि आवळा पावडर समप्रमाणात घ्या. त्यात गुलाबाचे पाणी घालून पेस्ट तयार करा. आठवड्यातून एकदा ही पेस्ट केसांना लावा. ही पेस्ट केसांच्या मेलेनिन पेशींना पोषण देते आणि टाळूला थंड करते.
4. आपल्या केसांमध्ये कोंडा असेल किंवा टाळूला सतत खाज येत असेल तर जास्वंदीच्या पानांची पेस्ट बनवा. त्यात कडुलिंबाचे पाणी किंवा टी ट्री ऑइल मिसळा. हे आपल्या टाळूवर २० ते ३० मिनिटे लावा नंतर शाम्पूने केस धुवा. हे टाळू स्वच्छ करते आणि जळजळ कमी करते.
5. केसांना रेशमी आणि चमकदार करायचे असेल तर जास्वंदीचे तेल वापरु शकता. जास्वंदीची फुले काही दिवस नारळाच्या तेलात भिजवा. त्यानंतर गाळून घ्या आणि आठवड्यातून दोनदा या तेलाने मालिश करा. हे तेल केसांना मॉइश्चरायझ करते आणि नैसर्गिक चमक देते.