केस हे आपल्या सौंदर्याची ओळख असते. पण सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि तणावामुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.(Hair care Tips) तरुण वयात केस गळणे, विरळ होणे आणि टक्कल पडण्याची भीती सतावते. स्वत:ला आरशात पाहताना केस विरळ दिसू लागतात. प्रचंड प्रमाणात गळतात, कपड्यांवर , उशीवर इतकेच नाही तर घरभर केस पसरलेले दिसतात.(Hair fall remedy) ज्यामुळे आपल्या अधिक टेन्शन येते. (Home remedies for hair fall)
केसगळती रोखण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने, शाम्पू, तेलाचा वापर करतो.(Natural hair fall treatment) पण केसगळती थांबण्याऐवजी ती अधिक वाढते. केस गळण्याचे अनेक कारणे असू शकतात. चुकीचं आहार, पुरेशी झोप न घेणे, प्रदूषण, रासायनिक उत्पादने, हार्मोनल बदल किंवा सततचा ताणतणाव.(How to stop hair fall naturally) शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले नाही की, केसगळती अधिक प्रमाणात वाढू लागते. पण काही आयुर्वेदिक तेल, घरगुती उपाय केल्यास केसगळती रोखण्यास मदत होईल.
रात्री प्या खास आयुर्वेदिक ड्रिंक, पिंपल्स-फोडांचे डाग जातील- महिन्याभरात दिसेल जादू, त्वचाही उजळेल
आपल्या केसगळती रोखण्यासाठी हेअर मास्क बनवावा लागेल. २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर दह्यात भिजवा. सकाळी मेथीचे दाणे आणि दही मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात नारळाचे तेल आणि एरंडेल तेलाचे काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केस धुण्यापूर्वी लावा.
आठवड्यातून दोन वेळा हा उपाय आपण करायला हवा. यामुळे केसांना खोलवर पोषण मिळतं आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. केस गळणे, तुटणे कमी होते. टाळूची जळजळ रोखण्यास मदत होते. इतकेच नाही तर केसांना नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. ही पेस्ट केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावायला हवी.
दही केसांना नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. यात प्रथिने आणि जीवनसत्त्वेसारखी पोषक घटक असतात जे केसांची मुळे मजबूत करतात आणि कोरड्या केसांना आवश्यक ते पोषण देतात. दही टाळूला थंड करुन केसातील कोंडा कमी करण्यास मदत करते. मेथीचे दाणे केसांची वाढ दुप्पट करते. जे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि कमी प्रमाणात तुटतात. यामुळे केसातील कोंडा, खाज सुटणे आणि टाळूतील संसर्गाच्या समस्या टाळता येतात.