उन्हाळ्याच्या सिझनमधील कडकडीत, रणरणत ऊन अगदी नकोस होतं...या दिवसांत आपण शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी ताक, लस्सी किंवा दह्याचा आहारात आवर्जून समावेश करतो. आपल्या शरीराप्रमाणेच उन्हाळ्यात केसांना देखील नैसर्गिक ओलाव्याची आणि मॉइश्चरायझरची गरज असते...केस निर्जीव, कोरडे आणि निस्तेज होऊ लागतात. घाम आणि धुळीमुळे केसांमध्ये कोंडा किंवा खाज येण्याच्या समस्याही वाढतात अशावेळी केसांची वेळीच योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं...उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी महागड्या आणि फॅन्सी हेअर केअर उपायांपेक्षा स्वयंपाकघरातील 'दही' अतिशय फायदेशीर ठरू शकतं. उन्हाळ्यात दही खाण्यासोबतच, ते केसांना लावून मसाज करणं देखील तितकंच फायदेशीर मानलं जातं(curd benefits for hair).
दह्यामध्ये असलेले नैसर्गिक पोषक घटक केसांना खोलवर पोषण देतात, त्यांना मऊ, चमकदार आणि मजबूत बनवतात. विशेषतः उन्हाळ्यात स्काल्पला थंडावा (benefits of curd for hair) देऊन केसांमधील कोरडेपणा कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. कडक उन्हाचा परिणाम जसा आपल्या त्वचेवर होतो, तसाच तो केसांवरही होतो. केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना रेशमी बनवण्यासाठी दही हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. या उन्हाळ्यात दही खाण्यासोबतच ते केसांनाही लावा...केस गळतीपासून (How To Use Curd For Hair) पांढऱ्या केसांपर्यंतच्या केसांच्या सगळ्या समस्यांवर दह्याचा वापर कसा करावा ते पाहूयात...
केसांवर दही लावण्याची योग्य पद्धत...
दही थेट स्काल्पवर लावणे हा सर्वात सोपा उपाय आहे. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही यामध्ये थोडे मध किंवा लिंबाचा रस देखील मिसळू शकता. दही केसांना लावून साधारण २० ते ३० मिनिटांसाठी राहू द्या आणि त्यानंतर सौम्य शाम्पूने धुवून टाका. लक्षात ठेवा की दही ताजे असावे आणि खूप जास्त आंबट नसावे. जर तुमची स्काल्प खूप जास्त ऑयली असेल, तर दह्यामध्ये मुलतानी माती मिसळून लावणे फायदेशीर ठरू शकते.
केसांना दही लावल्याने नेमकं होत काय ?
दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रो-बायोटिक्स असतात ज्यांना 'गट फ्रेंडली बॅक्टेरिया' म्हटले जाते. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, हे बॅक्टेरिया स्काल्पचे मायक्रोबायोम संतुलित ठेवतात. जेव्हा तुमची स्काल्प निरोगी राहते, तेव्हा केसांच्या मुळांना वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड स्काल्पमधील डेड स्किन सेल्स काढण्यास मदत करते, ज्यामुळे स्काल्पची रोमछिद्रे उघडतात आणि केसांची वाढ अधिक चांगली होते.
चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...
केसांना दही लावण्याचे फायदे...
१. नैसर्गिक कंडिशनिंग :- दही केसांना नैसर्गिकरित्या मऊ आणि रेशमी बनवते. विकतच्या कंडिशनरपेक्षा दही हा एक स्वस्त आणि सुरक्षित पर्याय आहे.
२. कोंड्यावर रामबाण उपाय :- दह्यामध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे टाळूवरील कोंडा मुळापासून नष्ट करण्यास मदत करतात. यामुळे डोक्याला येणारी खाजही कमी होते.
३. केसांची वाढ होण्यास मदत :- दह्यातील प्रो-बायोटिक्स आणि पोषक घटक केसांच्या मुळांना उत्तेजित करतात, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होण्यास मदत होते.
४. केस गळतीवर नियंत्रण :- दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. हे प्रोटीन केसांच्या मुळांना मजबुती देते, ज्यामुळे केस मधून तुटण्याचे प्रमाण कमी होते.
५. स्काल्पचे आरोग्य सुधारते :- दह्यातील लॅक्टिक ॲसिड स्काल्पवरील डेड स्किन काढून टाकते. यामुळे स्काल्पची छिद्रे मोकळी होतात आणि केसांना पुरेसे पोषण मिळते.
६. नैसर्गिक चमक :- निस्तेज आणि कोरड्या केसांवर दह्याचा मास्क लावल्याने केसांना एक वेगळीच नैसर्गिक चमक येते आणि केस चमकदार दिसतात.
Web Summary : This summer, use curd on your hair to combat dryness and hair fall. Curd nourishes hair, reduces dandruff, promotes growth, and adds shine. Apply it directly or mix with honey/lemon for best results.
Web Summary : इस गर्मी में रूखे और बेजान बालों से छुटकारा पाने के लिए दही का इस्तेमाल करें। दही बालों को पोषण देता है, रूसी कम करता है, विकास को बढ़ावा देता है और चमक लाता है। सीधे लगाएं या शहद/नींबू के साथ मिलाएं।