केसांच्या तक्रारी सध्या खूप वाढल्या आहेत. काही जणांच्या केसांना अजिबातच वाढ नसते तर काही जणांचे केस खूप गळतात. शिवाय बरेच जण डोक्यातल्या कोंड्यामुळेही वैतागून गेलेले आहेत. कोंडा काही केल्या कमी होत नाही आणि मग कोंडा वाढला की आपोआपच केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. अशीच तुमच्या केसांचीही तक्रार असेल तर इतर कोणतेही शाम्पू किंवा कॉस्मेटिक्सचे वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. हे उपाय करण्यासाठी आपल्याला दही लावायचे आहे (home hacks to reduce dandruff from hair). केसांसाठी दह्याचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो. तो नेमका कसा करायचा ते पाहूया...(use of curd to get rid of dandruff)
केसांसाठी दह्याचा वापर कसा करायचा?
१. जर तुमचे केस अजिबातच वाढत नसतील किंवा मग केस गळण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं असेल तर हा एक उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे दही घ्या. त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचं ताक करा.
फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे
या ताकामध्ये १ ते दिड चमचा मेथी दाणे रात्रभर भिजत घाला. सकाळी दह्यात भिजलेले मेथीदाणे मिक्सरमधून वाटून घ्या. आता ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केसांची खूप चांगली वाढ होईल.
२. डोक्यात खूप कोंडा झाला असेल तर त्यासाठी दही हा एक अतिशय स्वस्तात मस्त आणि सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला.
बाल्कनीत लावा २ रोपं आणि घरभर दरवळेल सुगंध, घरात प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी सोपा उपाय
आता हा लेप केसांच्या मुळाशी लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनी केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून एकदाच करा. डोक्यातला कोंडा लगेचच कमी झाल्यासारखा जाणवेल.
Web Summary : Suffering from dandruff and hair fall? Curd can help! Use curd and fenugreek paste for hair growth. For dandruff, mix curd with lemon juice and apply. Repeat weekly for best results.
Web Summary : रूसी और बाल झड़ने से परेशान हैं? दही मदद कर सकता है! बालों के विकास के लिए दही और मेथी के पेस्ट का उपयोग करें। रूसी के लिए, दही को नींबू के रस के साथ मिलाएं और लगाएं। सर्वोत्तम परिणामों के लिए साप्ताहिक रूप से दोहराएं।