'केसगळती' ही सध्याची अगदी कॉमन समस्या आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणींना केसगळतीचा त्रास सतावतो. वारंवार अशी केसगळती सुरुच राहिल्यावर हळूहळू केस विरळ होऊन टक्कल पडेल अशीच भीती वाटते. जर केसगळती अगदी भरपूर प्रमाणात होऊ लागली आणि नवीन केस उगवलेच नाहीत तर काय करायचं (How to use curry leaves and hibiscus flower to reduce hair fall) अशी भीती आपल्या मनात कायम असते. दिवसागणिक वाढणारे प्रदूषण, अपुरी झोप, चुकीची आहारशैली आणि मानसिक तणाव यामुळे तरुण वयातच केस गळण्याचं प्रमाण (Best natural ingredients to stop hair fall) वाढत चाललं आहे. योग्य वेळी योग्य उपाय न केल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. म्हणूनच केसगळतीचे खरे कारण समजून घेऊन त्यावर उपाय करणे महत्त्वाचे आहे(Ayurvedic drink for hair fall).
केसगळती जर फारच मोठ्या प्रमाणात होऊ लागली तर, आपण सगळ्यांतआधी शॅम्पू, कंडिशनर आणि इतर हेअर केअर प्रॉडक्ट्स बदलण्याकडे लक्ष देतो. परंतु फक्त शाम्पू, तेल किंवा हेअर केअर प्रॉडक्ट्स बदलून फायदा नसतो तर काही ठोस उपाय करणे फायद्याचे ठरते. जर केसगळती ही शरीरातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे होत असेल, तर आशावेळी कितीही तेलं आणि शॅम्पू बदलले, तरीही त्याने फारसा फरक जाणवत नाही. यासाठी सगळ्यातआधी शरीरातील पोषणतत्वांची कमतरता (Homemade powder for hair growth using curry leaves and hibiscus) भरुन काढणे जास्त गरजेचे असते. शरीरातील पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे जर केसगळती होत असेल तर उपाय म्हणून काय करावे ते पाहा.
इंस्टाग्रामवर प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट राजमणि पटेल यांनी अलीकडेच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केसगळतीसाठी एक उत्कृष्ट घरगुती उपाय सांगितला आहे. या घरगुती उपायात वापरलेल सर्व साहित्य सहजपणे आपल्या घरातच उपलब्ध होत. हा उपाय अत्यंत स्वस्त असूनही खूप प्रभावी आहे. यासाठी एक पावडर तयार करावी लागते, जिला पाण्यात मिसळून एक हेल्दी ड्रिंक बनवता येते. या घरगुती उपायाचा नियमित वापर केल्यास केसगळती कमी होऊ शकते.
ही पावडर तयार करण्यासाठी आपल्याला १ कप सुकवलेला कडीपत्ता, १/४ मेथी दाणे,न १/४ कप आवळा पावडर किंवा ताज्या आवळ्याच्या फोडी, १/४ कप तीळ, १ ते २ टेबलस्पून जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
ही पावडर कशी तयार करायची?
कडीपत्ता, मेथी दाणे, तीळ, जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या एका कढईत मंद आचेवर कोरडे हलकेसे भाजून घ्या. भाजून झालेले सर्व साहित्य थोडे थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी. आता या तयार पावडरमध्ये थोडी आवळा पावडर किंवा ताजा किसलेला आवळा मिसळा आणि पुन्हा एकदा सगळं एकत्रित बारीक वाटून घ्या. ही तयार पावडर एका हवाबंद डब्यात भरून स्टोअर करून ठेवून द्या.
या पावडरचे १ ते २ चमचे, दिवसातून एकदा किंवा दोनदा, कोमट पाण्यात किंवा ताकामध्ये मिसळून पिऊ शकता. तसेच, ही पावडर तुम्ही स्मूदी, ज्यूसमध्ये देखील घालू शकता किंवा भात, सूप तसेच इतर अन्नपदार्थांवर देखील शिंपडून खाऊ शकता.
ही घरगुती औषधी पावडर खाण्याचे फायदे...
१. कडीपत्ता :- कडीपत्ता हा अँटीऑक्सिडंट, प्रोटीन आणि केसांसाठी आवश्यक जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. केसांची वाढ होण्यसाठी आणि अकाली पांढरे होण्यापासून केसांना वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
२. मेथी दाणे :- हे केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतात आणि केस गळण्याची प्रक्रिया थांबवण्यास मदत करतात.
३. आवळा :- आवळ्यात व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. आवळा केस मजबूत करतो आणि तुटणं थांबवतो.
४. तीळ :- तीळामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतात. हे टाळूला पोषण देतात आणि केसांची मुळे बळकट करतात.
५. जास्वंदीच्या पाकळ्या :- जास्वंदीच्या पाकळ्या केसांच्या वाढीस चालना देतात आणि केसांची मुळे मजबूत करतात.